1 ) चिंतन : आळंदीच्या साधक मित्राशी संवाद

चिंतन 1 : आळंदीच्या साधक मित्राशी संवाद Aalandichya sadhak mitrashi sanvad

आळंदीच्या साधक मित्राशी संवाद Aalandichya sadhak mitrashi sanvad
...................................

Click on the following link👇👇

🌹 चिंतन 1 :आळंदीच्या साधक मित्राशी संवाद🌹 

..................................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

........................

चिंतन : आळंदीच्या साधक मित्राशी संवादAalandichya sadhak mitrashi sanvad


दिनांक 10-04-2022 रोजी
Post झालेले चिंतन व त्या चिंतनावर आळंदीच्या एका साधक मित्राशी झालेला हा संवाद  चिंतनासह खाली post करत आहे .

🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

चिंतन -👇

परंपरेत भक्तीचे फार मोठे महात्म्य वर्णन केले जाते.

माउली सारख्या खऱ्या संतांनी खरे म्हणजे अद्वैत भक्तीच सांगीतली आहे.

पण अज्ञानी परंपरेत द्वैत भक्तीचे गुणगान सुरु आहे.

काळाच्या ओघात खरी अद्वैत भक्ती मागे पडली आहे व द्वैत भक्तीचा प्रचार आणि प्रसार लोकांनी अत्यंत धुमधडाक्यात केलेला आढळतो.


भक्तीला प्राप्त होणे म्हणजे ब्रह्ममयतेला म्हणजे अद्वैत भक्तीला प्राप्त होणे हाच भक्तीचा खरा अर्थ आहे. पण मनुष्याच्या आकारातील ईश्वराला पुजणे म्हणजे भक्ती असा अर्थ अज्ञानी गुरुंनी येथे अज्ञानी लोकांना शिकवला आहे .


ब्रह्ममयतेला प्राप्त होणे म्हणजे वैश्विक ज्ञानदृष्टीला म्हणजे universal consciousness शी एकरूप होणे आहे.


जीवभाव ही माया आहे ,

अपरोक्ष ब्रह्मभावाला प्राप्त झाल्याशिवाय जीवभावाच्या भ्रमाचा अंत होत नसतो .

पण आजच्या प्रचलीत द्वैत भक्तीत ब्रह्ममय होण्याची गोष्ट द्वैत भक्त विसरुन गेले आहेत  व अज्ञानी द्वैत भक्त मनुष्याच्या आकारातील ईश्वराच्या मागे लागले आहेत.


मनुष्याच्या आकारातील ईश्वराचे भजन - पुजन करणाऱ्यांना ज्ञानेश्वरीत अध्याय क्र .२ मधे माउलीने मुर्ख व अज्ञानी म्हटले आहे .

पण तरीही अज्ञानी सकाम द्वैत भक्तांचे प्रमाण फार मोठे असल्याचे आढळते .


द्वैत भक्ती म्हणजे माया आहे व मायेच्या मागे धावणारेच जास्त असतात. अद्वैत भक्तीचे पुरस्कर्ते फार थोडे आहेत.


द्वैत भक्तीवाले जन्म - मरण चक्ररुपी अज्ञानाच्या भवभ्रमातुन कधीच बाहेर पडूच शकत नसतात.

द्वैत भक्त कधीही मुक्त होत नसतो .


अगदी विठ्ठलाचे दर्शन ज्यांना झाले होते त्या नामदेव महाराजांना देखील शेवटी अद्वैत भक्ती शिकवणाऱ्या 'विसोबा खेचरांनाच ' शरण जावे लागले ही गोष्ट सर्वांना माहीत आहे.


अद्वैत भक्तीशिवाय मुक्ती नाही.विवेकी लोक अद्वैत भक्ती करतात तर द्वैत भक्ती विवेकहीन लोकांचे क्षेत्र आहे.


