10,067) चिंतन: Purpose of life

चिंतन10,067 : Purpose of life

चिंतन 10,067: The purpose of life


.............................

Click on the following link for pdf👇👇

🌹 चिंतन10067 : The purpose of life 🌹

 

 .............................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

........................

चिंतन क्र. 10,067
(  Purpose of life ) 


एका  अत्यंत सुक्ष्मबुद्धीच्या  मित्राने  " what is the purpose of life ? "
या विषयावर   समुहावर चिंतन होण्याची विनंती केली आहे .
गेल्या पाच सहा वर्षातील आपल्या  आठ दहा  समुहांवर post  झालेली  आपली 500-600  अंतरंग  चिंतने 

  याच विषया संदर्भात आहेत . 



(1)  Purpose of life  is to 

     understand life by life itself . 


Purpose of  life is to undestand  truth by truth itself.


Purpose of life is to understand eternity by eternity itself . 


अस्तित्व प्रक्रियेची  ओळख अस्तित्व प्रक्रियेला नसेल तर  

अस्तित्वाला काहीही अर्थ उरत नाही . 


अस्तित्व प्रक्रियेने , 

 अस्तित्व प्रक्रियेला शेंड्यापासुन मुळापर्यंत  अपरोक्ष जाणणे 


किंवा 


consciousness  प्रक्रियेने 

consciousness प्रक्रियेला 

शेंड्यापासुन मुळापर्यंत जाणणे 


किंवा  


मनाने मनाला  शेंड्यापासुन मुळा पर्यंत जाणणे


 किंवा 


मी ने मी ला  शेंड्यापासुन मुळापर्यंत जाणणे 


किंवा 


observer - observed phenomenon  ने 

 observer - observed 

phenomenon ( द्रष्टा - दृश्य प्रक्रिया ) ला 

शेंड्यापासुन  मुळापर्यंत जाणणे 


किंवा 


अनुभवाने   अनुभवाला 

शेंड्यापासुन मुळा पर्यंत जाणणे , 

यातच  fulfillment  of life आहे , otherwise  आपल्या  

जिवनाला काहीही अर्थ  उरत नाही . 


जे साधक अंतर्मुख असतात 

तेच हा प्रश्न विचारतात , 

आपले काही तरी चुकले आहे , 

आपण अज्ञानी आहोत , 

आपण आपल्या आवडीप्रमाणे , आपल्या मताप्रमाणे जे जे योग्य आहे असे समजुन , जे जे करत असतो ते अधिकाधीक दु:खच निर्माण करत असते हे ज्याच्या लक्षात येते तोच  अंतर्मुख होवुन आपल्या दु:खाचे , असमाधानाचे , अतृप्तीचे ,

आपल्या आंतरीक रीक्ततेचे 

कारण शोधत असतो . 


या  आंतरीक  असमाधानाचा व आंतरीक  अतृप्तीचा निरास केवळ  एखाद्याला  गुरु करुन  किंवा

 ग्रंथ ,पुस्तके ,शास्त्रे वाचुन  व प्रवचने ऐकुन

किंवा 

 हेतुपुर्वक  पुजा प्रार्थना करुन  

किंवा 

यंत्रवत  साधना  करुन ,  यंत्रवत नामजप करुन  लागत नसतो .


 ज्याला  आत्मबोधाची  खरी आंतरीक तळमळ व कळकळ आहे , 

जो  निष्काम आहे , 

जो साधा भोळा व प्रामाणीक आहे , 

जो निस्वार्थी आहे , 

ज्याचे शरीर मन , बुद्धी , ईंद्रिये , विचार , स्मृती , अनुभव  व अहमशी समजेतुन  तादात्म्य तुटलेले असते ,

 जो  खरोखर निरीच्छ व  स्वार्थरहीत असतो , 

ज्याचे पंचभुतांशी , गुण , आकाराशी व  

चारही अवस्थांशी , चारी देहांशी 

 समजेतुन तादात्म्य तुटलेले असते ,  

जो समजेतुन नाम - रुपाची म्हणजे द्वैत बुद्धीची  व्यर्थता समजुन ,  द्रष्टाच दृश्य आहे या आंतरीक  समजेत  द्वैत बुद्धीचा समुळ  निरास real meditation मधे  खोल खोल  अंतरंगात म्हणजे चारी अवस्थात  घडु  देतो , त्यालाच सत्याचा बोध होत असतो . 


