10015 )चिंतन : खरे अध्यात्म Real spirituality

 चिंतन 10015: Real spirituality

Real spirituality


..........................................

Click on the following link for pdf👇👇

🌹 चिंतन 10015: Real spirituality🌹

.................................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

.....................

चिंतन : खरे अध्यात्म

🍁🍁एका साधक मित्राने प्रश्न विचारला आहे  की  मी  अध्यात्माचा अभ्यास पाच सहा वर्षा पासुन करत असुन  मी याबाबत खुप शोध  घेत आहे .
पण जितका जास्त शोध घ्यावा तितका  गोंधळ  जास्त वाढत आहे . 


(१)  धर्म / पंथ / संप्रदाय विविध आहेत. 


(२)  शास्त्रे विविध आहेत .


( ३)  पद्धती/ मार्ग / साधना 
      विविध आहेत .


 ( ४ ) मते विविध आहेत . 


(५)  गुरु विविध आहेत .


(६)  काही म्हणतात ईश्वर आहे ,काही म्हणतात ईश्वर नाही . 


(७)  काही म्हणतात सर्व मार्ग ईश्वरापर्यंत जातात .


(८) काही म्हणतात सत्या पर्यंत जाण्याचा कोणताही विशिष्ठ  मार्ग नाही .


(९)  काही म्हणतात  श्रवण व वाचनाने  सत्य आकलन होत असते .


(१०)  काही म्हणतात केवळ श्रवण व वाचन यानी  सत्याची प्राप्ती होत नाही .


(११)  काही म्हणतात फक्त नाम जपाने ईश्वर प्राप्ती होते . 


(१२)  काही म्हणतात फक्त कर्म मार्गानेच ईश्वरापर्यंत पोहोचता येते .


(१३)  काही म्हणतात  फक्त योगमार्गाने ईश्वर प्राप्ती होते .


(१४) काही म्हणतात फक्त भक्तीनेच  ईश्वर प्राप्त होतो .


( १५ )  काही म्हणतात फक्त 
ज्ञानमार्गानेच / वेदांतानेच सत्य प्राप्ती होते .


(१६)  काही म्हणतात  की  हिमालयात गेल्याशिवाय व  ब्रह्मचर्य पाळल्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही .

(१७)  काही म्हणतात  संसारात ,मुलाबाळात राहुन ही ईश्वर प्राप्ती होते .
(१८)  हिंदुंच्या  सहा  अस्तिक  शास्त्रात ही एकमत नाही . साही शास्त्रे वेगवेगळे बोलतात . या सहा शास्त्रातील  सांख्य व  वेदांत ईश्वर मानत नाही  तर वैशषीक ,न्याय , योग व पुर्व मिमांसा ईश्वर मानतात .
अस्तित्व निर्मीती प्रक्रिये विषयी या सर्व  सहा शास्त्रातही एक मत दिसत नाही . 


(१९) बौद्ध , जैन ,चार्वाक ईत्यादी   सहा नास्तिक शास्त्रे ईश्वर मानत नाहीत . 


(२०)  काही द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न आहे असे मानतात 
तर  
काही द्रष्टाच दृश्य आहे असे म्हणतात .


( २१)  काही ब्रह्म व परब्रह्म वेगळे आहेत असे मानतात तत काही  ब्रह्म व परब्रह्म एकच आहेत असे सांगतात .

 
(२२)  काही हे जग सत्य मानतात तर काही हे जग मिथ्या आहेत असे मानतात .


(२३)  काही हे जग स्वप्नाप्रमाणे  अस्तित्वातच नाही असे म्हणतात .


(२४)  काही पुनर्जन्म  आहे असे म्हणतात तर काही  पुनर्जन्म  नाहीच असे सांगतात  . 


(२५)  काही जण ईश्वर सगुण आहे असे म्हणतात तर काही जण ईश्वर  निर्गुण आहे असे म्हणतात . 


(२६)  काही ही सृष्टी ईश्वराने निर्माण केली असे म्हणतात तर  
या सृष्टी निर्मीतीला ईश्वर कारण नाही असे म्हणतात . 


असा प्रचंड गोंधळ अध्यात्मात आहे त्यामुळे  माझा गोंधळ झाला आहे .
ज्ञानेश्वरीत माउली म्हणते की चारी मार्ग एकच आहेत  व  माउली पुढे असेही म्हणते की  सर्व अठराही अध्यायात मी एकच गोष्ट सांगीतले आहे , मी वेगळे बोललोच नाही .


या सर्व बाबींचा  अर्थ समजावुन सांगण्याची विनंती आहे .

🍁🍁 

.............................................

यावर आपण  थोडक्यात  चिंतन करुयात ,  सर्व साधकाना भेडसावणारा  हा प्रश्न आहे .


