15 ) चिंतन : मी ची मज व्यालो .. ( अभंग चिंतन )

चिंतन 15 : मीची मज व्यालो । पोटा आपुलिया आलो ....

संत तुकाराम अभंग चिंतन : मी ची मज व्यालो । पोटा आपुलिया आलो ॥

......................... 

Click on the following link for pdf👇👇

🌹 चिंतन 15 : मीची मज व्यालो ... ( अभंग चिंतन )🌹

 .............................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

...................

चिंतन

संत तुकाराम यांचा अभंग जो खालील प्रमाणे आहे.
या आत्मज्ञान व आत्मानुभुतीपर अभंगावर आपण चिंतन करणार आहोत ..
अभंग खालील प्रमाणे आहे.
you tube वर Audio स्वरुपात हा अभंग ऐकण्यात आला व आपल्या समुहावरील मिरजेच्या Dr साहेबानी या अभंगावर निरुपण करण्याची विनंती केलेली आहे ..
थोडक्यात अभंगाचा भावार्थ आपण पाहू, कारण आत्मानुभुती नसेल तर या अभंगाच्या शब्दाचे लक्षार्थ मनाला समजणे शक्य नाही.

अभंग असा आहे -👇👇

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿


मी ची मज व्यालो ।

पोटा आपुलिया आलो ॥धृ॥


सावलीची आस ना ।

कोवळेसे उन मी ।

सुर नाही संगती ।

 एक तरीही धुन मी ॥


ज्यात डोकावेन मी ।

ते मनाचे बिंब मी.. ।

जन्म हेलावेल ।

 ते उसासे चिंब मी ॥


नाव नाही ज्यास काही ।

 तो अनोखा रंग मी ।

जो पुरेल जन्म सारा ।

 तो सोबतीचा चंग मी ॥


काळजात करुणेचा ।

उसळलेला डोंब मी ।

 हर क्षणाला कल्पनेचा ।

जन्मलेला कोंब मी ॥


शोधताना वाट माझी ।

होत माझा त्रास मी ।

मोजताना श्वास माझे ।

 अंतरीचे हास्य मी ॥


दोन्ही कडे पाहे ।

तुका आहे तैसा आहे ॥


-तुकोबा

🍁🍁🍁🍁🍁


धृवपदावर आधी आपण चिंतन करुयात कारण धृवपदात मध्यवर्ति सुत्र आहे व मग संपुर्ण अभंग धृवपदातील मध्यवर्ती सूत्रातुन फुललेले आत्मानुभुतीपर काव्य आहे...


मीच मज व्यालो ।

आपुलिया पोटा जन्मा आलो ॥


संत तुकाराम महाराजानी


खऱ्या ध्यानात जी ब्रह्ममयता/ तुर्या / universal consciousness अपरोक्ष अनुभवले व तिचे अगदी यथोचित


"तुका आकाशा एव्हढा "


असे वर्णन केले त्या अपरोक्ष आत्मानुभुतीतून या धृवपदाचा जन्म झालेला आहे.


हे जे काही विश्व निर्माण झाले आहे ते universal consciousness म्हणजे ब्रह्माचेच mutation किंवा अविष्कृती किंवा version आहे ...


संपूर्ण विश्व ब्रह्माठायीच प्रकट झालेले असल्याची प्रत्यक्ष अनुभुती महाराजांच्या अंतरंगात प्रकटली तेव्हा या धृवपदाचा जन्म झालेला आहे.


तुर्ये ठायी सुषुप्ती ,

 सुषुप्तीतून स्वप्न ,

व स्वप्नातून जागृती कशी निर्माण होते

किंवा

universal consc.(unlimited space)

unconscious (limited space)

subconscious (dream state)

conscious state


या consciousness च्या अंतरंगातील उलट्या प्रवासात हा विश्व निर्मीतीचा खेळ त्यांना अंतरंगात जेव्हा ध्यानात उमजला, तेव्हा झालेला हा विश्वनिर्मीतीचा आत्मबोध आहे.