 विषया विषयी वैराग्य प्राप्त होणे हे खऱ्या अद्वैत भक्ताचे लक्षण आहे तर विषयाची आसक्ती न सुटणं म्हणजे द्वैत भक्ती आहे .

विषया विषयी वैराग्य प्राप्त होणं हे भाग्याचे लक्षण आहे तर विषयात अडकणे ही अधोगती आहे.

वैराग्याला प्राप्त होणे हीच साधना आहे.

पद - पैसा ,प्रतिष्ठा व वासने विषयी वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय कोणीही अंतरंगात प्रवेश करू शकत नाही. 

अध्यात्म ग्रंथ , वाचन व प्रवचन , श्रवण यांच्या माध्यमातुन मन वैराग्याला प्राप्त होत नसेल तर अशा मनाने केलेले हा वरवरचा दिखावा असतो.


द्वैतात ,कामवासनेत व पैशा -अडक्यात अडकलेले मन हे काळाचे गिर्हाइक असते . व असे मन कधीच मायेच्या म्हणजे जीवभावाच्या पलिकडे , म्हणजेच सुषुप्ती पलिकडे जावुच शकत नाही .

द्रष्टाच दृश्य आहे या समजेला खरोखर प्राप्त होवुन अद्वैत बुद्धीला जे प्राप्त होतात ते भाग्यवान असतात.


ज्यांच्या जिवनात कृष्णमूर्ति सारखे अद्वैताचे मार्गदर्शक येतात ते भाग्यवान असतात.

अज्ञानी भक्तांनी तर माउलीलाही द्वैत भक्तीत अडकवुन टाकले आहे.


जे मन अद्वैत चिंतन करते तेच मन अद्वैताला म्हणजे ब्रह्ममयतेला प्राप्त होवु शकते.

द्वैत भक्त अज्ञानी भक्त असतात. अद्वैताचेच नेहमी चिंतन करावे .

अद्वैत बुद्धीत ब्रह्ममय होण्याची क्षमता प्रकटत असते, ब्रह्ममय होण्याचे भाग्य द्वैत भक्तांना कधीच प्राप्त होत नाही.


ब्रह्मज्ञाना शिवाय दुसरी कोणतीच आवड ज्या जीवाला नसते तो जीव कधी ना कधी अपरोक्ष ब्रह्ममयता नक्की अनुभवु शकतो.

द्वैत भक्तांचे अज्ञान अधिक दृढ होत असते यात शंकाच नाही.

जे ब्रह्ममय होतात त्यांनाच परब्रह्माची समज येत असते.

परब्रह्माचा बोध हाच निजबोध किंवा आत्मबोध आहे.

परब्रह्म हेच परमसत्य आहे.


बाकी जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या (ब्रह्म) या चारी अवस्था असत्य, अनित्य व अनात्म आहेत.

द्वैत भक्ती जीवाचे अज्ञान बंधन दृढ करत असते.

केवळ अद्वैत भक्ती करणाऱ्यांनाच परब्रहम बोध म्हणजे स्वरुप बोध होत असतो.

परब्रहम बोधा व्यतिरीक्त इतर सर्व गोष्टी व्यर्थ आहेत..!


अद्वैत चिंतनाशिवाय जीवभावाचा लय कधीच होत नसतो व जीवभावाचा लय झाल्याशिवाय ब्रहम व परब्रह्म आकळत नसते.

अज्ञानी लोक ब्रहम व परब्रहम एक असल्याचे मानतात.

अज्ञानी लोकाना ब्रहम व परब्रह्मातील फरक समजत नसतो. 

ब्रहम हे नाम - रूपा अधीन ,तथा काळाच्या अधीन असुन परब्रहम हे नाम - रुपातीत तथा कालातीत आहे. हा बोध अज्ञानी लोकांना नसतो.

खरे म्हणजे अज्ञानी लोकांना नामरूप या शब्दाचा अर्थच समजत नसतो .

भलत्याच गोष्टीला अज्ञानी द्वैत भक्त लोक "नाम " म्हणत असतात. इतके गहन अज्ञान द्वैत भक्तीत आहे.

