5 ) चिंतन:वास्तविक अध्यात्म Real spirituality

 चिंतन 5 : वास्तविक अध्यात्म

5 :Real spirituality


......................

click on the following link for pdf👇👇


 

...........................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

.........................

चिंतन : Real spirituality


आज आपण अध्यात्माचे ग्रंथ वा पुस्तके अभ्यासतो तेव्हा त्यात
परब्रहम हेच द्रष्टा आहे असा उल्लेख नेहमी आढळतो, जे अज्ञान आहे.
बऱ्याच वेळा ते परम तत्वच कर्ता व भोक्ता असल्याचे उल्लेख आढळतात व त्याच अनुषंगाने ईश्वरच सर्व कर्ता व भोक्ता आहे असे बोलले जाते जे अज्ञानच आहे पण खरी वास्तविकता काय आहे याचे  चिंतन आज आपण करुयात.


खरे म्हणजे परब्रहम हे पुढील चारी अवस्थांचे ( जाग्रती - स्वप्न - सुषुप्ती - तूर्या )अधीष्ठान असते .ते चारी अवस्थांचे द्रष्टा नसते .


परब्रहम जर स्वतलाच जाणत नाही तर इतरांना कसे बरे जाणेल ? 

परब्रहमामुळे पुढील चारी अवस्था प्रकाशीत होत असतात.


परब्रहमामुळे पुढील चारी अवस्थाना आभासी चेतनत्व प्राप्त होत असते.


परब्रह्माच्या अधीष्ठानावर पुढील चारी अवस्थाना द्रष्टत्व प्राप्त होत असते.


सर्व अवस्था सर्व इंद्रिय व सर्व विषय परब्रह्माच्या अधीष्ठानावर प्रकाशीत होत असतात पण परब्रहम कोणाचाच द्रष्टा किंवा भोक्ता किंवा कर्ता नसतो परब्रह्म फक्त अधीष्ठान स्वरूप आहे. परब्रहम प्रत्यक्ष कोणालाही जाणत नसते व कशातही प्रत्यक्ष हस्तक्षेप करत नसते..


मग प्रश्न उपस्थीत होती की कळतं कोणाला ?

समजत कोणाला ? 

उमजत कोणाला ? 

जाणत ते कोण ?


जाणीवेची क्रमशः रचना पाहीली तर त्यात खालील उतरंड आढळते.


परब्रहम 

ब्रहम

सुषुप्ती

स्वप्न

जागृती

या पाच गोष्टीच्या एकत्रीत काम करण्याने प्रकटणारा व त्यांच्या ठायी प्रकटणारी resultant illusory joint divisive mind-matter phenomenon म्हणजे consciousness / जाणीव होय.


illusory consciousness हाच कर्ता भोक्ता व द्रष्टा आहे, या अधीष्ठान स्वरुप परब्रहम व चारी अवस्था पाचही गोष्टीच्या मुळे प्रकटणारी resultant illusory joint divisive mind-matter phenomenon म्हणजे consciousness होय.


illusory consciousness हाच कर्ता भोक्ता व द्रष्टा आहे.


या अधीष्ठान स्वरुप परब्रहम व चारी अवस्था पाचही गोष्टींच्या अधीष्ठानावर हे सर्व क्रमशः घडत असते. या पाचही गोष्टी कर्ता भोक्ता वा दृष्टा नाहीत या पाचही गोष्टी स्वतः शिवाय काहीच जाणत नसतात, 

काही समजत नसतात,

 या पाच गोष्टीना स्वतः शिवाय काहीच कळत नसते तर या सर्वाठायी प्रकटणारा consciousness हाच रज्जुवर भासणारा सर्प भास आहे. 

या पाची गोष्टी रज्जु आहेत व consciousness सर्पभास आहे ज्याला या पाचही गोष्टी एकत्रीत जबाबदार आहेत . या पाचही गोष्टीतील एकही गोष्ट नसेल तर हा सर्पाभास रूपी पंचभौतिक consciousness निरास पावत असतो .