जन्मणे  ,  बाल तरुण वृद्ध होणे , खाणे पिणे , झोपणे , पदवी घेणे , लग्न करणे ,  मुलांना जन्म देणे , पद  प्रतिष्ठा  प्रसिद्धी , समृद्धी विकास व  भौतिक प्रगती प्राप्त करणे  व शेवटी  अज्ञानातच  दु:खात  रोगग्रस्त होवुन  मरुन जाणे हा   purpose of life  नाही .


आत्मबोध   होण्यासाठी साधक पात्र असावा लागतो व  पात्र  साधकाच्या कानावर  अपरोक्ष ज्ञानी व्यक्तीचे  बोल पडणे अत्यावश्यक असते . 


जो पर्यंत  साधक विवेकातुन  म्हणजे द्रष्टाच दृश्य आहे या आंतरीक बोधातुन , वैराग्याला म्हणजे choiceless awareness ला प्राप्त होत नाही , तो पर्यंत  आत्मबोधाचे प्रकटन होत नसते . 


द्रष्टाच दृश्य आहे ही समज न येता , केवळ साधना  करुन , शास्त्रे अभ्यासुन , ग्रंथ अभ्यासुन ,  गुरु सेवा करुन ,  नामजप करुन , पुजा प्रार्थना करुन , वाऱ्या करुन ,   आम्ही आत्मबोधाला प्राप्त होवु असे ज्याना वाटते ते  मुर्खाच्या नंदनवनात वावरत असतात . 


जे  गुरु शिष्य बंधनात अडकलेले असतात , जे  एखाद्या  पंथ संप्रदायात किंवा एखद्या संकुचित  धर्मात  अडकले असतात , जे स्वत:च्या मान्यतात व श्रद्धेत व विश्वासात अडकलेले असतात  ते स्वचा  निरास कधीच करु शकत नाहीत म्हणुन  अशा लोकाना आत्मबोध कधीच होत नसतो . 


आत्मबोध प्रकटनासाठी मनाची निष्कामता  ही  अत्यंत अनिवार्य अशी प्राथमीक अट आहे . 


ज्या मनात काही  हेतु असतो  त्या मनाला कधीही आत्मबोध होत नसतो . 


जे  बहिर्मुख द्वैतसाधनेत अडकले आहेत , 

ज्याना ईश्वर दर्शनाची ईच्छा आहे , 

ज्याना सत्याची ईच्छा आहे  , 

 ज्याना आनंदाची  ईच्छा आहे , 

ज्याना सुखप्राप्तीची ईच्छा आहे ,

ज्याना काही तरी व्हायचे आहे , 

ज्याना गुरु व्हायचे आहे ,

ज्याना आश्रम स्थापन करायचे आहेत , 

जे  गुरु बाजीत , पंथ व संप्रदायात अडकलेले आहेत  ज्याना पंथ व संप्रदाय  व शिष्य परीवार  वाढवायचे आहे , 

ज्याना  मोठेपणाची , एश्वर्याची ,  अमरत्वाची ईच्छा आहे 

त्याना आत्मबोध कधीच होत नसतो . 


जे एखाद्या  मान्यतेत अडकलेले असतात , जे एखाद्या  गुरुत अडकलेले असतात , जे  एखाद्या शास्त्रात अडकलेले असतात , जे  एखाद्या नामजपात अडकलेले असतात , जे आत्मसंतुष्टी शोधत असतात ,  जे आत्मबोधासाठी निश्चयपुर्वक प्रयत्न करतात ,  त्याना आत्मबोध कधीच होत नाही . 


या  वर चर्चा केलेल्या बाबी ज्या मनाला समजत नसतात ते मन आत्मबोधासाठी पात्र मन नसते . 


अंतरमनात  आंतरीक समज न येता ,  विशिष्ट पोशाख घालणे , गंध टिळा लावणे , माळा परीधान करणे , दाढी मिशा वाढवणे  ,

घरदाराचा त्याग करणे ,

ब्रह्मचर्य पाळणे  ही खऱ्या साधकाची लक्षणे नाहीत . 


