9 ) प्रचलित मराठीत काव्यबद्ध भावार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा : निवडक ओव्या dnyaneshwari adhyay 9

 🌼 ज्ञानेश्वरी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग : निवडक ओव्या🌼 

॥ प्रचलित मराठीत काव्यबद्ध॥


भावार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा - राजविद्या राजगुह्य योग ( निवडक ओव्या)

dnyaneshwari adhyay 9

राजविद्या राजगुह्ययोग - निवडक ओव्या ( प्रचलित मराठीत )

..............🌿🌹🌿.............


अवधान एकवेळ दीजे ।

मग सर्व सुखासी प्राप्त होईजे ।

 हे प्रतिज्ञोत्तर माझे ।

 उघड ऐका ॥ १ ॥


तैसे प्रथम कामना त्यागणे।

 नि मग ज्ञानाची भेट घेणे ।

ऐसे ज्ञानाचे अनुभवणे ।

पडे अर्जुना ॥५०॥


मीपणाची झोप मोडो। 

स्वरूप बोधाचे कवाड उघडो ।

गाठ ती तुझी पडो ।

 तुझी तुझ्याशीच ।।१६।।


मन बुध्दी शब्दा कारणे ।

ज्ञान कळले ऐसे वाटणे ।

परि मृगजळाच्या त्या ओलाव्याने ।

अंकुर नाही ।। १३७ ।।


जे स्थूल दृष्टीने देखती ।

 ते मज प्रतितीस चुकती । 

स्वप्नी जे अमृत पिती ।

ते भ्रमित अर्जुना । । १४४ ।।


जे मज नामरूपी मानती ।

ते मज प्रतितीस चुकती । 

ते चंद्रबिंब धरिती । 

जळी जेवी ॥ १५० ॥


रागद्वेषाच्या कारणे । 

तयांचे अज्ञानी रमणे । 

भ्रमासी सत्य मानणे ।

 घडे तेथे।। १८३  ।।


मन बुध्दिच्या कुंडात । 

ज्ञानाग्नी होऊ द्यावा प्रदीप्त ।

अवधानी समत्व धरत । 

ब्रम्ह व्हावे।। २४१।।


मनी विवेक धरून ।

 अंतरी अवधान साधून ।

ज्ञानास उपलब्ध होणं ।

यज्ञ अर्जुना।।२४२ ।।


स्वतःच अमृत असून ।

आपले आपल्या विस्मरण।

 मग स्वतःसी मर्त्य मानणं।

दुर्दैव ते ॥३०३ ।।


मनी इच्छा धरून ।

भजन पूजन होणं ।

ते पापच की करणं ।

 पुण्य समजून।।३१२।।


जाणून घे अर्जुना ।

या पापपुण्य व्दैत कल्पना।

 स्वर्ग आणि नरक दोहोंना।

त्यागणे हिताचे।।३१५ ।।


मातेच्या उदरात ।

नि विष्ठेच्या संगतीत ।

 नऊ मास हाल भोगीत । 

अडकती भवचक्री ॥ ३३१॥


मी जाणले ऐसे म्हणतो ।

तो काहीच न जाणतो ।

जो मोठेपणा मिरवतो ।

 तो काहीच नाही ॥३६८।।


विधि यज्ञ आणि दान ।

जप तपादि साधन ।

तया किंमत एका काडीहून।

जास्त नाही।।३६९ ।।


शरीरासी तादात्म्य तोडून ।

मन गुणातीत होऊन ।

जीवभाव संपणं । 

कल्याणदायी॥३८१।।


मजसी एकत्व न जाणणे ।

मग वायाचि फुले आणि पाने ।

 मजठायी एकरूप होणे ।

तीच भक्ती ।।३९६ ।।


निष्काम ते होता ।

 घडे मजठायी एकरूपता ।

म्हणून सत्वर तू आता । 

निष्काम हो।।३९७।।


कर्मसिध्दांत जाणणे । 

जन्ममरण टाळणे ।

 मनी निष्काम होणे । 

सूत्र अर्जुना।।४०५ ।।


देहासी तादात्म्य तोडता ।

सुखदुःखी सम राहता । 

स्वप्न सुषुप्ति ओलांडता ।

एकत्व मजसी।।४०६ ।।


