ज्ञानेश्वरी चिंतनमालिका - 2 : शोध ईश्वराचा search for truth

ज्ञानेश्वरी चिंतनमालिका - 2 : शोध ईश्वराचा search for truth 


ज्ञानेश्वरी चिंतनमालिका - 2 : शोध ईश्वराचा search for truth

Click on the following link for pdf👇👇

🌹 चिंतन - 2 : शोध ईश्वराचा search for truth🌹


ज्ञानेश्वरी चिंतनमालिका - 2 : शोध ईश्वराचा search for truth

 .............................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

..................

चिंतन-२ : शोध ईश्वराचा

🌸🌿🌿🌿🌹 🌹🌿🌿🌿🌸

     Reality, सत्य, God, ईश्वर किंवा ती मूळ शक्ती, ते जे काही आहे ते मन जाणत नाही. मनाला ते माहितच नाही. मग जे मनाला माहितच नाही त्याचा शोध मी मनाने कसा घेऊ शकतो? म्हणून सत्याचा शोध प्रयत्नाने किंवा मनाने लागतच नसतो. कारण सर्व प्रयत्न हे जे यापूर्वी माहिती आहे त्या क्षेत्रातच असतात, आणि सत्य तर अज्ञात आहे; म्हणून मन जोपर्यंत कार्यरत आहे तोपर्यंत सत्य उमजतच नाही.

      मात्र ज्या मनाला ही गोष्ट उमजते की मनच अडथळा आहे तेंव्हा मनाकडूनच मनाचा त्याग होतो व मन स्वतःचे स्वतः विसर्जित होते आणि मनाच्या त्या विसर्जनातच सत्याचे प्रकटन होते. खरे तर सत्य स्वतःहून तेथे आधीच प्रकट होते. ते प्रकट केले जावू शकत नाही. कारण मनच असत्य आहे व असत्याचे विसर्जन झाले की सत्य तर असतेच असते. ते आणावे लागत नाही. फक्त सत्यावर असलेला असत्य मनाचा लेप दूर झाला, की सत्याला सत्याचे आकलन होते. अन्यथा जोपर्यंत मन कार्यरत आहे तोपर्यंत मनाचेच मनाला भास जाणवतात व हीच माया आहे. सत्य तर मन व मायेच्या पलीकडे आहे. 

   म्हणून सध्याच्या मनाचे विसर्जन हीच आत्मज्ञानाची गुरुकिल्ली आहे. ज्या मनाला हे साध्य होते त्या मनाला संपूर्ण अस्तित्वाचा खुलासा आपोआप होतो. कारण आत्मज्ञानानंतरचे ते मन व अस्तित्व हे दोन्ही एकच असतात. त्या मनाला संपूर्ण विश्व आत्मस्वरूपच असल्याचा बोध होतो.

   अशा बोधातच मग प्रेम, शांति, करूणा व प्रज्ञा याचा उगम होत असतो.

🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿

ज्ञानेश्वरी चिंतनमालिका :


ज्ञानेश्वरी चिंतनमालिका 1 ते 21 चिंतने pdf book - विजय पांढरे

ज्ञानेश्वरी चिंतनमालिका 1 ते 21 चिंतने
pdf book
- विजय पांढरे


View    👈           👇
Dnyaneshwari chintan malika book download





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या