चिंतन 370 : द्रष्टा - दृश्य ( एक काव्य ) observer is observed
............................
Click on the following link for pdf👇👇
🌹 चिंतन 370 : द्रष्टा - दृश्य ( एक काव्य )🌹
.............................
✍️ Vijay Pandhare
📳 Phone no:
9822992578
📧 Email:
.........................
🌿चिंतन : द्रष्टा - दृश्य ( एक काव्य ) observer is observed🌿
जिकडे नजर पडली ।
तेथे द्रष्टा दृश्याची सावली ॥ 1॥
त्या द्रष्टा दृश्या विना ।
येथे काहीच बा दिसेना ॥ 2 ॥
द्रष्टा दृश्याचीच वळवळ ।
येथे आढळली सकळ ॥ 3॥
मनाच्या चारी त्या अवस्था ।
तो द्रष्टा दृश्याचाच राबता ॥ 4॥
द्रष्टा दृश्याच्या अज्ञानात ।
प्रकटे अहमचे अस्तित्व ॥ 5॥
डोळ्याठायी जे दिसणे ।
ते द्रष्टा दृश्यच असणे ॥ 6॥
पाचही इंद्रियांची कृती ।
तेथे द्रष्टा दृश्याचीच वस्ती ॥ 7॥
कर्मेंद्रियांच्या सर्व कथा ।
तो द्रष्टा दृश्याचा राबता ॥ 8॥
विचार तर्क आणि भावना ।
तो द्रष्टा दृश्याचा धिंगाणा ॥ 9॥
सर्व ते बा षडविकार ।
तो द्रष्टा दृश्याचाच वावर ॥ 10॥
प्राणी पक्षी व तरुवर ।
तो द्रष्टा दृश्याचा प्रकार ॥ 11॥
झोप भूक आणि तहान ।
ते द्रष्टा दृश्याच्याच कारण ॥ 12॥
चालणे बोलणे हालणे ।
ते द्रष्टा दृश्याचे असणे ॥ 13॥
खाणे पिणे श्वास घेणे ।
ते द्रष्टा दृश्याचे खेळणे ॥ 14 ॥
उठता बसता लोळता ।
अनुभवा द्रष्टा दृश्य कथा ॥ 15॥
द्रष्टा दृश्यात स्थिर होणे ।
तेच ध्यानाचे बा असणे ॥ 16 ॥
होता द्रष्टाच दृश्य अहसास ।
ब्रह्माचा बोध ब्रह्मास ॥ 17॥
द्रष्टा दृश्याचे मुळ धाम ।
तयाचेच नाव ब्रह्म ॥ 18॥
पण सुषुप्ती ओलांडल्यावीन ।
नच प्रकटते ते ब्रह्मज्ञान ॥ 19 ॥
केवळ ग्रंथ वाचन श्रवण ।
ते फक्त कोंडाच उपनणं ॥ 20 ॥
द्रष्टा दृश्य रूपी ब्रह्माच म्युटेशन । ( उत्परिवर्तन / सघनीकरण )
तेच विश्वाभासाचे प्रकटन ॥ 21॥
द्रष्टाच दृश्य उमजल्यावीण ।
अंतरी न प्रकटे ब्रह्मज्ञान ॥ 22 ॥
🌿🌿🌿🌿🌹 🌹🌿🌿🌿🌿
- विजय पांढरे
+91 9822992578
07-11-2022
vbpandhare@gmail.com
0 टिप्पण्या
Ask your doubt ..