10,039)चिंतन : Practical meditation

चिंतन 10039: practical meditation

10039: practical meditation



........................................
click on the following link for pdf 👇👇

...............................................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

..............................

चिंतन :

  🧘🏻🧘‍♀️  ( Practical  meditation ) 🧘‍♀️🧘🏻


...................................................

एका   साधक मित्राने   meditation  practically  कसे करावे हे  समजावुन सांगा अशी विनंती केली आहे .

.....................................................

Meditation  या  विषयावर आपण  खुप चिंतन पाहीली आहेत .


आज  पुन्हा  नव्याने  वेगळ्या शब्दात   real meditation

समजुन घेण्याचा प्रयत्न करुयात . 


प्रथम    meditation  म्हणजे काय  ?  हे आधी समजुन घेवु . 


Real meditation म्हणजे काय याचे  उत्तर निरनिराळ्या शब्दात  दिले जावु शकते . 


आधी real meditation  समजुन घेणे फार महत्वाचे आहे .


जसे ,


Krishnmurti  म्हणतात , 


Choiceless awareness of every thought ,every  feeling and every action  and their significance moment to moment  is real meditation . 


मराठीत आपण असे म्हणु शकतो की ,  आपले प्रत्येक विचार , आपल्या प्रत्येक भावना , आपल्या प्रत्येक कृती व त्या बाबी मागे  असलेला भावार्थ या विषयी समजेत  सजग व तटस्थ रहाणे म्हणजे  real meditation  होय . 


हे statement  अत्यंत काळजी पुर्वक समजुन घेतले पाहीजे . 


आपल्या जिवनातील सर्व घडामोडी या तीन बाबीत समाविष्ट होतात .


विचार ,भावना व कृती या  घडामोडी व  या घडामोडींचे  विस्तारीकरण वा या घडामोडींची रेलचेल म्हणजेच आपले जिवन होय . 


जिवनाचा प्रत्येक क्षण या तीन बाबी शिवाय  दुसरा नसतो .


Thinking  ,feeling व  action  हेच आपले  total जिवन  होय . 


Either we think , feel or act  and that is our total life . 


So ,


To be aware of thought , feeling and action is real  meditation. 


 To be aware of totality of life is real  meditation .


To be aware of  conscious ,  subconscious , unconscious and universal consc. 

 is real meditation .


To be aware  of  body activities ,mind activities  and  ego activities in present , is real meditation . 


अशा  choicelessly aware रहाण्यालाच  साक्षीभाव असे परंपरेत म्हणतात  व असे साक्षीभावात प्रस्थापित होणे हेच  

ध्यान आहे , हेच real meditation आहे , हीच विपश्यना आहे  व हेच बुद्धाचे सतिपठ्ठाण  व कृष्णमुर्तिंचे 

Real meditation  आहे . 


आता practically हे कसे करायचे ते आपण पाहु . 



हे सजग  व तटस्थ रहाणे काही यांत्रीक क्रिया नाही तर , आपल्याला मन प्रक्रियेला जाणुन त्या मन प्रक्रियेचा समजेतुन , समजपुर्वक  सजग व तटस्थ अवस्थेला  प्राप्त व्हायचे आहे .


 मन प्रक्रियेची समज नसेल तर  meditation  ही मग एक यांत्रीक क्रिया होवुन जाते  जे केवळ एक concentration असते . 


बुद्धीच्या स्तरावर ही 

मन  प्रक्रिया दोन  घटकांची बनलेली असते . 


   ही बुद्धीच्या स्तरावरील 

मन प्रक्रिया खालील दोन शब्दात मांडता येते  .


observer - observed 


experience - experiencer 


seer  - seen  


me - non me 


अहम - ईदम  


द्रष्टा - दृश्य 


अनुभवणारा - अनुभव 


चेतन - जड 


mind - matter 


नाम - रुप  


   या दोन गोष्टी साठी विविध  ३०--४०  शब्द कसे वापरले जातात हे आपण आपल्या या आधीच्या अनेक चिंतनात सविस्तर पाहीले आहे . 


