10072 ) चिंतन : पत्ता स्वरुपाचा patta swarupacha

 

चिंतन10,072 : पत्ता स्वरुपाचा patta swarupacha

 
पत्ता स्वरुपाचा patta swarupacha

 

.............................

Click on the following link for pdf👇👇

🌹 चिंतन 10072 : पत्ता स्वरुपाचा🌹

  

 .............................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

...........................

🌿चिंतन : पत्ता स्वरूपाचा patta swarupacha
 ( काव्य चिंतन )🌿


निर्गुणाच्या त्या विस्मरणात ।

मी चा भास असे प्रकटत ॥


मी सर्प रज्जु समान ।

 हे उमजले तो भाग्यवान ॥


मी च्या भासाचा हा राबता ।

 ती तर पंचभूतांची सत्ता ॥


मी च्या भासाचं भासणं ।

तेच बा द्वैताच प्रकटन ॥


भास मी चा सघन होता ।

 प्रकटे चार अवस्था राबता ॥


त्या चार अवस्था रुपात ।

मीच असे बा नांदत ॥


विश्व मी पणाचे म्युटेशन । ( सघनीकरण )

 मी आणी विश्व अभिन्न की ॥


पंचभूतांच्या त्या ठाया ।

प्रकटे द्रष्टा दृश्य माया ॥


सदगुरु अंतरंगी भेटता ।

 समजे द्रष्टा दृश्याची एकता ॥


द्रष्टाच दृश्य उमजता ।

निरसे द्रष्टा दृश्याचा राबता ॥


समुळ द्रष्टा दृश्य विरता ।

अंतरी प्रकटे आपुला पत्ता ॥


🌿🌿🌿🌿🌹   🌹🌿🌿🌿🌿


-विजय पांढरे

+91 9822992578

03-05-2023

you tube channel 

"vijay pandhare"

vbpandhare@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या