 म्हणुन जेव्हा पाचही पंचभौतिक इंद्रिय निद्राधीन होतात तेव्हा जागृतीतील जगदाभास हा निरास पावत असतो किंवा मृत्यु समयी जीव / प्राण सुषुप्ती रूपी sim card या शरीर रुपी mobile मधुन बाहेर पडते तेव्हा शरीर रूपी mobile चे कामकाज बंद पड़ते .


हे सविस्तर समजुन घेण्यासाठी

 दिसणे हा विषय आता आपण अभ्यासु .


दिसणे हा डोळ्याचा विषय आहे

 पण डोळे जड आहेत .

त्यांना दिसत नसते,

 डोळ्याना दिसले असते 

तर प्रेताच्या डोळ्याना पण दिसले असते . जरी जीव शरीरातून निघुन गेलेला असला तरी डोळे तर शरीरातच होते पण sim card शिवाय mobile चालत नसतो तसे आहे .


नुसते शरीर व डोळे त्या जीवा अभावी काहीच काम करू शकत नाहीत...


परब्रहमाच्या अधीष्ठानावर सर्व घडते पण दिसणे हा विषय परब्रहम ब्रह्म वा सुषुप्तीचा नाही. 

या सर्वांच्या अधीष्ठानावर हे सर्व कळणे दिसणे जाणणे समजणे, कळणे, वास घेणे, स्पर्श होणे व समजणे हे घडते पण हे जाणणे, समजणे , कळणे हा परब्रहम - ब्रहम वा सुषुप्तीचा विषय नाही.


प्रचलित समज असा आहे की दिसणे , ऐकणे , गंध , चव व स्पर्श या विषयाचे द्रष्टा वा साक्षी हे परब्रह्म , ब्रह्म वा सुषुप्ती असतात पण प्रत्यक्षात गोष्ट वेगळी आहे .

जसे electricity सर्व electric साधनांचे अधीष्ठान आहे पण साधनामार्फत घडणारे कार्य हे electricity जाणत नसते अगदी तसेच आहे .

हे परब्रहम वा ब्रह्म ही electricity प्रमाणे अधीष्ठान रुपी शक्ती आहे. 

प्रत्यक्ष कार्यात सरळ सरळ तीचा हस्तक्षेप नसतो.

 जसे राजा हा राज्यकारभाराचे अधीष्ठान असतो पण राजा स्वतः काहीच करत नसतो.

 प्रत्यक्ष कार्याशी राजाचा direct संबंध नसतो तसेच हा चार अवस्थात्मक अस्तित्व प्रक्रियेचा कारभार आहे..


या अधिष्ठानालाच परब्रहम किंवा ब्रहम परमेश्वर वा परमात्मा आत्मा वा ईश्वर वा देव देवता म्हणतात .

 पण यांचा कार्यात काहीच हस्तक्षेप नसतो . सामान्य अज्ञानी माणसाना समजत नसल्यानेच देवाची व ईश्वराची कल्पना निर्माण करून काही भगवे कपडे घातलेल्या अज्ञानी लोकानी सामान्य अज्ञानी खोट्या ईश्वराच्या कल्पनेत अंधश्रद्धेत व सकाम अध्यात्मात सकाम साधना शिकवुन लोकाना अज्ञानात अडकवून ठेवले आहे .

 तुम्ही समजता तसा करधर्ती, भोक्ता दृष्टा ईश्वर मानणे ही अज्ञानी लोकांची कल्पित अंधश्रद्धा आहे .

माउली म्हणते,


देव ते कल्पित ।

शास्त्रे ती शाब्दीक ।

 पुराणे सकळीक ।

बाष्कळीक ॥


परब्रह्म व ब्रह्माला अधीष्ठान म्हणुन महत्व आहे पण हे अधीष्ठान कर्ता धर्ता वा भोक्ता नाही.

कर्ता धर्ता भोक्ता हा illusory resultant consciousness / ego / अहम /मी  हा भासच आहे.


चारी पंचभूतात्मक अवस्था व त्यावर भासणाऱ्या ego चे अधीष्ठान परब्रह्मच आहे.


इंद्रियांचे विषय या अधीष्ठानाचे विषय नाहीत. 