ईतकी सारी मत मतांतरे  असणे म्हणजे  या  सर्व मंडळीना  अस्तित्व प्रक्रिये विषयी  clarity

नाही असेच म्हणावे लागेल  अन्यथा  ईतकी विभिन्न  मते निर्माणच झाली नसती .


अस्तित्व निर्मीतीची प्रक्रिया  सर्वासाठी एकच आहे  म्हणुन 

जर वेगवेगळे लोक वेगवेगळी भाषा बोलत असतील  तर  अस्तित्व निर्मीतीची प्रक्रिया सांगण्यात ते कुठे तरी कमी पडले असेच म्हणावे लागेल कारण खरोखर जर  दोन लोकाना आत्मज्ञान झालेले असेल तर  त्यांच्यात अस्तित्व प्रक्रिये विषयी दुमत असुच शकत नाही व  जर दोघात दुमत असेल तर मग त्या दोघात मतभिन्नता असुच शकत नाही . 


या सर्व मत मतांची चर्चा करुन वेळ घालवण्यापेक्षा आपण  

अध्यात्माची जी गुरुकिल्ली आहे किंवा अध्यात्माचे जे सार आहे  

त्यासंबंधी विचार करुयात . 


या गोष्टीचा शोध घेताना आपल्याला संत विचाराचा मागोवा घ्यावा लागेल व  संत विचाराच्या मागोव्यातच आपल्याला हा सर्व खुलासा होवु शकेल कारण संतानी  ही अस्तित्व निर्मीतीची प्रक्रिया आपल्या अंतकरणात अनुभवलेली आहे . जरी  अनेक संतानी  सत्य प्रकटनाचे मार्ग वेगवेगळे सांगीतले असतील तरी त्या सर्वांचा सार एकच आहे तो सार आपल्याला समजावुन घ्यावा लागेल . 


सर्व संतानी सांगीतले आहे की 

अस्तित्व  हे चार स्तरीय 

नाम - रुपात्मक आहे /  चार अवस्थात्मक / चार देहात्मक / चार कोषात्मक / चार वाचात्मक   consciousness  phenomenon  आहे  / चार अवस्थात्मक  मन प्रक्रिया आहे ,  हे प्रथम आपल्याला प्रथम समजुन घ्यावे लागेल  व consciousness चे / मनाचे  multiplication  / mutation होत हे अस्तित्व प्रकट होत असते 

हे समजुन  घ्यावे लागेल व  ज्या क्रमाने हे  अस्तित्व निर्माण झाले त्याच्या उलट्या क्रमाने या अस्तित्व प्रक्रियेचा होणारा लय जर आपल्याला real meditatiion मधील द्रष्टाच दृश्य आहे या अद्वैत समजेत जर  मनाचा संपुर्ण लय  किंवा  चारी अवस्थांचा संपुर्ण लय  किंवा चारी consciousness  चा संपुर्ण लय जर  अंतरात   अपरोक्ष अनुभवता आला तर आपल्या अंतरंगात संपुर्ण अस्तित्व  प्रक्रियेचे आकलन आपोआप होत असते . 


म्हणुन   

मनाचा संपुर्ण निरास  

किंवा  

मनाचा संपुर्ण मनोलय 

हीच  आत्मज्ञानाची गुरुकिल्ली आहे .


या  गुरुकिल्लीचा उहापोह विविध शब्दात  आपण  करुयात .


ही गुरुकिल्ली  विविध शब्दात संतानी वर्णन  केली आहे  ते विविध शब्द जर आपण नीट समजुन घेतले तर  सर्व संत एकच भाषा बोलत आहेत व आत्मज्ञानाची प्रक्रिया सर्व पद्धतीत एकच आहे असे आपल्या लक्षात येईल .


तुम्ही आस्तिक असो की नास्तिक 

तुम्ही कोणत्याही धर्माचे / पंथाचे / संप्रदायाचे  असोत 

सर्वासाठी  संपुर्ण  मनोलय हीच  आत्मज्ञानाची प्रक्रिया आहे  व  मनोलय अंतरात अनुभुत झाल्या शिवाय आपल्या भय , चिंता, दु:ख व काळज्या या मिटतच नसतात हे आपल्याला समजले पाहीजे . 


हा मनोलय  विविध पद्धतीने सांगीतला जातो  , कोणी कर्म करता करता मनोलय घडु द्या असे म्हणतात

 तर 

कोणी  योग करता करता मनोलय घडु द्या असे म्हणतात

 तर 

कोणी कोणी भक्ती करता करता मनोलय घडु द्या असे म्हणतात तर 

कोणी कोणी  ज्ञान मार्गाने

 वा

 वेदांत श्रवण मनन  करत मनोलय घडु द्या असे सांगतात ,

कोणी नामजप करता करता मनोलय घडु द्या असे सांगतात  पण  

मनोलयाची समज ही सर्वात जास्त महत्वाची बाब आहे हे आपल्याला समजेले पाहीजे ,  प्रार्थनेने ,पुजेने , नामजपाने कोणीतरी ईश्वर आपल्यावर कृपा करेल  अशा उद्देशाने जे साधना करतात त्याना मनोलयाची समज आलेलीच नसते व मनोलयाची समज आल्या शिवाय कधीच आत्मज्ञान प्रकटत नसते . 