ज्याना  वैकुंठाची किंवा स्वर्गाची किंवा पुण्याची किंवा  सात्विकतेची  किंवा अत्यानंदाच्या प्राप्तीची ईच्छा आहे त्याना तर आत्मबोध कधीच होत नसतो . 


जे मन सुख दु:खापलिकडे जाते  ,

जे मन आसक्ती - द्वेषा पलिकडे जाते , 

जे मन आवड - निवड पलिकडे जाते , 

जे मन पाप पुण्या पलिकडे जाते , 

 जे मन  ज्ञान अज्ञाना पलिकडे जाते ,  

जे मन द्वैत - अद्वैता पलिकडे जाते ,

 जे मन जाणीवे - नेणीवे पलिकडे जाते , 

जे मन  जीव - ब्रह्मा पलिकडे जाते ,

जे मन गुण आकारा पलिकडे जाते ,

जे मन नाम - रुपा पलिकडे जाते , 

जे मन  पंचभुता पलिकडे जाते , 

जे मन  चार अवस्था पलिकडे जाते , 

जे मन  जीवभावा पलिकडे जाते , 

जे मन ब्रह्मभावा पलीकडे जाते , 

जे मन  मनापलिकडे जाते , 

जे मन सर्व अनुभवा पलिकडे जाते ,

जे मन  आत्म - अनात्म   पलिकडे जाते ,

जे मन सगुण - निर्गुण पलिकडे जाते , 

जे मन रुप - अरुपा पलिकडे जाते . 

जे मन जन्म मृत्यु पलिकडे जाते ,

ज्या मनात  मी आहे हा भाव समुळ निरास पावतो त्याच मनात आत्मबोध प्रकटतो . 


जे मन  समज न येता , एखाद्या गुरुत  किंवा एखाद्या शास्त्रात  एखाद्या पंथ संप्रदायात , एखाद्या नामजपात अडकते त्या मनात  कधीच आत्मबोध प्रकटत नाही . 


purpose  of life समजुन घ्यायचा   असेल तर  समज आलेले सत्यशोधक ,निष्काम व  सजग  निर्विकल्प मनाची आवश्यकता असते . 


ईश्वर ,मोक्ष ,  स्वर्ग , वैकुंठ , आनंद , सुख , सत्य , अमरत्व , आत्मा , ब्रह्म ,  अशा मान्यतेत अडकलेल्या व त्या मान्यतेचा पाठपुरावा करणाऱ्या मनाला  कधीच आत्मबोध होत नसतो . 


आपणच आपल्या  अनुभवा  विषयी प्रतिक्षण  समजपुर्वक सजग निर्विकल्प  राहीले पाहीजे , 


आपण कसे अज्ञानात अडकलेलो आहोत ,


आपणच मी आहे या भावात कसे अडकलो आहोत ,


आपणच  द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न आहे  या  द्वैतात कसे अडकलो आहोत , 


आपण भ्रमात कसे अडकलो आहोत ,


आपण कसे आपल्याच संस्कारात बद्ध आहोत , 


आपण कसे आपल्याच संमोहनात अडकलो आहोत , 


आपण कालचक्रात कसे बद्ध आहोत ,


आपण भवचक्रात कसे बद्ध आहोत , 


आपणच  पंचभुतात कसे अडकले आहोत ,


आपणच  पुर्वसंस्कारात कसे अडकले आहोत , 


आपणच  पुर्वस्मृतीच्या past momentum मधे कसे अडकलो आहोत ,


आपणच मी - माझ्या  मधे कसे अडकले आहोत , 


आपणच आपल्यालाच कसे फसवत आहोत  या विषयी प्रतिक्षण समजपुर्वक   सजग निर्विकल्प  रहाणे  real meditation आहे . 


जे मन आपल्या सर्व मान्यता , 

सर्व श्रद्धा , सर्व कल्पना , सर्व विश्वास , सर्व संस्कार  व मी आहे या भावा पलिकडे जाते त्याच मनाला अस्तित्व प्रक्रियेचा बोध होतो 

 व  

अस्तित्व प्रक्रियेचा बोध अस्तित्व प्रक्रियेला होणे  म्हणजे

  चार अवस्थांचा अपरोक्ष बोध चार अवस्थाना होणे ,

किंवा 

चार देहांचा बोध चार देहाना होणे 

किंवा 

चार consciousness चा अपरोक्ष बोध चार  consciousness  ला होणे ,

 हाच purpose of life  आहे . 



one must be capable of seeing false as false . 