या इंद्रिय विषयांचा परब्रह्म कर्ता धर्ता वा भोक्ता नाही हे समजुन घेतले पाहीजे, ते केवळ अधिष्ठान आहे. 

विषय किंवा इंद्रिये किंवा चारी अवस्था या परब्रह्माला जाणु शकत नाही परब्रहम त्यांचा विषयच नाही व चारी अवस्थाही परब्रह्माचा विषय नाही. 

या चारी अवस्था स्वसंवेद्य आहेत.

या सर्व चार अवस्थांच्या तसेच मन, बुद्धी इंद्रिय, विचार, कल्पना, संकल्प विकल्प यांच्या निरासातच परब्रहमाची अपरोक्ष समज परब्रहमाला येते केवळ ग्रंथ वाचुन जन्मभर कृष्णमुर्तिची प्रवचने श्रवण करुन

चारी अवस्था निरासा शिवाय परब्रहम अंतरात उमजत नसते.

मन बुद्धी, इंद्रिय, विचार व कल्पना द्वैत साधना सकाम दवैत भक्ती संकल्प वा प्रयत्न वा उपाय योजना तेथे पोहोचत नाहीत. 

फक्त observer is observed

म्हणजे द्रष्टाच दृश्य आहे या समजेतच चारी अवस्थांचा म्हणजे चारी अवस्थातील द्रष्टा दृश्याचा निरास अंतरात अनुभुत होत असतो, दुसरा कोणताही द्वैतबुद्धीचा उपाय तेथे कामाचा नाही .

दैत बुद्धी अद्वैताला प्राप्त होणे

observer is observed

हीच आत्मज्ञानाची गुरुकिल्ली आहे.

माउली ज्ञानेश्वरीत म्हणते ,


" तेथे उपाय तो अपाय "


ज्ञानेंद्रियच जर त्याला जाणु शकत नाहीत तर मग कर्मेंद्रिय कोठुन जाणणार ? 

म्हणुन जप -तप - विधी व द्वैत साधना या एका गवताच्या काडी इतक्याही किंमतीच्या नाहीत हे माउलीने मानेश्वरीत नमुद करून ठेवले आहे .

 म्हणुन सर्व कर्मकाण्ड व्यर्थ ठरतात व कर्मकांडांचा उदो उदो ही व्यर्थ ठरतो.


परब्रह्मात चारी अवस्था आहेत पण चारी अवस्थात द्रष्टा दृश्याचा भ्रम आहे तो पर्यंत परब्रम्हाचा बोध परब्रहमा नाही..


म्हणून गीतेत भगवंत म्हणतात :

 सर्व भुते माझ्यात आहेत पण मी मात्र भुतात नाही .

म्हणजे जी पर्यंत भुतपण भासत असते, द्रष्टा रुपी मी पण भासत असते तो पर्यंत परब्रह्माचा बोध परब्रहमाला नसतो.

कृष्णमूर्ति सारखा मार्गदर्शक भेटल्याशिवाय व अपरोक्ष चार अवस्था निरासा शिवाय कोणालाही आत्मबोध होणे शक्य नाही.


पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी, विचार, कल्पना तर्क संकल्प विकल्प द्वैत साधना व द्वैत भक्ती हे सर्व बहिर्मुख आहेत.

 परब्रह्मापासून दूर जाणारे आहेत म्हणून आत्मज्ञानासाठी निरुपयोगी आहेत.

 हे प्रथम समजले पाहीजे.


द्वैत भक्ती शिकवणारे व द्वैत साधना शिकवणारे बहुतेक सर्व परंपरा अज्ञानी परंपरा आहेत व द्वैत भक्ती शिकवणारे बहुतेक सर्व गुरु अज्ञानी गुरु आहेत हे उमजले पाहीजे.

चार अवस्था निरास म्हणजेच

* सर्व धर्मान परीत्यज्य आहे हे उमजले पाहीजे.


गुण व आकार जाणणे हे जाणीवेचे काम आहे म्हणुन जाणीव कधीच निर्गुण निराकार जाणु शकत नाही .

