ज्ञानेश्वरी चिंतनमालिका - 7 : मानवी दुःखाला अंत आहे का ?Is there an end to human suffering?

 ज्ञानेश्वरी चिंतनमालिका - 7 : मानवी दुःखाला अंत आहे का ?Is there an end to human suffering?


ज्ञानेश्वरी चिंतनमालिका - 7 : मानवी दुःखाला अंत आहे का ?Is there an end to human suffering?

Click on the following link for pdf👇👇

🌹 ज्ञानेश्वरी चिंतनमालिका - 7 : मानवी दुःखाला अंत आहे का ?Is there an end to human suffering?  🌹

ज्ञानेश्वरी चिंतनमालिका - 7 : मानवी दुःखाला अंत आहे का ?Is there an end to human suffering?

...........................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

..........................

चिंतन - 7 : मानवी दुःखाला अंत आहे का ?
Is there an end to human suffering? 😭😞?

....................

अनादि कालापासून सतावणाऱ्या या प्रश्नाचा विचार आज आपण करु या.

 

दुःख आहे हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. 

हे दुःख नेमके काय आहे ? 

या दुःखाचे मूळ काय आहे ? 

ते दुःखाचे मूळ कसे दूर होईल ?


या प्रश्नांचा विचार आपण करु या.


सर्व प्रथम दुःख आपल्याला जाणवते कोठे याचा शोध घेतला असता दुःख मनात जाणवते असे दिसते. म्हणजेच दु:ख म्हणजे काय हे जाणायचे असेल तर आपल्याला मनाला जाणणे जरूर आहे. आपण मनाला जाणत नाही, हेच दुःखाचे खरे कारण आहे.


आपण सर्व मनाविषयी अनभिज्ञ, अज्ञानी आहोत. आपल्याला मन म्हणजे काय ते माहितच नाही. Conscious म्हणजे काय, Sub-conscious म्हणजे काय, Unconscious म्हणजे काय याचा पूर्ण बोध आपल्याला नाही. Sub-conscious व Unconscious तर जवळ जवळ आपल्याला माहितच नसतात. 


खरे तर Sub-conscious Unconscious मनाचा ९० % भाग व्यापून आहेत आणि आपण त्या ९०% विषयी अनभिज्ञ आहोत हेच अज्ञान आहे. 


आपण कोण आहोत ?

काय आहोत ?

कसे आहोत ?

आपल्या अस्तित्वाचे खरे स्वरूप काय ?

 ज्याला मी - मी  म्हणतो ते मीपण नेमके काय आहे ? 


आपल्याला आपल्या स्वतःचेच नीट आकलन नाही आणि आपण आपले तसेच इतरांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या अज्ञानी मनाच्या सहाय्याने करत आहोत, अज्ञानातून होणाऱ्या सर्व कृती अर्थातच दुःखच निर्माण करतात. 


मनाचे संपूर्ण आकलन न करुन घेता,

मनाचे शुध्दीकरण न करता

 स्वतःचे, समूहाचे, समाजाचे राष्ट्राचे जगाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे निरर्थक आहे.


तुमचे मनच जर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हिंसा, स्पर्धा, अहंपणाने भरलेले असेल तर आपण जे काही करू ते सर्व स्वार्थकेंद्रित असल्याने त्यातून फक्त दुखःच निर्माण होते , सुख, समाधान, तृप्ती कधीच नाही.

 

या सर्व दुःखाचे मूळ मीपणाच्या भावनेत आहे. 

आपल्याला असे वाटते की मी म्हणजे जगापासून एक अलग-थलग वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि वर वर भासणाऱ्या गुण-आकाराच्या विभिन्नतेमुळे हे खरे वाटायला लागते.


 जेव्हा आपण प्रत्येक जण स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या समृद्धीसाठी कार्यरत होतो, तेव्हा या सर्व कृती आत्यंतिक स्वार्थकेंद्रितपणाकडेच नेतात. या स्वार्थातूनच मग संघर्ष, युध्द, हिंसा, चिंता, दु:ख यांचा आपोआप उद्भव होतो. 


हा जो स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा भ्रम आपल्या ठिकाणी आहे, तोच दुःखाचे मूळ कारण आहे. त्या भ्रमालाच अविद्या, अज्ञान, माया असे म्हणतात .


आणि या भ्रमाचा निरास होणे हाच आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान, मुक्ति, मोक्ष आहे.


अशा या भ्रमित मनाच्या सहाय्याने सुखशांतीसाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. आपले सर्व पुढारी, राजकारणी, शिक्षणतज्ञ, विचारवंत, बुद्धिवादी हे सर्व असे भ्रमित असल्याने त्यांच्या मार्फत निर्मिलेला समाज हा विकृतच निर्मित झाला आहे. सर्व जगात अत्यंत वाढलेले मनोकायिक रोगांचे हृदयविकाराचे, आत्महत्यांचे, बलात्काराचे, युध्दांचे, हिंसेचे, दहशतवादाचे प्रमाण हेच सिद्ध करत आहे. वाढती औषधांची, डॉक्टरांची, इस्पितळांची गरज हे याचे निदर्शक आहे.