हा मनोलय खालील विविध शब्दात संतानी मांडला आहे 

ही बाब  विविध शब्दात समजुन घेवुन जिवनात  real meditation समजुन  घेत आपणच आपल्या अंतरात मनोलय घडु देणे ही प्रत्येक साधकाची वैयक्तीक जबाबदारी आहे .  आपला मनोलय आपल्यालाच घडु द्यायचा असतो 

दुसरी व्यक्ती आपला मनोलय कधीच करु शकत नसते किंवा कोणाची कृपा सुद्धा आपला मनोलय घडवु शकत नसते . 


मनोलय खालील अनेक शब्दात सांगीतला गेला आहे त्या विविध शब्दावर  आपण एक नजर टाकु व  मनोलय हीच आत्मज्ञानाची गुरु किल्ली आहे हे समजावुन घेवु . मनोलय हा  द्वैत मन प्रक्रियेच्या समजेत घडत असतो .

द्वैत बुद्धीचे रुपांतरण जेव्हा अद्वैत बुद्धीत होते तेव्हाच संपुर्ण मनोलय घडत असतो मग  तुम्ही कोणत्याही धर्माचे वा पंथाचे वा संप्रदायाचे असा  नाहीतर आस्तिक असा वा नास्तिक असा  वा कोणत्याही साधना मार्गाचे प्रवासी असा . 


द्वैत मन प्रक्रिया समजुन घेणे 

, त्या समजेत द्वैत बुद्धीचे रुपांतरण अद्वैत बुद्धीत घडु देणे 

व 

त्या  द्रष्टाच दृश्य आहे  या अद्वैत समजेत  वैराग्याला व निष्कामतेला प्राप्त होवुन मनोलय घडु देणे हेच खरे आत्मज्ञान सुत्र आहे . 


ही  अद्वैत कुसरी ज्याला अवगत होईल त्याला आत्मज्ञान आपोआप होत असते .


✳️आत्मज्ञानाची  25   सुत्र  ✳️


(१) समुळ मन का अंत  

(२) समुळ विचारका अंत 


(३) समुळ संकल्प - विकल्पका अंत   


(४) समुळ अनुभवका अंत   


(५) समुळ अहंकारका अंत 


(६) समुळ चित्तका अंत 


(७) समुळ consciousness का अंत       

(८) समुळ द्वैतका अंत  


(९) समुळ द्रष्टा - दृश्य निरास   


(१०) चार अवस्था निरास


(११) चार देह निरास 


(१२) चार कोष निरास 


(१३) चार वाचा निरास 


(१४) चार consiousness निरास 


(१५) समुळ शब्द निरास 


(१६) मन और ईंद्रिय अनुभुतीका अंत 


(१७) वेदांत 

( ending of consciousness)

(  ending of knowledge ) 

( ending of knowingness)


(१८) ज्ञान बंध लय . 


(१९) संमोहन का अंत 


(२०) मै हुं  भाव का अंत 


(२१) conditioning का  complete अंत 


(२२) Ending of time  completely 


(२३) Ending of consciousness 


(२४) Ending of  

observer - observed 

phenomenon 


(२५) complete ending of experience 

.............................


या 25  पैकी  एक  बाब  जरी नीट समजली  तरी आत्मबोध प्रकटत असतो


हे सर्व समजणे म्हणजे अध्यात्म समज आहे  नाही तर जन्मभर  

घाण्याच्या बैलाप्रमाणे  गोल गोल फिरत रहाणे हे काही खरे अध्यात्म नाही . 


पण हा सर्व शोध आपला आपण जाणकाराच्या मार्गदर्शनात व सत्संगात घ्यायचा असतो . 


असो आज ईतके पुरे . 


हे अध्यात्म सार आहे  बाकी सर्व फाफट पसारा आहे अध्यात्माच्या नावाखाली , या मनोलयावर आता पर्यंत आपण  चार पाचशे चिंतने समुहावर post केली आहेत  त्या सर्व चिंतनाचे चिंतन मनन केले व जर आपल्याला आत्मज्ञानाची खरी तळमळ असेल तर  ही मनोलयाची समज आपल्याला प्राप्त झाल्या शिवाय रहात नाही .


This is  real  spirituality 


असो . 

..............................

- विजय पांढरे

9822992578

  30-01-2023 

vbpandhare@gmail.com

....................................

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या