म्हणुन संपुर्ण चारी अवस्थातील जाणीवेचा समुळ निरास, complete dissolution of consciousness


किंवा


complete eradication of

observer observed phenomenon

किंवा

complete ending of experience

किंवा

चार देह निरास

किंवा

चार वाचा निरास

 किंवा

चार कोष निरास

किंवा

चार consc. निरास

 किंवा

चार स्कंध निरास


हाच आत्मज्ञानाचा एकमेव उपाय आहे.


परब्रह्म सर्व चार अवस्थाना जाणते ही चुकीची धारणा आहे.


म्हणजे


observer is observed


चारी अवस्था या स्वसंवेद्य आहेत .परब्रह्मावर प्रथम आकाश स्वरुपात मी चा आभास प्रकटला .

फक्त शब्दातच शब्दाला निरसुन टाकण्याची शक्ती आहे.

म्हणुन

शब्दाने शब्दाचा चारी अवस्थात निरास घडला असता आत्मज्ञान होत असते.

शब्द व्यर्थ नाही. पण शब्दाने शब्दाचा होणारा निरास उमजला पाहीजे.

शब्द घोकत बसल्याने शब्द कधीच निरास होत नाही उलट संस्कार अधीकच घट्ट होवुन भव बंधन कायमचे बळकट होवुन बसते, 

आज अहुतेक सर्वत्र व बहुतेक सर्व संप्रदायात अज्ञान समजुन उमजून न घेता यांत्रीकपणे सकाम होवुन मोक्षासाठी शब्द घोकणाऱ्यांचे बंधन असेच बळकट झालेले दिसते व संस्कार वाढून ते कड़वे धार्मीक झालेले दिसतात ज्यातून पुढे धार्मीक दहशतवाद वाढत असतो.

शब्दाने शब्दाचा निरास करण्याच्या कलेला ब्रह्मविद्या म्हणतात, द्रष्टाच दृश्य आहे असे सांगुन कृष्णमूर्ति ही कला शिकवतात तर द्रष्टा हा दृश्या पेक्षा भिन्न असतो ही अज्ञानी गुरुंची शिकवण असते. 

बहुतेक सर्व ९९.९९% परंपरा व भगवे घातलेले अज्ञानी गुरु हे अज्ञानच शिकवत असतात, अशी दुर्दशा बहुतेक सर्व परंपरांनी आपली केली आहे.


म्हणुन कवी मंगेश पाडगावकर सहज लिहून गेलेत की -


परंपरेच्या खांद्यावर सत्याचे मढ़े


मुळ शब्द रूपी ब्रह्म / ज्ञान / जाणीव / universal awareness च अज्ञानाचे मुळ आहे. म्हणुन समुळ शब्द निरासात म्हणजे चार वाचा निरासातच परब्रह्म प्रकटते.


मी - शब्द - अहंकार -ब्रहम

या भिन्न भिन्न बाबी नाहीत. यांच्या समुळ निरासात परब्रह्म प्रकटते.


कुऱ्हाडीचा दांडा जसा गोतास काळ होतो तसा शब्दाने चारी वाचांचा म्हणजे चारी अवस्थांचा निरास घडणे आत्मज्ञान आहे.

म्हणुन जाणकाराच्या संगतीत

श्रवणमनन व निधीध्यास

हाच खरा आत्मज्ञान मार्ग आहे.

मात्र आत्मज्ञानाची खरी खरी तळमळ व कळकळ साधकात असेल तरच आत्मज्ञानाची घटना अंतरात प्रकटते.


मनानेच मनाचा निरास अनुभवणे आत्मज्ञान आहे जी घडत असताना मृत्यु च्या अपरोक्ष अनुभवातून जावे लागते जी एक अत्यंत भयावह घटना आहे. 

जेथे टिकणे जवळ जवळ अशक्यप्राय आहे.

न भयभीत होता जे मन मृत्युला अपरोक्ष सामोरे जाते तेच मन मृत्युचा मृत्यु अनुभवत पुढे कालातीत अशा, परम ज्ञानाला प्राप्त होते. 

असो.

🍁🍁🍁🍁

- विजय पांढरे

9822992578

15-02-2022

vbpandhare@gmail.com



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या