बुद्ध याच दोन बाबी पाली भाषेत खालील प्रमाणे मांडतात .


काया - कायानुपश्यी विहरती 


वेदना - वेदनानुपश्यी विहरती 


चित्त - चित्तानुपश्यी विहरती 


धम्म - धम्मानुपश्यी विहरती 


तर 


संतानी  ही प्रक्रिया खालील शब्दात मांडली आहे .


नाम - रुप 


ज्ञान - विज्ञान 


अक्षर - क्षर 


क्षेत्रज्ञ - क्षेत्र  


ज्ञाता  - ज्ञेय  


ज्ञानेश्वरीत या दोन बाबीसाठी  कसे २५-३०  शब्द वापरलेले आहेत हे आपण आपल्या अनेक चिंतनात पाहीले आहे .  Real meditation समजुन घेण्यासाठी  तुम्ही सर्व चिंतन मन लावुन अभ्यासण्याची गरज आहे तरच  तुम्हाला   real meditation चा पुर्ण आवाका लक्षात यील कारण सर्व गोष्टी काही एका चिंतनात cover होत नसतात . 


या प्रक्रियेतील दोनही  घटक आधी आपण नीट समजुन घेतले पाहीजे .  हे दोनही  घटक व या दोनही घटकांची  कार्यपद्धती समजुन घेणे ही real meditation  ची  पहीली पायरी आहे . 


म्हणुन एक एक घटक व त्यांची कार्यपद्धती  प्रथम आपण बुद्धीच्या स्तरावर समजुन घेवु .


 जगद  भासात  दोनच गोष्टी आहेत , एक बाब  म्हणजे काही तरी अनुभवाला येत आहे 

व दुसरी बाब म्हणजे  कोणाला तरी अनुभव येत आहे . 


या दोन बाबीना  समुळ अगदी  शेंड्यापासुन मुळापर्यंत म्हणजे conscious 

subconscious 

unconscious 

univsersal consc. 

स्तरापर्यंत  जाणणे म्हणजेच 

   real meditation आहे . 


आता practically  कसे करायचे याचा विचार आपण करुयात . 


जिवन जगताना प्रतिक्षणी  

काही तरी घटना बाहेर घडत असतात व  त्या घटनेचे पडसाद म्हणुन अंतरात काही तरी संवेदना ,  विचार व भावना निर्माण होत असतात 

या   अंतरंगात येणाऱ्या अनुभवाकडे प्रतिक्षण समज पुर्वक पहाणे  हे

 real meditation आहे . 


जसे   आपण जिवन जगताना  

मनात  ईच्छा जागते तेव्हा आपण  

मनातल्या मनात जागलेल्या  ईच्छे विषयी सजग रहात  noting करायचे की  " desire " . 


असेच   कर क्रोध  जागला तर क्रोधा विषयी सजग रहात मनातल्या मनात  noting करायचे की  " क्रोध " . 


असेच जर भय जागले तर  भया विषयी सजग रहात  मनातल्या मनात  noting करायचे की  

" भय "  .


असेच जर वासना जागली तर  मनातल्या मनात 

वासने विषयी  सजग रहात noting  करायचे की " वासना " . 


असाच जर लोभ जागला तर 

मनातल्या मनात सजग रहात 

लोभा विषयी सजग रहात noting  करायचे की "लोभ" .


असे   प्रतिक्षण

  प्रत्येक शारीरिक क्रिये विषयी , प्रत्येक विचारा विषयी , 

प्रत्येक  भावने विषयी  , 

प्रत्येक संवेदने विषयी  , 

प्रत्येक ego activity विषयी  सजग व तटस्थ  रहाणे म्हणजे real meditation म्हणजे  

साक्षी भावात स्थीर रहाणे होय .