मन बदलले तरच व्यक्ती बदलते, व्यक्ती बदलली तरच समाज बदलतो, अन्यथा सर्व क्रांत्या निष्फळ ठरल्याच आहेत. 


क्रांतीपूर्वी खूप लोभस आश्वासने, घोषणा दिलेल्या असतात, पण क्रांतीनंतर सत्तेवर येणारे नेते त्या सर्व घोषणा, आश्वासने विसरुन स्वार्थीवृत्तीनेच काम करताना दिसतात ,अर्थात हे भ्रमित अवस्थेचेच निदर्शक आहे. या सर्व अराजकतेचे कारण माणसाच्या मनात असलेल्या अनादि संस्कारबद्धतेतच आहे. 


अनादि कालापासून अस्तित्वात असलेल्या या संस्कारबद्धतेतून सुटका झाल्याशिवाय दुःखाचा अंत होणार नसतो.


या संस्कारबद्धतेतून मुक्त होण्यासाठी संतांचे मार्गदर्शन घेऊन आपण आपला मार्ग शोधला पाहिजे व त्यासाठी सजग राहत आपणच आपले दीपक बनणे, हाच एकमेव उपाय आहे.

 

धर्म, पंथ, गुरु, साधना, जप -तप, पूजा, प्रार्थना, ग्रंथ, या गोष्टीत यांत्रीकपणे न अडकता फक्त त्यातून बोध घ्यायचा आहे. 


जगात जो काही भ्रष्टाचार, हिंसा, घातपात, खून, दरोडे, बलात्कार, दंगली होत आहेत याची पाळेमुळे आपल्या मनातच संस्कारबद्ध अवस्थेत आहेत याची स्पष्ट जाणीव आपल्या प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. या संस्कारबद्धतेच्या मोहजालातून सुटकेची इच्छा ज्याला होईल तोच कदाचित त्यातून सुटू शकतो. या मोहजालात ज्यांना सुख वाटत असेल त्यांच्यासाठी दुःख कधीच संपत नसते व बहुतेकांची परिस्थिती तशीच आहे.


ज्या मनात या दुःखापासून मुक्त होण्याचा विचार निर्माण होईल ते मन मग संतांच्या मार्गदर्शनाचा शोध घेणे सुरु करते. त्या संतसंगतीतच मग अशा मनाला अनेक तर्कातीत खुलासे होत असतात, जे मन- बुद्धीपलीकडचे असतात व ज्यांच्या जीवनात अशा प्रज्ञाकिरणाचा प्रकाश जाणवतो, ते मग अंतर्मुख होऊन स्वतःचा मार्ग स्वतःच शोधतात.


 ज्या मनाला या दुःखातून सुटण्याची खरी ओढ असते, खरी तळमळ असते ते मन संतसंगतीत मग शुद्ध व्हायला लागते. योग्य-अयोग्यचा बोध त्या मनात समजायला लागतो व मनाचे आकलन मग आपोआप अशा व्यक्तीला व्हायला लागते.


 त्या आकलनात मग जुन्या संस्कारांचा, जुन्या सवयींचा लय होऊन, संस्कारबद्ध मन जेव्हा त्या संस्कारातून मुक्त होते तेव्हा त्या मनात आपण अलग-थलग व्यक्ती असल्याचा भ्रम लोप पावून आपल्या वैश्विक स्वरुपाचा ,आपल्या विश्वात्मकतेचा बोध मनी उगवतो.

 

हा बोध मनात उगवणे हेच सर्व दुःखांवर उपाय आहे. 


बाकी सर्व उपाय निरर्थक आहेत.


 म्हणून हाच उपाय आयुष्यात कसा करता येईल याचा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. या विश्वात्मक बोधातच सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. अशा बोधानंतर सर्व प्रश्न चुटकीसरशी विरघळून जात असतात.


थोडक्यात, परिच्छिन्न होऊन भ्रमित झालेल्या त्या वैश्विक जीवन ऊर्जेला स्वतःच्या विश्वात्मकतेची जाणीव झाल्यावर सर्व प्रश्न सुटतात.

 म्हणून प्रथम संतसंगातून या परिच्छिन्नतेचा नीट बोध परिच्छिन्नतेला झाल्यास त्या बोधात परिच्छिन्नतेचा आपोआप विलय होऊन तेथे आपोआप विश्वात्मक वैश्विक जीवन ऊर्जेचा उदय होतो व सर्व दुःखांचा, संघर्षांचा अंत त्या अनंताच्या बोधात होत असतो, हेच " खरे अध्यात्म" होय.


🌿🌿🌿🌹           🌹🌿🌿🌿



ज्ञानेश्वरी चिंतनमालिका :


ज्ञानेश्वरी चिंतनमालिका 1 ते 21 चिंतने pdf book - विजय पांढरे

ज्ञानेश्वरी चिंतनमालिका 1 ते 21 चिंतने
pdf book
- विजय पांढरे


View    👈           👇
Dnyaneshwari chintan malika book download





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या