सकाम द्वैत भक्ताची दुःख - काळजी व चिंता कधीच मिटलेली नसते.

सकाम द्वैत भक्तांना द्वैतात्मक विषयात सुख भासत असते , जे द्वैत विषय तर खरे म्हणजे दुःखरूप आहेत. द्वैतात रममाण होणारे मृत्यु समयी शेवटी दुःखालाच प्राप्त होतात .

 म्हणुन विवेकी मनाने नेहमी अद्वैत भक्तीचाच ध्यास धरावा .


कृष्णमूर्ति सारखे अद्वैत मार्गदर्शक भेटले की संसार बंधन लयास जात असते.


मी कोण आहे ?

मन (consciousness) म्हणजे काय ?

द्वैत म्हणजे काय ?

अनुभव म्हणजे काय ?

द्रष्टा - दृश्य म्हणजे काय ?


या विषयी जे मार्गदर्शन करतात तेच खरे मार्गदर्शक असतात.


या स्वयंशासीत चार अवस्थात्मक जगाचा कोणी तरी ईश्वर नावाचा नियंत्रक व चालक आहे असे शिकवणारेे अज्ञानी असतात.


जे चार अवस्था अपरोक्ष जाणतात तेच ब्रह्म व परब्रह्म अपरोक्ष जाणतात व तेच शरीरात असले तरी शरीराचे नसतात व संसारात आहेत असे भासले तरी ते संसारात नसतात.


सतसंगै निःसंगत्वम ।

निःसंगे निष्कामत्वम ।

निष्कामत्वे तत्वप्राप्ती ॥


असे जे म्हणतात तेच खरे आहे. सकाम द्वैत भक्ती बालबुद्धीच्या अज्ञानी लोकांसाठी आहे.

वेदांतासारखे अद्वैत तत्वज्ञान कानावर पडल्याशिवाय द्वैत बुद्धीचे रूपांतरण अद्वैत बुद्धीत होतच नसते.

तसेच नुसते वाचन व श्रवण केल्याने ब्रह्ममयता प्रकटत नसते.

चार अवस्था निरासात ब्रह्ममयता अपरोक्ष

प्रकटल्या शिवाय ब्रह्मबोध व परब्रहम बोध प्रकटत नसतो.

परब्रहम बोध म्हणजेच आत्मबोध आहे.


ज्या अंतकरणात परब्रह्म बोध प्रकटतो त्या अंतकरणाला कशाचीही व कोणाचीही आवश्यकता उरत नसते.


चार अवस्था मायेचे अनित्य व अनात्म क्षेत्र आहे.

परब्रहमाठायी मायेचा लवलेशही नसतो.

चारी अवस्था म्हणजे मी व माझे पणाच्या मायेचे क्षेत्र आहे.

ब्रम्हदेखील मूळ माया आहे.


चार अवस्थांमध्ये अडकलेले मन ,धन व वासनेचे गुलाम असते .

अगदी ब्रह्मज्ञानी देखील धन व वासनेला बळी पडतात हा सर्वभूत व सर्वदूर इतिहास आहे.

अगदी ब्रह्मज्ञानी ही प्रचंड शिष्य संप्रदायात ,विविध साधना विधीत व वैभवशाली आश्रमात अडकलेले आढळतात.


जेथे साधना विधीचे , पैशाचे व शिष्य संप्रदायाचे प्रदर्शन असते तेथे खरे अध्यात्म नसते.

खऱ्या परमार्थाला साधना विधीची, पैशाची

,शिष्य संप्रदाय व आश्रमाची अजिबात गरज नसते.


जे खऱ्या आत्मज्ञानी मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनात आत्मशोध घेतात त्यांनाच आत्मबोध प्राप्त होण्याची शक्यता असते.


परब्रह्म बोधा शिवाय चार अवस्थांची म्हणजे मायेची व्यर्थता उमजत नसते .