खरे म्हणजे ही तुर्या रूपी observer is observed द्रष्टाच दृश्य आहे येथे seperate मी नाहीच ही आत्मानुभुती आहे .


जे Non duality रुपी स्वसंवेद्य द्रष्टा दृश्यरुपी - ब्रह्ममयतेचे तंतोतंत वर्णन आहे. ज्याला विज्ञानमय कोष किंवा महाकारण देह म्हणतात.

जे स्व च्या भासाच्या वैश्विक स्वरुपाचे वर्णन आहे.

observer is observed म्हणजे स्वसंवेद्यता..

ब्रह्म स्वसंवेद्य आहे.

जी

 "मीच मज व्यालो । आपुलिया पोटी जन्मा आलो ॥ "

 ही द्रष्टाच दृश्य आहे अशी आत्मानुभुती आहे.


पहिले चरण आहे


सावलीची आस ना ।

 कोवळेसे उन मी ।

सुर नाही संगती ।

एक तरी ही धुन मी ॥


हे जे चरण आहे ते चरण

म्हणजे सुषुप्तीची अपरोक्ष अनुभुती आहे जे Individuality चे म्हणजे जीवभावाचे बीज आहे.


एखाद्या फुग्यात जर प्रकाशाचे व सावलीचे उदय व्यय होणारे अगणीत dots खच्चून भरले तर जी अनुभुती येते तशी साधारण ती अनुभुती आहे त्या अनुभुती साठी खरे तर शब्द तसे अपुरेच आहेत पण साधारण शब्दात जितके वर्णन करता येईल तितके वर्णन महाराज करत आहेत.


महाराजानी त्या प्रकाश सावलीच्या dots च्या अनुभुतीला उन सावलीची उपमा दिली आहे जी योग्यच आहे.


तेथे ही जी प्रकाश व सावलीची fragmented space ची अनुभुती आहे ती मीच आहे अशी स्पष्ट आत्मानुभुती येथे सांगीतली जात आहे.

त्या जीवभावाच्या बीजाच्या ठायी

शरीर नाही, इंद्रिय नाहीत व अवयव ही नाहीत पण मी आहे हे जीवभावाचे बीज मात्र तेथे स्पष्ट अशा सुषुप्तीच्या रुपात तेथे आहे म्हणुन त्या अनुभुतीचे वर्णन तुकाराम महाराज ,


"सुर नाही संगती । एक तरीही धुन मी ॥ "


असे अत्यंत समर्पक पणे अपरोक्ष अनुभवामुळेच कौश्यल्याने शब्द योजना करुन सांगत आहेत.

खरे म्हणजे सुषुप्ती अवस्थेतील observer is observed

म्हणजे

द्रष्टाच दृश्य असलेल्या fragmented duality state चे ते तंतोतंत वर्णन आहे जो प्राणमय कोष किंवा कारण देह आहे..

जे पिंडाचे म्हणजे जीवभावाचे वर्णन आहे.

observer is observed

ची घोषणा आहे ही.


observer is observed

म्हणजे स्वसंवेद्यता.

सुषुप्ती स्वसंवेद्य आहे.

जी 

"मीच मज व्यालो ।आपुलिया पोटी आलो ॥ "

ची आत्मानुभूती आहे.


दुसरे चरण आहे.


ज्यात डोकावेन मी ।

ते मनाचे बिंब मी ।

जन्म हेलावेल ।

ते उसासे मी ॥


सुषुप्तीतुन म्हणजे प्राणमय कोषातुन ,

मनोमय कोष

म्हणजे स्वप्नावस्था

निर्माण होते तेव्हा जे मनाला विविध प्रकारचे अनुभव येतात व प्रत्येक अनुभवासोबत मी चा भास असतो व तो अनुभव मला येत आहे व तो अनुभव माझ्या पेक्षा भिन्न आहे अशा द्वैत अज्ञानात असलेली ही स्थिती आहे व प्रत्येक अनुभवासोबत मी असल्याने त्या अनुभुतीचे वर्णन करताना जणु काही त्या प्रत्येक अनुभवातुन जणु मी डोकावत आहे व दुःखाचा अनुभव असेल तर मी दुःखाचे उसासे टाकत आहे व सुखाचा अनुभव असेल तर मी सुखाचा अनुभव घेत आहे असे मला वाटत आहे, असे अत्यंत तंतोतंत स्वानुभुतीचे वर्णन तुकाराम महाराज करत आहेत.

