ज्ञानेश्वरी चिंतनमालिका - 3 : आत्मप्राप्तीचा मार्ग path to self-realisation

ज्ञानेश्वरी चिंतनमालिका - 3 : आत्मप्राप्तीचा मार्ग path to self-realization 

ज्ञानेश्वरी चिंतनमालिका - 3 : आत्मप्राप्तीचा मार्ग path to self-realization


Click on the following link for pdf👇👇

🌹 चिंतन- 3 : आत्मप्राप्तीचा मार्ग path to self-realization 🌹


ज्ञानेश्वरी चिंतनमालिका - 2 : शोध ईश्वराचा search for truth

 .............................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

..................

चिंतन- 3 : आत्मप्राप्तीचा मार्ग path to self-realization 

🌸🌿🌿🌿🌹 🌹🌿🌿🌿🌸

    आत्मसाक्षात्काराची ओढ असेल तर प्रथम शरीर व मनाशी म्हणजेच षडतयनांशी (सहाही इंद्रियांशी) तादात्म्य तुटलेले मन असावे लागते .

 आणि हे तादात्म्य मनप्रक्रियेच्या समजेतून तुटलेले असणे गरजेचे आहे. 

    काही कारणपरत्वे, काही उद्देशाने, निराशेपोटी वा दुःखापोटी वा स्वर्गाच्या आशेने व मोक्षाच्या आशेने, अमरत्वाच्या आशेने, शरीर मनाशी तादात्म्य तोडू पहाणारे मन ध्यान करण्यास लायक नसते.

     दुःख व भ्रम निर्माण करणाऱ्या या मनप्रक्रियेच्या आकलनातून ज्या मनाचे महत्वाकांक्षा, इच्छा, भय, वासना, लोभ, व्देष यांचेशी आपोआप तादात्म्य तुटलेले असते; ते स्वसमज आलेले मनच ध्यान करण्यास लायक मन असू शकते. 

    मग असे स्वसमज आलेले मन जेव्हा स्वतःच स्वतःचं निर्विकल्प निरीक्षण सतत करु लागते तेव्हा मनाचे खेळ, मन निर्माण करीत असलेले बंधन, मन रचित असलेले सापळे हे त्या मनाला आतून समजतात. 

   ते मन मग स्वसमजेतून त्या सर्व प्रक्रियांचे केवळ निर्विकल्प निरीक्षण सतत करत राहते. 

   कोणत्याही हेतूशिवाय सजग असलेल्या अशा निर्हेतूक मनातच, कदाचित जर ते खरोखरच प्रामाणिक असेल तर सत्याचे प्रकटन होत असते. 

 पण ते मनाचे कर्तृत्व अजिबात नसते. 

   खरे तर स्वसमजेतून लयाला जाणाऱ्या मनात क्षणार्धात आपणाहून सत्य प्रकटत असते. 

   निखळ सजग निर्विकल्प निरीक्षणाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा प्रयत्न हा सत्य प्रकटनात अडथळाच असतो. 

   निर्विकल्प निरीक्षणात मन विरते तेव्हा सत्य प्रकटते हा निसर्ग नियम आहे. 

हीच सत्य प्रकटनाची नैसर्गिक प्रक्रिया आहे. 

   अन्य सर्व विधी व प्रक्रिया भवचक्रात बांधून ठेवणाऱ्या असतात. त्यांच्यामुळे भौतिक गोष्टींचीच फक्त प्राप्ती होत असते. 

   सत्य प्रकटनाशी त्यांचा काहीही संबंध नसतो.

🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿

ज्ञानेश्वरी चिंतनमालिका :


ज्ञानेश्वरी चिंतनमालिका 1 ते 21 चिंतने pdf book - विजय पांढरे

ज्ञानेश्वरी चिंतनमालिका 1 ते 21 चिंतने
pdf book
- विजय पांढरे


View    👈           👇
Dnyaneshwari chintan malika book download





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या