18 ) चिंतन : Inbuilt अज्ञान

 

चिंतन 18 : Inbuilt अज्ञान

चिंतन 18 : Inbuilt Ignorance


.............................

Click on the following link for pdf👇👇

🌹 चिंतन 18 : Inbuilt अज्ञान🌹

 .............................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

..................

चिंतन


अगदी खरे सांगत आहेत कृष्णमूर्ति.


द्रष्टा दृश्यापेक्षा भिन्न आहे असे वाटणे हे पारंपारीक अज्ञान आहे व हे अज्ञान केवळ ग्रंथ वाचून किंवा कृष्णमूर्ति वाचुन दुर होत नसते.


परंपरेतील माउलीचे


अमृतानुभव


चांगदेव पासष्टी,


हे ग्रंथ


तसेच परंपरेतील


मांडुक्य उपनिषद


योगवसिष्ठ श्रेष्ठ ग्रंथ


व बुद्धाचे महासती पठाण


तसेच


कृष्णमूर्ति ची सर्व प्रवचने


ही द्रष्टाच दृश्य आहे याचा बोध होण्यास सहाय्यक होतात जर आपल्याला सत्याची तळमळ असेल तर.


पण जर सत्याची तळमळ नसेल तर कृष्णमूर्ति ५०-६० वर्ष वाचुन ही द्रष्टाच दृश्य आहे हे 99.9999 % लोकांना समजत नाही ही वस्तुस्थीती आहे.


दोष पारंपारीक ग्रंथ वा कृष्णमुर्तिचा नाही तर वाचकाचा असतो.


मी काय सांगीतले याचा बोध


चार दोन लोकांनाही झाला असेल तर माझे काम झाले असे कृष्णमूर्ति सांगुन गेले आहेत.


आपले अज्ञान चार अवस्थात


inbuilt आहे, ते अज्ञान चार अवस्था निरासात अपरोक्ष अंतरंग प्रवासात निरसणे

Real meditation मधील समजेत

हे सार आहे.


दोष परंपारीक ग्रंथांचा नाही वा


कृष्णमुर्तिचाही नाही.


तर दोष वाचकाच्या अंतरंगातील चारी अवस्थेत inbuilt असलेल्या द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न आहे या अज्ञानाचा असतो.


चारी अवस्थातील हे अज्ञान


द्रष्टाच दृश्य आहे या बोधात


खरोखर समुळ wipe out होत नाही


तोपर्यंत


आत्मबोध प्रकटत नसतो..


ज्या स्वार्थी व अज्ञानी समाजात आपण लहानचे मोठे होत असतो तो समाज व त्या समाजाच्या ज्या पद, पैसा, प्रतिष्ठा व ईश्वरा संबंधी ज्या मान्यता आहेत व मनात दडून बसलेल्या ज्या

अज्ञानी कल्पना आहेत त्या अंतरंगातील चार अवस्थात असलेल्या inbuilt अज्ञानाचा परीपाक आहेत .

चार अवस्थात द्रष्टा दृश्यापेक्षा भिन्न आहे हे inbuilt अज्ञानच खरी अडचण आहे..


या सामाजिक व आंतरीक मान्यता विरुद्ध जे मन आपल्या जीवाची पर्वा न करता खरोखर आपल्याच अंतरंगातील अज्ञाना विरुद्ध द्रष्टाच दृश्य आहे या बोधात बंड करून उठते व त्या आंतरीक बोधात चारी अवस्थातील अज्ञानाचा निरास अपरोक्ष घडतो फक्त त्याच मनात आत्मज्ञान प्रकटते.


वर वर स्थुल बुद्धीने ग्रंथ व पुस्तके वाचणारे संप्रदाय व धर्म स्थापन करून अज्ञानी जनतेचे शोषण करत असतात.


जे बहुतांशी


सर्वत्र नजरेला पडत आहे.


असो .


आपल्या कर्माचीच फळे आपण भोगत असतो.


इलाज नाही .


पण कृष्णमूर्ति सारखे लोक जिवनात येतात तेव्हा आशेचा किरण प्रज्वलीत होत असतो हे नक्की.

..........

- विजय पांढरे

9822992578

vbpandhare@gmail.com


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या