2 ) प्रचलित मराठीत काव्यबद्ध भावार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा : निवडक ओव्या dnyaneshwari adhyay 2

🌼ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्य योग : निवडक ओव्या🌼

॥ प्रचलित मराठीत काव्यबद्ध ॥

भावार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 2: निवडक ओव्या
अध्याय २ : सांख्ययोग निवडक ओव्या

dnyaneshwari adhyay 2 

................🌹🌿🌹.............


जे विवेकवान असती ।

ते सुखदुःख सम मानती ।

जन्ममरण दोन्ही भ्रांती ।

जाण अर्जुना ॥ १०२ ॥


जयाचे संस्कारांशी तादात्म्य तुटले ।

 तयाचे सुखदुःख संपले ।

 मग भवचक्र भंगले ।

 यांचे अर्जुना ।।१२२।।


अनित्यता संस्कारांची जाणून ।

 मनाशी तादात्म्य तोडून ।

 तू हो आत्मवान । 

अर्जुना माझ्या ॥ १२३ ॥


 एकत्रित असता धान्य भूस ।

 जर ते पाखडल्यास ।

 शिल्लक रहाते धान्य रास ।

 जैसी अर्जुना ॥ १३० ॥


 संतसंग तो घडता ।

मनइंद्रियासी तादात्म्य तुटता ।

 स्वप्न सुषुप्तीत जागता ।

 आत्मज्ञान ॥ १७१ ॥


 एक अंतरी निश्चल ।

 जे प्राप्त न्याहाळता केवल ।

 चैतन्यच मग विश्व सकल ।

 तयासाठी ॥ १७२ ॥


 मोहासी त्या त्यागावे ।

जशास तसे व्हावे ।

रणी ते झुंजावे।

 निष्कामपणे ।।१९०।।


चूक ते कामनेत अडकणे ।

आणि स्वर्गसुख इच्छिणे ।

 मग आत्मतत्त्वास मुकणे ।

आपोआप ।।२५०।।


अर्जुना समत्व चित्ताचे ।

तेची सार जाण योगाचे ।

विसर्जन होता मनविचारांचे ।

 योग घडे ॥ २७३ ॥


 या रहस्यास जर जाणशील ।

 मोहास या जर सांडशील ।

मग योगयुक्त होशील ।

 समत्व साधता ।।२८०।।


मन इंद्रियांच्या संगती ।

भ्रष्ट होती जी मती ।

 स्थिर होईल आता ती ।

योग घडता ।।२८३।।


ऐसे शरीर मनाशी तादात्म्य तुटणे ।

तु मी माझेपण संपणे ।

अहं ब्रम्हास्मि अनुभवा येणे ।

 ज्ञान अर्जुना ॥ ३०९ ॥


शरीराने विषय त्यागणे ।

परि मनी विषयांचे चिंतने ।

मग भवचक्राचे चालणे ।

 अव्याहत ॥ ३१८ ॥


ऐसे चंचलपण मनाचे ।

तेच कारण दु:खाचे ।

म्हणुन मन ईंद्रियांचे ।

होवो निरसन ॥ ३४७ ॥


ईंद्रियांच्या नादी लागता । 

ईंद्रियभोगी अडकता । 

मग दु:खाचीच वार्ता ।

तयाच्या मनी ॥३४८ ॥


तैसे जे ईंद्रिय न आवरती ।

ईंद्रिय भोगात अडकती ।

मग दु:खाचीच प्राप्ती ।

आपोआप ॥३५०॥


म्हणुन मन समजेतुन ।

जर मन ईंद्रिय झाले स्वाधीन ।

तोच अर्जुना भाग्यवान ।

या जगती ॥ ३५१ ॥


       - भावार्थ ज्ञानेश्वरी (अ -2) 

🌹🌹🌹🌹 


प्रचलित मराठीत ओवीबद्ध ज्ञानेश्वरी निवडक ओव्या :

Download pdf book



✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या