10068 ) चिंतन : आत्मज्ञान लक्षणे

चिंतन 10,068 : आत्मज्ञान लक्षणे

चिंतन10,068 : आत्मज्ञान लक्षणे


.............................

Click on the following link for pdf👇👇

🌹चिंतन 10068 : आत्मज्ञान लक्षणे 🌹

..........................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

........................

चिंतन क्र 10,068
  ( आत्मज्ञान लक्षणे ) 


🌿आपल्या स्वतःला  आत्मबोध झाल्याशिवाय आपल्याला  आत्मज्ञानी  ओळखता येत नाही .


🌺खरा आत्मज्ञानी आतुन चार अवस्थांच्या अतीत  असतो . 


🌿खऱ्या  आत्मज्ञानी  व्यक्तीला  पंचभुतातीत म्हणजे  द्रष्टा - दृश्य अतीत  अपरोक्ष अनुभुती असते व 

 त्याच्या निरुपणात तो फक्त  मनाच्या / consc. च्या / पंचभुतांच्या /  अहमच्या /

 द्रष्टा - दृश्याच्या निरासाची  म्हणजे चार अवस्था निरासाची गोष्ट करत असतो . 


🌺खऱ्या आत्मज्ञान्याला

 मान अपमान  विचलीत करत नाहीत . 


🌿जग हे त्याच्यासाठी सिनेमा screen  सारखे  खोटे असते . 


🌺स्वतःच्या किंवा कोणाच्याही मृत्युचे त्याला दु:ख वाटत नाही . 


🌿खरा आत्मज्ञानी कुणालाही  

नाम  जप साधना   किंवा ईतर द्वैत साधना करायला सांगत नाही . 


🌺खरा आत्मज्ञानी देव  पुजा अर्चा प्रार्थना  यांच्या भानगडीत पडत नाही .


🌿खरा ब्रह्मचारी  लौकिक अर्थाने  ब्रह्मचर्य पाळेन वा पाळणारही नाही पण  शिलाचा तो पक्का असतो  . वासना व कामना  त्याचा पराभव करु शकत नाहीत . 


🌺खरा आत्मज्ञानी   भांग , गांजा , दारु , तंबाखु ,बिडी , सिगारेट , चिलिम या भानगडीत पडणार नाही . 


🌿आत्मज्ञान्याला क्रोध सहसा येतच नाही , क्रोध आला तरी  ते बाहेर बाहेरचे  नाटक असते .


🌺मी ब्रह्म आहे वा मी आत्मा आहे  असे  घोकायला वा असे सतत लक्षात ठेवायला आत्मज्ञानी सांगत नाही . 


🌿खरा आत्मज्ञानी द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न असतो असे स्वप्नातही सांगत नाही .


🌺खरा आत्मज्ञानी जगाचा कोणी एक seperate  साक्षी वा द्रष्टा असतो अशी अज्ञान मुलक शिकवण देत नाही . 


🌿खरा आत्मज्ञानी  सुषुप्ती म्हणजे गाढ झोप सांगत नाही .


🌺खऱ्या आत्मज्ञान्याला  सुषुप्ती व तुर्येची अपरोक्ष अनुभुती असते .


🌿खऱ्या आत्मज्ञान्याला शब्दातीत  eternity ची समज असते .


🌺खरा आत्मज्ञानी अध्यात्मीक मार्गदर्शनाचा मोबदला पैशाच्या स्वरुपात वा अन्य स्वरुपात घेणे टाळत असतो . 


🌿खरा आत्मज्ञानी  कोणत्याही  

संकटात दु:खी वा विचलीत होत नाही 


🌺आत्मज्ञानी  जगाच्या व कुटुम्बाच्या दृष्टीने  व्यव्हाराची अक्कल नसलेला  व्यव्हारशुन्य असतो . 


🌿त्याचे कुटुंबीय  व नातेवाईक सहसा त्याला कंटाळलेले असतात . 


🌺ढोंगी अध्यात्मीक असलेले  द्वैतबुद्धीचे  लोक त्याच्या जवळ जात नाहीत . 


🌿आत्मज्ञान्या भोवती   द्वैत बुद्धीचे बहिर्मुख  माणस जमत नाहीत . 


🌺सर्व आत्मज्ञान्यांची आत्मानुभुती एकच असते ( चार अवस्था निरास व द्रष्टाच दृश्य असल्याचा अपरोक्ष बोध ) 


🌿दर्शन = ज्ञान  = ब्रह्म = universal consc.    हे तो जाणत असतो . 