अंतरी आम्ही अभेद ।

केवळ नामरूपाचाच भेद ।

नामरूपास जाणे छेद ।

रहस्य अर्जुना ।। ४९९ ।।


पूर्वी वाईट त्यांचे आचरण।

 असेना का तो दुर्जन ।

तो मजसी एकत्व पावून ।

मुक्त होई ।।४१६ ।।


जे माझी भक्ती करती। 

अंती तया उत्तम गती ।

ते मजसीच पावती । 

आयुष्य सरता।।४१७ ।।


आधी जरी वाईट वागला ।

 पण नंतर जो सुधारला । 

तो महापुरातून वाचला ।

अर्जुना जसा ।।४९८ ।।


तो दुराचारी जरी होता ।

पण मनी पश्चाताप प्रकटता ।

होई सर्व पापातून मुक्तता।

 त्यांची अर्जुना ।। ४२० ।।


ऐसा पश्चाताप होता । 

पापांचा भोग संपता ।

तथा अंतरी पवित्रता ।

प्रकटे अर्जुना ॥ ४२१ ॥


ऐसे मनबुध्दि सांडता ।

 मनी निष्काम होता।

 मजसी एकत्व पावता ।

मुक्ती अर्जुना ॥ ४२४ ॥


वाया रूप तारण्याची सुंदरता ।

 नि जपतपाची वाच्यता । 

जोवरी नाही मजसी एकता।

 ते पाल्हाळ सारे ।। ४३२।।


निंबासी निंबोळ्या आल्या।

त्या कावळ्यांनीच खाल्ल्या।

तसा भक्तिहीन जातो वेढल्या ।

 दोषांनीच । ।४३८।।


माझ्यासी एकरूपता ।

तीच जीवनाची सफलता । 

इंद्रिय मनबुद्धि सरता ।

माझी गाठ ॥ ४५५ ॥


म्हणून कुळ जाती वर्ण ।

 हे सर्वथा गा अकारण ।

मजसी एकरूप होणं ।

भक्ती आहे।।४५६।।


वनात वणवा पेटला असता ।

 का न करावा वाकडा रस्ता ।

 आणि टाळण्या ही दुःखता।

 करावी भक्ती ॥ ४९२ ॥


जीवपण दुःखाचा डोंगर ।

तेथे मरणाचा वावर ।

टाळून हा दुःखाचा बाजार।

मुक्त व्हावे ।। ४९६ ।।


ऐशा मरणाच्या ठिकाणे ।

कैसे बा सुखी होणं । 

दुःखात सुख शोधणे ।

मूर्खपणा ॥ ४९७ ॥


ऐसी अनित्य जी स्थिती । 

तिजला मूर्ख सुख मानती ।

आणि अखंड जन्ममरण घेती । 

मृत्युलोकी ।।५०७॥


पावण्या मजसी एकता । 

कवडीचीही नाही आवश्यकता। 

परि ओतती संपत्ती सर्वथा।

जेथे हानी ।।५०८ ।।


जो विषयात बा गुंतला ।

तया म्हणती सुखी झाला । 

जो इच्छांखाली मेला ।

 म्हणती त्यास ज्ञानी ।।५०१ ।।


सर्पाने बेडूक अर्धा गिळला।

तरी तो बेडूक धरू पाहे माशीला ।

 तैसे यांच्या लोभाला । 

अंत नाही । ।५१४।।


या मृत्युलोकाच्या ठिकाणी।

सारी उरफाटीच कहाणी । 

अर्जुना येथे जन्मूनी ।

 फसलास तू ।।५१५।।


घडण्या मृत्युलोकाचा त्याग।

 तू भक्तीच्या वाटेस लाग ।

प्राप्त होता तो योग ।

मीच होशी।।५१६।।


तू मन हे मीचि करी। 

माझिया भजनी प्रेम धरी ।

सर्वत्र मज नमस्कारी ।

एकतत्वा।।५१७।।


मजठायी ठेवून अवधान ।

मनोसंकल्प जाऊ दे जळून ।

मजसी मग एकत्व पावून ।

मुक्त होशी ।।५१८।।

🌹🌹🌹🌹 

प्रचलित मराठीत ओवीबद्ध ज्ञानेश्वरी निवडक ओव्या :

Download pdf book



✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

..................


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या