असे ,


  observer - observed 

phenomenon विषयी ,


द्रष्टा - दृश्य  phenomenon विषयी ,


चेतन - जड  प्रक्रिये विषयी 

 समजपुर्वक सजग व तटस्थ रहाणे म्हणजेच  real meditation आहे . 


असे जर मन या  द्वैत प्रक्रिये विषयी  वर्तमानात , समज पुर्वक  सजग व तटस्थ  राहीले  तर पुढील घटना आपोआप  घडुन जातात  व  आत्मज्ञान प्रकटत असते  जी consciousness unfolding ची घटना असते जो  जागृती स्वप्न सुषुप्ती व तुर्या असा अंतरंग  प्रवास असतो . 


ही practical  प्रक्रिया अजुन  

जास्त  explain  करायची म्हटली तर खालील गोष्टी प्रतिक्षण  आपल्या लक्षात आल्या पाहीजेत . 


आपण सकाम आहोत ,


आपण षडविकारात बद्ध  आहोत , 


आपण स्वार्थी आहोत , 


आपण संमोहीत आहोत ,


आपण मी पणाच्या व्यसनात बद्ध आहोत , 


आपण काळ चक्रात बद्ध आहोत , 


आपण कसे सवयीत बद्ध आहोत 


आपण remoulding व recycling मधे बद्ध आहोत

 

आपण एका past compulsive momentum मधे   बद्ध आहोत . 


आपण एका यांत्रीक momentum मधे बद्ध आहोत ,


आपण शरीर व मनाच्या पिंजऱ्यात बद्ध आहोत ,


आपण अज्ञानात बद्ध आहोत , 


आपण मी पणाच्या भासात बद्ध आहोत 


आपण द्वैतात बद्ध आहोत 


आपण  द्वैत बुद्धीत बद्ध आहोत . 


आपण महत्वाकांक्षेत बद्ध आहोत 


आपण conditioned आहोत ,


आपण विशिष्ट विचारधारेत बंदिस्त आहोत ,


आपण सांप्रादायीक विचारात बद्ध आहोत ,


आपण मी च्या मायेत बद्ध आहोत 


आपण मी च्या कालचक्रात बद्ध आहोत . 


आपण राग द्वेषात बद्ध  आहोत ,


आपण भाव भावनांच्या बेडीत अडकलो आहोत ,


आपल्या सर्व कृती स्वार्थ केंद्रीत असतात , 


आपण  अहमच्या  जाणीवेत बद्ध आहोत , 

व 

अहमची जाणीवच  द्वैताचे  मुळ व अज्ञान आहे ,


आपण द्वैतात  व अज्ञानात अडकलेलो आहोत ,


आपल्या bondage विषयी सतत जागृत असणे meditation आहे . 


मी चा भास bondage आहे 


observer is different than observed 

हे bondage आहे . 


exp is --   --   --  --  --

   व 

   observer is observed ,


   ( consc. Joint phenomenon realisation  )


द्रष्टाच दृश्य आहे  ह्रे 

   अद्वैत बुद्धी आहे  ,

हा विवेक आहे ,

ही दिव्य दृष्टी आहे . 


बुद्धी , पुर्वधारणा , स्मृती व  अहम यांच्या चार अवस्थात्मक अज्ञानाच्या द्वैताच्या  पिंजऱ्यात आपण बद्ध आहोत ,


हा बोध  जिवन जगताना प्रतिक्षण  जागा असला पाहीजे .

असा बोध प्रतिक्षण  जागा असणे  हीच Real meditation ची खरी सुरवात आहे . 