If you can not see false as false then you will never understand the अस्तित्व प्रक्रिया . 


To perceive truth  you must be free of  false .


To perceive truth you must be free of  mind and seses completely . 


पाचही ईंद्रिया पलिकडे  व मना पलिकडे  गेल्या शिवाय  अस्तित्व प्रक्रियेचा बोध अस्तिव प्रक्रियेला होत नसतो . 


To perceive truth you must be free of fear .


To perceive truth you must be free of greed .


To perceive truth you must be  free of desire .


To perceive truth you must be free of  idea of   self . 


The very idea of self is the real hinderance to the manifestation of eternity .


शास्त्रे , पुस्तके ,ग्रंथ  वाचुन व 

प्रवचन ऐकुन , 

अस्तित्व प्रक्रियेचा बोध अस्तित्व प्रक्रियेला होत नसतो . 


अस्तित्व प्रक्रियेचा बोध होण्यासाठी  प्रथम आपले मन आत्मबोधासाठी पात्र असावे लागते  व   ज्या व्यक्तीला अंतरंगात  अस्तित्व प्रक्रियेचा अपरोक्ष बोध झाला आहे अशी व्यक्ती जिवनात यावी लागते .


मी आहे  या भावाचा निरास  द्रष्टाच दृश्य आहे या समजेत कसा होतो ती गुरुकिल्ली  असा अपरोक्ष ज्ञानी समजवत असतो व आपले मन पात्र असेल तरच  

द्रष्टाच दृश्य आहे  या शब्दाचा खरा अपरोक्ष बोध  पात्र मनात प्रकटत असतो , दुसरा उपाय नाही . 


ज्या मनातुन  मी कोणी एक seperate  individual  आहे ही कल्पना निरास पावते त्याच मनात  consciousness  unfolding ची म्हणजे चार अवस्था निरासाची घटना अवतरत असते . 


ज्या मनातुन मी  कोणी तरी seperate  individuality

आहे हा भ्रम निरास पावतो 

तेच मन दिव्य दृष्टीला प्राप्त होते व   ज्या मनात  दिव्य दृष्टी प्रकटते त्याच मनात चार अवस्था निरासाची घटना अवतरीत होते . 


गुरु , ग्रंथ , पंथ , शास्त्रे , साधना, नाम जप , मुर्ति ,   संप्रदाय , आत्मा , ब्रह्म ,  मनुष्य आकारातील देव , ईश्वर व अहम  

या कल्पनेत अडकलेल्या 

मनाला कधीही  अस्तित्व प्रक्रियेचा बोध होत नाही . 


गुरु , पंथ व संप्रदायांच्या कल्पनेत अडकलेले मन  संमोहीत  व बेहोष मन असते . बेहोष मनात  चार अवस्था निरासाची अपरोक्ष अनुभुती कधीच प्रकटत नाही . 


द्रष्टाच दृश्य आहे ही दिव्य समज 

आत्मबोधासाठी अनिवार्य अट आहे .


पारंपारीक गुरु व पारंपारीक ग्रंथ तर द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन  असल्याची अज्ञानी शिकवण देत असतात . सुषुप्तीला गाढ झोप असे जे गुरु म्हणतात त्याना सुषुप्तीचा अपरोक्ष बोध नसतो . 


सुषुप्ती सुखाची अवस्था आहे .


सुषुप्ती आनंदाची अवस्था आहे 

असे म्हणणे शुद्ध अज्ञान आहे . 


खरे तर सुषुप्ती ही अत्यंत टोकाच्या भयाची म्हणजे मृत्युची अपरोक्ष अनुभुती आहे .


या  भयाचा  समजेत निरास झाला असता  ब्रह्ममयतेची अनुभुती प्रकटते . 


"आपुले मरण पाहीले म्या डोळा "


" मरण माझे मरुन गेले "


" तुका आकाशा एव्हढा " 


ही  अनुभुती अपरोक्ष प्रकटणे  

Purpose of life आहे . 


ही अनुभुती प्रकटणे  ही काही कोणा एकाची बपौती नाही .


प्रत्येकाच्या अंतकरणात ही अपरोक्ष अनुभुती प्रकटु शकते . 