म्हणुन शब्द बाहेर आले,


"ज्यात डोकावेन मी ।

ते मनाचे बिंब मी ।

जन्म हेलावेल ।

ते उसासे चिंब मी ॥ "


प्रत्येक अनुभव मग तो दुःखाचा असो वा सुखाचा वा कोणताही अनुभव असो तो अनुभव मलाच येत आहे व त्या अनुभवासोबत मी असतोच असे महाराज सांगत आहेत.


प्रत्येक अनुभुतीचे स्वरुप

observer is observed

द्रष्टाच दृश्य आहे 

असे समर्पक व तंतोतंत वर्णन करताना महाराज आढळतात.

जे 

"मीच मज व्यालो ।

आपुलिया पोटी जन्मा आलो ॥ "


ची आत्मानुभुती आहे..


पुढच्या चरणात

 ते मी कोण आहे च्या शोधात, ज्याच्या मुळे अनुभुती आल्याचा भास होतो त्या कालातीत वा तुर्यातीत असलेल्या चारी अवस्थांचे अधिष्ठान असलेल्या तुर्यातीताचे ते वर्णन करत आहेत की, awareness no aware of itself .

असे की ते अधीष्ठान शब्दातीत व

nameless आहे. शब्दात बद्ध होत नाही असा अनोखा रंग आहे तो.

आणि

पुढच्या चारी अवस्थेसोबत

जो प्रत्येक अनुभुती सोबत मी चा भास आहे तो या अधीष्ठानाचे अनुभवात म्हणजे दृश्यात पडलेले प्रतिबिंब आहे , 

जो मी हा द्रष्टा रुपी भास सर्व जन्मात प्रत्येक अनुभवाचे साथ करणार आहे . म्हणुन सहज अनुभुतीचे शब्द येतात.


नाव नाही ज्यास काही ।

तो अनोखा रंग मी ।

जो पुरेल जन्म सारा ।

तो सोबतीचा चंग मी ॥ 


प्रत्येक दृश्या सोबत भासणारा जो द्रष्टा आहे तो म्हणजे या कालातीत अशा nameless चे त्या अनुभुतीत पडलेले प्रतिबिंब आहे असे वर्णन तुकाराम महाराज करत आहेत.

जे

observer is observed चे वर्णन आहे.

जे

"मीच मज व्यालो ।

 आपुलिया पोटी जन्मा आलो ॥"

 अशी आत्मानुभुती आहे.


पुढचे चरण आहे


काळजात करुणेचा ।

उसळलेला डोंब मी ॥

हर क्षणाला कल्पनेचा ।

जन्मलेला कोंब मी ॥


अशा रीतीने प्रत्येक विचार , प्रत्येक भावना  व प्रत्येक कृती सोबत मी बरोबर असतो म्हणजे असतोच. मी शिवाय कोणताच अनुभव नसतो मग ती करुणा असो की कोणतीही कल्पना असो की कोणताही अनुभव असो त्या सोबत मी चा भास आसतोच असतो ,असे महाराजांना सांगायचे आहे.


द्रष्ट्या शिवाय कोणतेच दृश्य नसते असे महाराजाना सांगायचे आहे.. observer is observed.


"मीच मज व्यालो ।आपुलिया पोटा आलो ॥"

ही ती स्वसंवेद्यतेची आत्मानुभुती आहे.