🌺खऱ्या ज्ञान्याच्या शब्दाचा ,

खरा अर्थ खरा आत्मज्ञानीच जाणतो .


🌿खरा आत्मज्ञानी कोणत्याही  पंथात वा धर्मात  वा  कळपात सामील होत  नाही . 


🌺खरा आत्मज्ञानी आश्रम वा पंथ  वा संप्रदाय  वा  धार्मीक / सांप्रदायीक शिक्षण संस्था उघडत नाही . 


🌿कोणतीही साधना आत्मज्ञान प्रकट करु शकत नाही हे आत्मज्ञानी सांगत असतो . 


🌺शब्द रटल्याने आत्मज्ञान होत नाही हे खरा आत्मज्ञानी सांगत असतो .


🌿कुणी कुणाला आत्मज्ञान देवु शकत नाही 

व 

आत्मज्ञान देण्या घेण्याची वस्तु नाही  हे तो सांगत असतो . 


🌺मनुष्याच्या आकारातील  असलेला  व   प्रसादाने ,  पुजा प्रार्थनेने प्रसन्न होणारा ईश्वर तो मानत नाही . 


🌿त्याची शिकवण वैश्विक असते . 


🌺साधकाची आत्मबोध पात्रता  ही फारच आंतरीक बाब आहे कृष्णमुर्ति सारख्यांचे बोल  साधकाच्या  कानी पडुन ही  आत्मबोध प्रकटत नसेल तर साधकाचे मन अजुन अपात्र आहे असे समजावे . 


 आत्मज्ञान्याची   आंतरीक पात्रता ,  पात्रता नसलेले मन  बाहेरुन बाह्य लक्षणाहुन  ओळखु शकतच नाही . 


त्या  व्यक्तीचे  निस्वार्थी व  निष्काम आचरण 

हे ढोबळ लक्षण असु शकते .


🌿खरा आत्मज्ञानी गंध माळा भस्म 

दाढी  मिशा  किंवा विशिष्ट  रंगाचा  पोशाख करत नाही . 


🌺आत्मज्ञानी व्यक्तीकडुन साधकाला  आत्मज्ञानपर  प्रासादीक  मार्गदर्शन सहज उपलब्ध होत असते . 


🌿पण 

काही ढोंगी ही असे निष्कामतेचे व बाह्य लक्षणांचे सोंग दाखवु शकतात पण जेव्हा परीक्षेची वेळ येते तेव्हा ढोंग्याचे पितळ उघडे पडते . 


🌺खऱ्या आत्मज्ञान्याकडुन आत्मानुभुतीपर  प्रासादिक व छंदबद्ध , ओवीबद्ध काव्य रचना  सहज लिहिल्या जातात .


🌿खरा ज्ञानी कोणत्याही नियमाने बांधलेला नसतो . 


🌺एखाद्याच्या  जिवन पद्धतीहुन 

ज्ञानी ओळखता येत नाही त्याच्या  शिकवणीतुन तो ओळखला जावु शकतो . 


🌿खरा ज्ञानी कोणत्याही पंथात  , परंपरेत  वा  धर्मात बांधलेला नसतो  वा स्वतः ला तो गुरु मानत नाही व कोणालाही आपला शिष्य मानत नाही . 


🌺अनेक ग्रंथात आत्मज्ञान्याची अनेक लक्षणे सांगीतलेली आढळतात  पण ती सर्वच  आत्मज्ञान्याना  तंतोतंत  लागु होतीलच  हे सांगता येत नाही . 


🌿पण 

(१) Real meditation  शिकवण 


(२ )  अपरोक्ष चार अवस्था निरास निरुपण .


(३) द्रष्टाच दृश्य असल्याचे निरुपण . 


(४)  अद्वैत बुद्धी प्रकटन निरुपण.  


(५ ) अध्यात्म  मार्गदर्शनाची 

fee  न घेणे .


(६) निष्काम ,  स्वच्छ  जिवन आचरण 


ही  आत्मज्ञानी  व्यक्तीची   सहा   बाह्य पण  स्थुल बुद्धीला समजु शकणारी स्थुल लक्षणे आहेत .


🌺बाकी   तो कोणत्याच नियमाने बांधला गेलेला नसतो . 


🌿बाकी 

" पंचमहाभुतांच्या ,

 गुंत्यात गुंतुनी 

पाय त्याचा मोकळा

अशी त्यांची अवस्था . 


असो . 

.................

- विजय पांढरे

9822992578

25-04- 2023 

vbpandhare@gmail.com

...............................



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या