मी व माझे हीच माया आहे हे उमजणे सार आहे,

द्रष्टा हा दृश्या पेक्षा भिन्न आहे असे वाटणे हीच माया आहे.


सर्व अज्ञानी परंपरा व अज्ञानी गुरु द्रष्टा  दृश्या पेक्षा भिन्न आहे असे शिकवत असतात .

द्रष्टाच दृश्य आहे हे ज्या मनाला उमजते त्याच मनात विवेक वैराग्य प्रकटुन द्वैत बुद्धीचे रुपांतरण अद्वैत बुद्धीत होवुन ब्रह्ममयता प्रकटते

ब्रह्माठायी देखील द्रष्टाच दृश्य आहे. या बोधातच ब्रह्म लय पावुन परब्रहम बोध जागत असतो.


द्रष्टाच दृश्य आहे हे उमजणे म्हणजेच अध्यात्म सार आहे.

सकाम , सगुण भक्त द्वैताचे व मायेचे गुलाम असतात. अशा अज्ञानी द्वैत भक्त लोकांना खरा साधु कळत नसतो .

अज्ञानी लोक साधना विधी शिकवणाऱ्या व शिष्य संप्रदाय तथा वैभवात अडकलेल्या व द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न असतो असे शिकवणाऱ्या व मायेत अडकलेल्या लोकांना गुरु बनवत असतात 🙏🙏

🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

प्रश्न-

नको ब्रह्मज्ञान । आत्मस्थिती भाव ।

 मी भक्त तू देव । ऐसे करी ॥

दावी रूप मज । गोपिका रमणा ।

 ठेवीन चरणा । वरी माथा ॥


ही कोणती भूमिका असेल सर ?

🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

उत्तर-

ही अज्ञान दशेतील मागणी आहे !!


🌸🌿🌿🌿🌹       🌹🌿🌿🌿🌸

प्रश्न -

परब्रह्म स्वरूपाला प्राप्त अशा गोकुळ मधील गोपिकांबद्दल कबीर क्या कहते हो  गये । एक कबीर दोहा -
"एक एक गौलन के प्रेम मे , बह गये कोट कबीर । "
असे स्वतः कबीर जी का म्हणतात ?

🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

उत्तर :

कबीराचे म्हणणे Seriously घेवु नये,

कबीराचे शेकडो दोहे अद्वैत पर आहेत.

आत्मज्ञान फक्त अद्वैत भुमिकेत प्रकटते.

 🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

प्रश्न-

या प्रेम भावाच्या अभावामुळेच सांप्रत जगाची अवस्था भीषण होत चालली असून इंद्रिये विषयाच्या भोगा पलिकडे जाऊन निष्काम प्रेम असू शकत नाही का ??
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अद्वैतातील परब्रहम स्वरूपाचा उपदेश करताना, स्वतः अर्जुन अद्वैतात विराम पावत असतांना, भगवंत आपल्या मायेद्वारा अर्जुनाला पुन्हा अर्जुनपणातच आणून युद्धासाठी प्रवृत्त करतात याचे स्पष्टीकरण स्वतः माऊलींनी दिले आहे. यातील काय रहस्य असावे सर?

 🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

उत्तर

अर्जुनाला ज्ञान होणार नाही अशी काळजी घेवुनच भगवंताने अर्जुनाला उपदेश केला आहे. अशा अर्थाच्या ओव्या ज्ञानेश्वरीत आहेत हे तुम्हालाही माहीत असेलच .

अर्जुनाकडुन युद्ध करवुन घ्यायचे होते त्या धुर्त राजकारणी भगवंताला.

 🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

प्रश्न

कबीरजी पण कधी अज्ञानी असावे, कधी ज्ञानी असावे व पुन्हा अज्ञान पण धारण करीत असावे आणि पुन्हा ज्ञानी म्हणून मिरवत असावे .जवळ जवळ बहुतेक संतांनी अधुन - मधुन अशी वेड्यासारखी भूमिका का धारण केलेली असावी, सर?

 🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

उत्तर-


कबीराचे म्हणणे गंभीर घेवु नये.

कबीर द्वैतवादी नाहीत.

सदरचा दोहा अज्ञान दशेतील आहे .

कबीराचे शेकडो दोहे अद्वैत पर आहेत .

आत्मज्ञान फक्त अद्वैत भुमिकेत प्रकटते, अद्वैत बांधा शिवाय निष्कामतेच्या गप्पा मारण्यामुळेच अध्यात्माची दुर्दशा झाली आहे.

अनेक संतांच्या काही रचना अज्ञान समयीच्या तर काही ज्ञान समयीच्या

काही ज्ञानोत्तर असतात म्हणून निरनिराळ्या वाटतात म्हणुन गोंधळ व संत भिन्नता वाटते.

🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

प्रश्न

त्या धुर्त राजकारणी भगवंताच्या गीतोपदेशावर आदिनाथा पासूनच्या श्री गुरु परंपरेने माऊलींना मराठी भाष्य करायला लावले हे एक आश्चर्य आहे की !
 आणि माऊलींनी या उपरोक्त अज्ञानी परंपरेतील गुरुवर्याची आज्ञा शिरसावंद्य मानली यात आश्चर्य आहे की अजून काही रहस्य आहे ?
गप्पा मारणारे खुशाल गप्पा मारतात पण संत मात्र गप्पा मारीत नाही, ते पूर्ण निष्काम झाले असले तरी जगतावर प्रेम करताना दिसतात.

🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

उत्तर


गीता सर्वांना समजावी म्हणुन गीतेवर बोलली माउली !

पण

खरे अध्यात्म "अमृतानुभव "आहे !

बाकी contradictions ( विरोधाभास ) व गोंधळ आहे .

 🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

प्रश्न-

Contradiction जर असते तर माऊलींनी मूळ गीतेपेक्षा ज्ञानेश्वरीला अधिक गुण दिले. त्याच माऊलींनी वेदा पेक्षा गीतेला अधिक गुण का दिले असावे, आणि अमृतानुभव तर "अनुभव म्हणजे भ्रम " असे आपण अंतःकरणातून नेहमी सांगत असता तर माझ्या सारख्या नवख्या साधकाच्या मनात ही contradiction होऊ शकते ना? त्या मानाने अमृतानुभव एका अंगाने fail ठरतो, दुसऱ्या अंगाने त्याची वाहवा होते. या बद्दल नेमके काय समजावे?

🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

उत्तर-


जे अद्वैत तत्वज्ञान सांगतात तेच खरे संत !

बाकी लोकांनी गोंधळ घातला आहे.

( आज औरंगाबादचा एक किर्तनकार पुरुष व सिल्लोड ची एक किर्तनकार महीला यानी घातलेल्या नको त्या गोंधळाची Clip you tube वर viral झाल्याची बातमी फिरत आहे खरे - खोटे देव जाणे)

द्वैत बुद्धी वाले गोंधळ घालतातच.

वेद त्रिगुणाधीन असल्याने वेदांच्या पलिकडे जा , हा भगवंताचा उपदेश योग्य आहे.

अमृतानुभव ची अपरोक्ष अनुभुती आधी घ्या मग बोलायची वेळ येणार नाही !

चार अवस्था निरास महत्वाचा !!

🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

प्रश्न

सर हे असले viral बदनाम किर्तनकार अद्वैत बुद्धी वाले सुद्धा नाही, आणि यांना खरी तर द्वैत बुद्धी ही नाही अशा लोकांकडे केवळ पोटभरी प्रापंचिक बुद्धी असु शकते, माऊलींनी त्या बुद्धी ला स्पष्टपणे 'कुमती ' असे म्हटलेले आहे.

 🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

उत्तर-

खरे आहे !

संप्रदाय - पंथ, गुरु - शिष्य परंपरा निर्माण झाली की हे संधीसाधु बदनामी करायला तयारच असतात.

