चिंतन : आत्म प्राप्तीचा मार्ग Path to self realisation
आत्म प्राप्तीचा मार्ग Path to self realisation |
ज्ञानेश्वरी चिंतनमालिका : आत्म प्राप्तीचा मार्ग Path to self realisation
.....................
Click on the following link for pdf👇👇
🌹 चिंतन : आत्मप्राप्तीचा मार्ग path to self realisation🌹
.............................
✍️ Vijay Pandhare
📳 Phone no:
9822992578
📧 Email:
..................
चिंतन : आत्मप्राप्तीचा मार्ग
🌸🌿🌿🌿🌹 🌹🌿🌿🌿🌸
.....................................
शांती म्हणजे नेमके काय आणि शांती प्राप्त होते तरी कशी याचा शोध घेऊ जाता लक्षात येते की शांती ही काही प्राप्त करण्याची वस्तू नाही.
आपले जे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे जे सहा विकार आहेत, त्यांच्याविषयी मनात काहीही विचार नसतात, किंबहुना मनात कोणताच विचार नसतो, तेव्हा त्या मनात शांती आपोआप वास करते.
म्हणून अत्यंत सजग परंतु विकाररहित, विचाररहित, भावभावनारहित अशी जी मनाची अवस्था तीच शांती होय. पद, पैसा, प्रतिष्ठा इत्यादी गोष्टी शांती देऊ शकत नाहीत.
अन्यथा सत्ताधीश, धनाढ्य, प्रतिष्ठित माणसांना शांतीला प्राप्त झाली असती.
पण तसे आढळत नाही. उलट ती जास्तच अशांत असल्याचे आपल्याला आढळते, ही बाब सुरूवातीलाच लक्षात येणे गरजेचे आहे, अन्यथा मग उशीर होत असतो.
आपण अज्ञानी आहोत हे ज्याला आतून समजतं तोच पुढे ज्ञानाला प्राप्त होतो.
ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी माहिती नाही, याचीही जाणीव आपल्याला नसते.
जर असेच होत राहिले तर मग आयुष्याच्या अखेरीस आपण रिकामेच रिकामे असल्याचे आपल्या लक्षात येईल.
जे अंतरंगातून प्रकट होते, तेच खरे ज्ञान असते.
त्यासाठी कोणतेही पुस्तक वाचावे लागत नसते; तर सदैव भ्रमनिर्मिती करणारे मन स्वत:च्या संमोहन व भ्रम निर्माण करण्याच्या क्षमतेला जाणते व नंतर त्या संमोहन व भ्रमातून मुक्त होते तेव्हाच ज्ञानाचा उदय होतो.
अन्यथा लाखो जन्म स्व-संमोहनात व भ्रमात जगण्यात जातात.
आपण अज्ञानी आहोत, भ्रमात व संमोहनात जगत असतो, याची जाणीव केवळ संतसंगतीत होत असते.
अज्ञानी, भ्रमित व संमोहित जगाच्या सान्निध्यात राहणाऱ्यांना ही जाणीव कधीही होत नाही म्हणून त्यांचे दु:ख, तणाव, घालमेल, निराशा कधीही दूर होत नाही.
पद, पैसा, प्रतिष्ठा, महत्त्वाकांक्षा यांच्या मागे धावणाऱ्यांना समाधान, आनंद, तृप्ती कधीही प्राप्त होत नसते.
आत्मसाक्षात्काराची ओढ असेल तर प्रथम शरीर-मनाशी म्हणजेच षडतयनांशी (सहाही इंद्रियांशी) तादात्म्य तुटलेले मन असावे लागते आणि हे तादात्म्य मनप्रक्रियेच्या समजेतून तुटलेले असणे गरजेचे आहे.
काही कारणपरत्वे, काही उद्देशाने, निरोशेपोटी वा दु:खापोटी वा स्वर्गाच्या आशेने व मोक्षाच्या आशेने, अमरत्वाच्या आशेने, शरीर मनाशी तादात्म्य तोडू पाहणारे मन ध्यान करण्यास लायक नसते.
दु:ख व भ्रम निर्माण करणाऱ्या या मनप्रक्रियेच्या आकलनातून ज्या मनाचे महत्त्वाकांक्षा, इच्छा, भय, वासना, लोभ, द्वेष यांच्याशी आपोआप तादात्म्य तुटलेले असते, ते स्वसमज आलेले मनच ध्यान करण्यास लायक मन असू शकते.
मग असे स्वसमज आलेले मन जेव्हा स्वत:च स्वत:चं निर्विकल्प निरीक्षण सतत करू लागते, तेव्हा त्यातून मग मन विरते व सत्य प्रकटते हा निसर्ग नियम आहे.
हीच सत्य प्रकटनाची नैसर्गिक प्रक्रिया आहे.
अन्य सर्व विधी व प्रक्रिया भवचक्रात बांधून ठेवणाऱ्या असतात.
त्यांच्यामुळे भौतिक गोष्टींचीच फक्त प्राप्ती होत असते.
सत्य प्रकटनाशी त्यांचा काहीही संबंध नसतो.
.............................
- विजय पांढरे
🌿🌿🌿🌹 🌹🌿🌿🌿
ज्ञानेश्वरी चिंतनमालिका :
0 टिप्पण्या
Ask your doubt ..