आपले  मी पणाची जाणीव नेहमी कोणत्या  तरी अनुभवाशी जोडलेली असते 


अनुभवा शिवाय अनुभवणारा  अस्तित्वात नसतो ,


अनुभवणारा - अनुभव   ही जोडगोळी आहे ,


अनुभवणारा - अनुभव ही

consciousness ची  joint phenomenon आहे , 


असतात तेव्हा दोन्ही असतात व नसतात तेव्हा दोन्ही नसतात ,


एकाशिवाय दुसऱ्याला अस्तित्व नसते , 


अनुभव येण्यासाठी अनुभवणारा सोबत हजरच असला तरच अनुभव येत असतो ,

अनुभव व अनुभवणारा अभिन्न असतात ,


अनुभव illusion असतो व अनुभवणारा पण illusion च असतो . 


अनुभवणाऱ्या मुळे अनुभव  खरा ठरतो .


अनुभवणारा नसेल तर 

अनुभव - अनुभणारा  ही phenomenon निरास पावते . 

म्हणुन 

observer is observed 


experiencer is experienced 


Thinker is thought 


द्रष्टाच दृश्य आहे 


ही समज येणे  अत्यंत महत्वाचे आहे 


ही समज आली असता द्वैत बुद्धीचे रुपांतरण अद्वैत बुद्धीत होत असते .


observer is observed  ही समज आली असता 

observation without observer  चे  

प्रकटन होवुन  आपोआप त्या समजेत क्षणार्धात चारी अवस्था निरास  घडत असतो .


observer is observed  उमजणे 

 ही आत्मज्ञानाची गुरुकिल्ली आहे . 


अनुभव व अनुभणारा  ही  joint consciousness

phenomenon आहे हे उमजले पाहीजे .


द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न असतो शिकवणारे गुरु हे द्वैत बुद्धी अधिक दृढ करत असतात व अज्ञान अधिक वाढवत असतात हे उमजले पाहीजे . 


रात्री गाढ झोपेत जेव्हा  कोणताच अनुभव नसतो तेव्हा  अनुभवणाराही अस्तित्वात नसतो , तेव्हा आपण जिवंत आहोत की मेलेले आहोत याचेही भान नसते , आपण जंगलात पडलेलो आहोत की मच्छरदाणीत पडलेलो आहोत याचे ही भान नसते .


उगम पावतात तेव्हा द्रष्टा - दृश्य हे दोन्ही एकाच वेळी  उगम पावतात व लय पावतात तेव्हा दोन्ही एकाच वेळी  लय पावतात , 

असा बोध  आपला आपल्याला झाला पाहीजे , असा शोध आपला आपल्याला लागला पाहीजे .


सत्य भूतकाळ किंवा भविष्य काळात नसते तर 

सत्याची समज  जे मन सजग  निष्कामपणे वर्तमानात प्रस्थापित होते त्या मनात द्वैत बुद्धी रुपी अहमच्या  निरासात   सत्य प्रकट होत असते . 


निर्हेतुक मन क्षणार्धात  चार अवस्था निरासाला पावत परब्रह्म समजेला प्राप्त होत असते .


म्हणुन सर्व संत सांगतात 


मी कोण याचा शोध घ्या .


मन काय आहे याचा शोध घ्या ,


नाम - रुप काय आहे याचा शोध घ्या 


अनुभव - अनुभवणारा म्हणजे काय  याचा शोध घ्या ,


consciousness म्हणजे काय  याचा शोध घ्या ,


observer - observed  चा शोध घ्या ( JK )


experiencer - experience चा शोध घ्या ( JK)


Thinker - thought चा शोध घ्या 


consc. - content of consc. चा शोध घ्या 


seer - seen चा शोध घ्या ,


Analyser - Analysed  चा शोध घ्या 


Duality - Non duality चा शोध घ्या 


द्रष्टा - दृश्य  यांचा शोध घ्या  ( माउली ) 


बुद्धाचे  महासती पठ्ठाण मधे 


काये - कायानुपश्यी विहरती 


वेदने - वेदनानुपश्यी विहरती 


चित्ते - चित्तानुपश्यी  विहरती 


धम्मे - धम्मानुपश्यी  विहरती  


म्हणजे अगदी  

प्रत्येक क्षणी सजग रहात 

शरीराच्या स्तरावरील 

अनुभव - अनुभवणारा  

observer - observer मधे प्रस्थापित होवुन 

observer is observed या समजेत 

observation without observer ला प्राप्त होत

चार अवस्थात्मक / चार देहात्मक / चार कोषात्मक / चार 

 consciousness चे complete dissolution 

होणे  real meditation आहे .


