10,010 )चिंतन : स्वरूपबोध swarupbodh

 चिंतन 10010 : स्वरूपबोध swarup bodh

  
स्वरूप बोध swarup bodh काव्य चिंतन

 .........................

Click on the following link for pdf👇👇

🌹 चिंतन 10010 : स्वरूप बोध🌹

 .............................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

....................

🌿काव्य चिंतन : स्वरूप बोध🌿


भ्रमा साक्षी झाला भ्रम ।
अंतरी प्रकटले ते परब्रह्म ।
जे भासत होते मरण-जन्म ।
नुरले आता ॥ १ ॥


कैसा चमत्कार हा झाला ।
भ्रमानेच पाहता भ्रमाला ।
विश्वाभासच विरुन गेला ।
आपोआप ॥ २ ॥


मी - माझी भ्रम कहाणी ।
 न सापडे आता शोधूनी ।
होता द्रष्टा - दृश्याची आटणी ।
 अनिर्वाच्च प्रकटले ॥ ३ ॥


अंतरी कृष्णमुर्तिंची भेट ।
द्रष्टा - दृश्याची लागली वाट ।
चारी अवस्थांचा बोभाट ।
संपला आता ॥ ४ ॥


आत्म -अनात्म कहाणी ।
ज्ञान -अज्ञान रहाटणी ।
नित्य -अनित्याची भासणी ।
 नाहीच आता ॥ ५ ॥


दृष्टी पडली ज्याच्यावर ।
ते विरुन जाती चराचर ।
तेथे द्रष्टा - दृश्याचाच पुर ।
आढळे सर्वत्र ॥ ६ ॥


जेथे आहे द्रष्टा - दृश्य वाणवा ।
त्यावर असता चौ-वाचा कांगावा ।
 मग जन्म मरणाच्या गावा ।
 अंत नाही ॥ ७ ॥

🌿🌿🌿🌿🌿🌹   🌹🌿🌿🌿🌿🌿

- विजय पांढरे ( जिद्दूदास )

9822992578

24-01-2023

vbpandhare@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या