397)चिंतन: विश्वाभास काव्य चिंतन vishwabhas

 

चिंतन 397 : विश्वाभास(काव्य चिंतन) vishwabhas

  
विश्वाभास काव्य चिंतन - vijay pandhare

............................

click on the following link for pdf👇👇

🌹चिंतन 397 : विश्वाभास ( काव्य चिंतन )🌹

...........................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

.........................

विश्वाभास (काव्य चिंतन)


बनुन विश्व स्वतः ।

 विश्वात दंग झालो ।

विसरुन स्वरुपाला ।

मीच विश्व झालो॥ १ ॥


अंतरीची ही कहाणी ।

 सांगु कोणत्या शब्दांनी । 

अपुर्णच आहे वाणी 

वर्णन्या स्वस्वरुपाला ॥ २ ॥


जेथे द्रष्टा दृश्य निमाले ।

 काही काहीच न बा उरले ।

त्या आकाशाही पलिकडचे ।

अज्ञाता अज्ञात उमजले ॥३॥


जेथे ज्ञान अज्ञान विरले ।

 वेद नेती नेती वदले ।

त्या जाणीव नेणीवे पलिकडचे ।

निर्गुणा निर्गुण उमजले ॥ ४ ॥


कृष्णमूर्ति कानी पडला ।

 द्रष्टाच दृश्य उमजला ।

आभास मी पणाचा विरला ।

द्वैत -अद्वैतासह ॥ ५ ॥


खोल अंतरीचे सर्व संस्कार ।

 समजेत झाले पसार ।

समुळ संस्कारांचा होता अंत ।

 प्रकटले ते नामरुपातीत ॥ ६ ॥


द्वैत अद्वैतासह गेले ।

अवघे नामरुप विरले ।

तेव्हा अंतरी प्रकटले ।

अंतरीचे परमतत्व ॥७ ॥


होता सर्व अनुभवांचा अंत ।

 सरे अनुभवणारा अनुभवा सहीत ।

 तेव्हा अंतरी ते उमजले ।

तुर्या आणि तुर्यातीत ॥ ८ ॥


मी माझे पणाचे समुळ मरण ।

तेच बा सत्य आत्मज्ञान ।

विश्वाभासाचं समुळ संपणं ।

 कृपा कृष्णमुर्तिंची ॥ ९ ॥


-विजय पांढरे

9822992578

22-12-2022

vbpandhare@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या