16 ) चिंतन : अवधान पूर्ण निष्कामता

 

चिंतन 16 : अवधान पूर्ण निष्कामता

निर्विकल्प सजगता



.............................

Click on the following link for pdf👇👇

🌹चिंतन 16 : अवधान पूर्ण निष्कामता 🌹

 .............................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

...........................

चिंतन


सर्व संत आत्मज्ञानाचा एकच मार्ग सांगतात.


बुद्ध त्याला " एकायनो मग्गो" म्हणतात


कृष्णमुर्ति "The only path"

म्हणतात.


माउली म्हणते,


गीतेत व ज्ञानेश्वरी मध्ये सांगीतलेले चार मार्ग भिन्न भिन्न नसुन खरा मार्ग एकच मनाची संपुर्ण "अवधान पुर्ण निष्कामता " हाच आहे हे ज्याला समजल त्यालाच ज्ञानेश्वरी समजलेली असते.

 ज्या मनाला चारी मार्ग भिन्न भिन्न वाटतात त्या मनाला गीता व ज्ञानेश्वरी अजिबात समजलेली नसते .

हे अध्याय अठरा मधे माउलीने नमूद करून ठेवले आहे.

बुद्धाने या निष्काम मतीसाठी

जो वैश्विक मार्ग सांगितला आहे तो

शिल -समाधी - प्रज्ञा आहे.

 जी सर्व मानवजातीच्या मनाला लागू आहे व सर्व संतांनी ही हाच मार्ग विविध शब्दात सांगीतला आहे .


सर्व संत संपूर्ण मनाची समुळ शुद्धी सांगत आहेत हे उमजले पाहीजे व Real meditation

हाच संत उपदेशाचे सार आहे.


शिल -समाधी - प्रज्ञा

👇👇

शिल समाधी पुष्ट करते.


समाधी प्रज्ञा पुष्ट करते

 पुन्हा मग


प्रज्ञेमुळे शील जास्त पुष्ट होते.


शिलामुळे समाधी जास्त पुष्ट होते


समाधीमुळे प्रज्ञा जास्त पुष्ट होते


प्रज्ञेमुळे शिल अजून जास्त पुष्ट होते.


शिला मुळे समाधी अजुन जास्त पुष्ट होते व समाधी मुळे प्रज्ञा अजून जास्त पुष्ट होते .


प्रज्ञा जेव्हा परीपुर्ण पुष्ट होते तेव्हा पंचस्कंध विघटन म्हणजे eradication of complete

observer observed phenomenon


किंवा चार अवस्था निरास घडून निर्वाण प्रकटते.


असा प्रवास अंतरंगात होत असतो. याचे वर्णन संत विविध शब्दात करतात.


सर्व संत बाहयमन शुद्धी व

आंतरमन शुद्धी विषयी बोलत आहेत हे आपल्याला समजले पाहीजे.

ज्यासाठी


i)मी म्हणजे काय?


ii) मन म्हणजे काय ?


iii)द्वैत म्हणजे काय ?


iv) अनुभव म्हणजे काय ?


v)  द्रष्टा म्हणजे काय?


vi ) दृश्य म्हणजे काय ?


vii ) द्रष्टा - दृश्य प्रक्रिया म्हणजे काय ?


viii)Real meditation म्हणजे काय?


ix) observation without observer म्हणजे काय?


x) observer is observed म्हणजे काय?


xi) Experience म्हणजे काय ?


या सर्व बाबी आपल्या आपण शोधल्या पाहीजे


हेच बुद्धाचे महासती पठ्ठाण


हेच


माऊलीचे अमृतानुभवातील अज्ञान खंडन प्रकरण



हेच कृष्णामुर्तिचे Real meditation

आहे.

असो .

..............

- विजय पांढरे


9822992578


30-01-2022


vbpandhare@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या