शेवटचे चरण आहे

असा हा मी कोण आहे ?असा शोध मी ध्यानात घेतला तेव्हा मला खुप त्रासातून म्हणजे अगदी मृत्युच्या अनुभवातुन ही जावे लागले ते सर्व मृत्युचे दुःख ,मृत्युच्या . अनुभुतीचा त्रास ही मीच असल्याचे मी अनुभवले आहे असे महाराज सांगतात. इतकेच नाही तर मृत्युची अनुभुती येताना जे शेवटचे श्वास मोजायची म्हणजे मृत्यु च्या अनुभुतीची शेवटची घडी पण मीच असल्याचे अनुभवले आहे व सुषुप्तीच्या पलिकडे जात ब्रह्ममय होत मी जे ब्रह्ममयतेचे सुखरुपी हास्य अनुभवले आहे ,ते हास्य देखील मीच असल्याचा माझा अनुभव आहे असे तुकाराम महाराज सांगत आहेत.


सर्व विश्वा भास माझ्यातच प्रकटलेला आहे 

अशी I am the world

and

world is me

अशी स्वानुभुती महाराज या अभंगात सांगत आहेत.


अस्तित्वाचे एकुण पाच कोष किंवा पाच अवस्था असतात .

         👇

आनंदमय कोष ( कालातीत)

         👇

विज्ञानमय कोष (ब्रहम / तुर्या )

         👇

प्राणमय कोष (सुषुप्ती )

        👇

मनोमय कोष (स्वप्न )

          👇

अन्नमय कोष (जागृती )


अशा रीतीने या पाची state च्या मध्यभागी असलेल्या जीवभावात असुनही मी दोन्ही कडच्या अवस्था अनुभवल्या आहेत .

सुषुप्तीच्या आधीच्या तसेच सुषुप्तीच्या नंतरच्या तुर्या व तुर्यातीत या दोन मनोमय कोष व अन्नमय कोष किंवा स्वप्न व जागृती या दोन अवस्था देखील मी अपरोक्ष अंतरात अनुभवल्या आहेत.

म्हणुन

शेवटी तुकाराम महाराज सहज लिहून जातात .


दोन्ही कडे पाहे ।

 तुका आहे तैसा आहे ॥


म्हणजे कालातीत च्या अधीष्ठानावर हा चार अवस्थात्मक मी चा भास प्रत्येक अनुभुती सोबत भासत असला तरी खरे माझे स्वरुप हे दृश्या सोबतचा द्रष्टा नसुन या चारी अवस्थांचे nameless व timeless अधीष्ठान हे माझ्या दोन्हीकडे पहाण्यात आले आहे जे खरे निजस्वरुप आहे.


मीचा भास मग तो जागृती, स्वप्न व सुषुप्तीतील, duality तील मी असो की

की तुर्येतील Non dual after मी असो

 dual  व Nondual

द्वैत व अद्वैत मधील मी हे माझे खरे निजरूप नाही तर खरे निजस्वरुप चारी अवस्थांचे अधिष्ठान असलेले तुर्यातीत असे परब्रह्म हेच खरे निजस्वरुप आहे .

असे महाराजाना सांगायचे आहे.

चारी अवस्थातील प्रत्येक अनुभवासोबत किंवा प्रत्येक दृश्यासोबत सतत प्रतिक्षण  बदलणारा, अनित्य असलेला द्रष्टा हे खरे निज स्वरूप नाही .

 कालातीत व nameless ,कधीही न बदलणारे असे परब्रह्म हेच खरे निजस्वरुप असल्याने शेवटी महाराज सहज लिहून जातात.


"दोन्ही कडे पाहे ।

तुका आहे तैसा आहे ॥ "


अर्थात ही सर्व शरीर , मन , इंद्रिय व बुद्धी पलिकडची अनुभुती आहे.

येथे सुषुप्तीच कोणाला माहीत नाही मग आत्मानुभुती व अपरोक्ष चार अवस्था निरासावर आधारीत हा अभंग समजण्याचा प्रश्नच येत नाही.


असो .

.....................

- विजय पांढरे

9822992578

30-01-2022

vbpandhare@gmail.com






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या