ज्याना  आत्मबोधाची  अत्यंत तळमळ आहे , कळकळ आहे , 

जे अत्यंत  प्रामाणीक व सजग  निष्काम आहेत त्या अंतकरणात ही अपरोक्ष अनुभुती प्रकटु शकते . 


केवळ शास्त्रे , ग्रंथ वाचुन  व  

पारायणे करुन  ही अपरोक्ष अनुभुती अंतकरणात प्रकटत नसते . 


मी  ज्या मनाला खरा वाटतो त्या मनाला जगही खरे वाटते  व  मी ज्या मनाला खरा वाटतो त्या मनाला अस्तित्व प्रक्रियेचा बोध कधीच प्रकटत नसतो . 


नुसता जागृतीतील मी नाही तर  चारी अवस्थातील मी चा निरास ज्या मनात प्रकटतो त्याच मनाला 

अस्तित्व प्रक्रियेचा बोध होत असतो . 


चारी अवस्थातील मी आहे हा भावच  आत्मज्ञानातील खरा अडसर आहे . 


पुन्हा एकदा  वर  सांगीतलेल्या चिंतनाचा सार थोडक्यात पाहु . 


परमेश्वरा विषयी  , परमात्म्या विषयी  ज्या काही  श्रद्धा , विश्वास व मान्यता आमच्या मनात पुर्वसंस्कार म्हणुन ठसवल्या गेल्या असतात त्या पुर्व मान्यता व  

पुर्व श्रद्धा याच  आत्मबोधात अडसर असतात  व जो पर्यंत  या पुर्व श्रद्धा किंवा पुर्व  मान्यता मधे 

आपले मन अडकलेले असते तो पर्यंत  आत्मबोधाचे अवतरण होत नसते . 


आपण असे  पुर्व श्रद्धा व मान्यता मधे म्हणजे भुतकाळात बद्ध आहोत  हे लक्षात येणे 

पहिली पायरी आहे .  


प्रतिक्षणी जे अनुभव आपल्याला येत असतात  ते सर्व आपले पुर्वसंस्कार असतात याचे भान प्रतिक्षण असणे म्हणजे  real meditation होय . 


ज्याला आपण वर्तमान म्हणतो तो भुतकाळच असतो  हे स्पष्ट  उमजणे सार आहे . 


वर्तमान काळातले सर्व  अनुभव 

हे  पुर्वसंस्कार आहेत हे समजण्यासाठी अत्यंत  चौकस अशा  संवेदनाक्षम मनाची आवश्यकता असते . 


कृष्णमुर्ति सारख्यांचा सत्संग जर आपल्याला  जर समजला तर ही बाब प्रकर्षाने  लक्षात येते .


जे जे अनुभवाला येते ते ते आपलेच पुर्वसंस्कार आहेत हे 

अंतरंगातुन खरोखर समजले पाहीजे .


पुर्वसंस्कार   म्हणजे observer

व 

पुर्वसंस्कारच  वर्तमानात अनुभवाला येत असतात म्हणुन 

observer is observed  हे बुद्धीच्या स्तरावर प्रथम समजणे  गरजेचे आहे . 


observer - observed ही एक joint  mind - matter 

phenomenon आहे . 


प्रतिक्षण  या 

observer - observed 

phenomenon  विषयी  

सजग असणे म्हणजे  

real meditation आहे . 


वर्तमानातील  सर्व अनुभव  जेव्हा observer is observed या बोधात निरास होतात तेव्हा  परमसत्य अवतरत असते . 


observer is observed 

या आंतरीक बोधातच 

परमसत्याचा बोध प्रकटत असतो .  हे सर्व अंतरंगात प्रत्यक्ष  अपरोक्ष अनुभवले गेले पाहीजे . 


observer is observed  

हे  खरोखर समजले तर  मी आहे  या  भासाच्या निरास  सर्व भुतकाळाचा निरास घडणे सार आहे . हे सर्व   unfolding of consciousness  घडताना 

जीव  भयंकर अशा  अनुभवातुन पलिकडे जात असतो . या भयंकर अनुभवाना तोंड देण्यासाठी  टोकाचे धैर्य व  समज लागत असते . 


observer is observed या 

समजे विना जे ज्ञान असते ते  स्थुल बुद्धीच्या स्तरावरील शाब्दीक  ज्ञान असते . शाब्दीक ज्ञान हे निर्जीव ज्ञान असते . 