आपल्या मनातील मी चा भास निरास होणे सार . एकदा द्रष्टा निरास झाला की दृश्य ही त्याच क्षणी निरास होत असते .

चारी अवस्थेतील द्रष्टा - दृश्य निरास होणे सार आहे .


Real meditation वर आता पर्यंत  शेकडो शेकडो चिंतने गेल्या  पाच वर्षात post झाली आहेत ,

जे  तळमळीचे मुमुक्षु  असतील  ते  त्या चिंतनाना अंतरंगात  अभ्यासुन  जिवन आचरणात Real meditation उतरवुन  अपरोक्ष अनुभुतीला प्राप्त होतील यात शंका नाही  .


observer is observed

 समजेत 

चार अवस्था निरास अपरोक्ष  अनुभुतीवर उमजणे सार आहे . 


हा निरास होत असताना मनाला सुषुप्तीत

 मृत्युच्या अपरोक्ष अनुभुतीतुन

न डगमगता जावे लागते जी फार फार कठीण गोष्ट आहे 

व  

फक्त  observer is observed  हे ज्या मनाला खरोखर उमजलेले असते  असेच मन  

conscious 

subconscious 

unconsious  अनुभवत , मृत्युला  समजेत स्वेच्छेने सामोरे जात  सुषुप्ती रुपी मृत्युचाहीचाही निरास अनुभवत तुर्येत प्रवेश करुन ब्रह्ममयता अपरोक्ष अनुभवत अद्वैत अवस्थेला प्राप्त होत नंतर  observer is observed  या समजेत तुर्ये पलिकडे जात  कालातीतच्या / eternity च्या समजेला

प्राप्त होत असते . 


" आपुले मरण पाहीले म्या डोळा "

(  space with center ) 


" मरण माझे मरुन गेले " 

( space without center )


या अपरोक्ष अनुभुती नंतरच Eternity वा Timeless ची समज अंतकरणात उमजत असते .

तेव्हा  ही  अपरोक्ष समज म्हणजे 

नुसत्या  ऐकीव वा वाचीव गप्पा कामाच्या नसतात तर त्या व्यक्तीच्या अंतरंग व्यक्तीमत्वात व जिवन मुल्यात तथा जिवन आचरणात आमुलाग्र परीवर्तन 

झालेले  सहज लक्षात येते . 


असो .


प्रतिक्षणी ,


 आपण कसे आपल्याच संस्कारात व मी पणात कसे  संस्कारबद्ध आहोत ,  या विषयी प्रतिक्षण  जिवन जगत असताना वर्तमानात समजपुर्वक  सजग असणे म्हणजे  real meditation आहे .  


बुद्ध यालाच आतापि सम्पजानो सतिमान म्हणतात  जे बुद्धचे सति पठ्ठाण आहे .


हेच  कृष्णमुर्तिंचे  moment to moment choiceless awareness आहे . 

तर 

 माउली   याला 


एकवेळ अवधान दिजे 

मग सर्व सुखासी प्राप्त होईजे

  हे प्रतिज्ञोत्तर माझे 

उघड ऐका  ll


किंवा 


एक अंतरी निश्चळ 

जे निहाळता केवळ 

विसरले सकळ 

संसारजात  ll   

    असे म्हणते . 


आज एव्हढे पुरे . 



09822992578


25-02-2023


vbpandhare@gmail.com 


..........................................

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या