शाब्दीक ज्ञान कधीही  आत्मबोध प्रकटन करु शकत नाही . 


ज्या मनात द्रष्टाच दृश्य आहे या  समजेत चार अवस्था निरासात आत्मबोध प्रकटत असतो त्या मनात  शोधाचे कार्य थांबुन जात असते  व अशा मनात आता कोणतीही शंका शिल्लक राहीलेली नसते . 


ज्या मनात खरोखर आत्मबोध प्रकटलेला नसतो अशा मनात  मात्र  शंका व शोध  घेण्याची खटपट  सुरुच रहात असते . 


वर्तमानातील  अनुभवासोबत  असलेल्या मी आहे या भासाचा शेंड्यापासुन मुळापर्यंत म्हणजे चारी अवस्थात शोध घेणे म्हणजे real meditation  आहे .


चारी अवस्थातील मी आहे हा भास निरास होणे आत्मबोधाची गुरुकिल्ली आहे . 


या साठी  

मी कोण ?

मन काय आहे ? 

consciousness काय आहे ? 

द्वैत काय आहे ? 

अद्वैत काय आहे  ?

याचा शोध प्रत्येकाने अंतरंगात घेणे गुरुकिल्ली आहे .


आपले  मन , आपली पाचही ईंद्रिये , आपली बुद्धी , आपले विचार , आपले विचार , आपला अहम  व आपले 

अनुभव  हा सगळा भ्रमाचा 

खेळ आहे  हे उमजणे सार आहे . 


मी खरा आहे असे वाटले तर मग जग ही  खरे भासत असते 

व 

एकदा जर  

observer is observed 

या  खरोखरच्या आंतरीक बोधात 

 मी खोटा आहे  अशी खरोखर खात्री झाली  तर  मी च्या भासाच्या निरासात  चारी अवस्था निरास पावुन शब्दातीत  परब्रह्म बोध प्रकटत असतो . 


शब्दातीत  परब्रह्म म्हणजे 

चारी अवस्थांचे  त्रिकालाबाधीत

पंचभुतातीत , भावातीत , गुण आकारातीत  अधीष्ठान . 


अशी त्या शब्दातीताची अपरोक्ष 

ओळख म्हणजे  संपुर्ण  अस्तित्व प्रक्रियेची शेंड्या पासुन मुळा पर्यंत ओळख . 


चारी अवस्थातील मी आहे हा

द्रष्टा - दृश्याचा भासच  बंधन आहे  जो  काल्पनिक  मी ने निर्माण केलेले  ईंद्रजाल आहे . 


मी आहे या चारी अवस्थेतील  भासाच्या समजेतुन होणाऱ्या निरासात  eternity  चा बोध 

eternity   ला होत असतो . 


असा बोध अंतरात न प्रकटता शास्त्रे व ग्रंथ वाचुन ही काही  लोक  आंतरीक अनुभुतीविना  निरुपण करत असतात पण 

मग  त्यांच्या निरुपणात  

द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न असतो   असे  सांगणे

 किंवा 

  सुषुप्ती गाढ झोप असते असे अज्ञान ते सर्रास सांगत असतात . 

असे अज्ञानी गुरु नाम जपा सारख्या  द्वैत साधना शिकवत असतात . 


द्रष्टाच दृश्य आहे या समजेतुन 

चारी अवस्थातील , 

मी आहे या भासाच्या निरासाची  म्हणजे निर्विकल्प निरीक्षणाची  कला  केवळ  बुद्ध , कृष्णमुर्ति व माउली सारखे अपरोक्ष ज्ञानी 

सांगत असतात . 


माउली म्हणते , 


ना तरी जाणीवेच्या आयणी ।

करता दधी कडसणी ।

मग नवनीत निर्वाणी ।

 दिसो लागे ॥



एक अंतरी निश्चळ ।

जे निहाळता केवळ ।

विसरले सकळ  ।

संसारजात  ॥


असो .


हे सर्व अंतरंगात उमजणे  

Purpose of life आहे . 

...............


- विजय पांढरे

9822992578

25-04-2023

you tube channel

"  vijay pandhare "

vbpandhare@gmail.com

..........................................

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या