पण खरी गुरु - शिष्य परंपरा नेहमीच गुप्त असते ती बाजारात कधीच उपलब्ध नसते, आणि तिचा क्रय - विक्रय ही होत नसतो .

 🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

प्रश्न -

एखाद्याला अमृतानुभवाचा अपरोक्ष अनुभव आहे की नाही हे ठरवण्याचे काय काय मापदंड आहेत सर ?
अमृतानुभव आकळला हे कसे कळावे ?

 🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

उत्तर-


स्वतःचा अनुभव खरा की खोटा हे स्वतःलाच समजते.

अंतकरण वृतीत आमुलाग्र बदल झाल्यास ज्याचा त्याला ते उमजते.


"स्व "चे किर्तन ऐकले की सर्व काही समजते.


जो कोणाच्याच सतरंज्या उचलत नाही त्यालाच ज्ञान होणे शक्य असते, परंपरेत ज्ञान होणे जवळ जवळ अशक्य !!

 🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

प्रश्न

मग असे आहे तर आपल्याला कसे समजले की मी मूर्ख आणि अज्ञानी आहे?
ज्याची जशी दृष्टी त्याचा तसा अनुभव . त्याला तुम्ही आम्ही काय करणार?

 🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

उत्तर-


परमसत्य ही देण्या घेण्याची वस्तु नाही हे माउलीने ज्ञानेश्वरीत सांगुन ठेवले आहे.

तरी शास्त्र मत ऐसे ।

आत्माची अज्ञान असे ।


अजुन काय सांगावे माउलीने.


मनुष्याच्या आकारातील ईश्वर पुजणारे मुर्ख व अज्ञानी असतात हे माउलीने नमुद करून ठेवले आहे...


तुम्ही अंतरंगात द्वैत मानता की अद्वैत मानता मला माहीत नाही...

 🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

प्रश्न-

पण माझ्या या भावार्थदीपिकेच्या ज्ञानयज्ञाने परब्रह्म बोध झाल्या शिवाय राहणार नाही असे माउलीने जाहीर केले आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांनी तसे आवाहन ही केलेले आहे .

 🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

उत्तर-


जो पात्र असेल त्याला !

ग्रंथ वाचनात ग्रंथ उमजल्यास बोध होत असतो.


पण त्याचे श्रेय माउली घेत नाही. केवळ वरवरचे श्रवण - वाचन आत्मज्ञान प्रकट नाही करू शकत !


मामाना नाही उमजली ज्ञानेश्वरी !आता काय करावे ?

एका प्रवचनात नाव घेतले तर जीप भरून लोक भांडायला घरी आले होते.


गीतेतील ईश्वर व योगातील ईश्वर भिन्न आहे हे त्यांचेच statement त्यांच्याच प्रस्तावनेत दाखवले तेव्हा लगेच उठुन गेले ते लोक..!

 🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

प्रश्न

अहो सर ,आम्ही तुम्हाला मानतो ,ते तुमच्या अंतःकरणातून प्रगट झालेल्या ज्ञान चिंतनामुळे !
नाही तर "विजय पांढरेला "
ओळखतय कोण ?

 🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

उत्तर-


व्यक्ती महत्वाची नाही !

   व्यक्तीचे मार्गदर्शन महत्वाचे असते !!


विवेकी मनाला अद्वैत बुद्धीची ची संगत आवडते, द्वैत बुद्धीपासून विवेकी मन दुर रहाते.


जो गुरु - शिष्य भानगडीत पडत नाही.

गुरु बनने ,संप्रदाय व आश्रम स्थापन करणे , सकाम लोकांना शिष्य बनवणे व दीक्षा देणे हा मुर्खपणा आहे . त्या भानगडीत विवेकी मन पडत नाही.

 🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

प्रश्न-

It means you are not in the way of taking responsibility for someone else !


 🌸🌿🌿🌿🌹      🌹🌿🌿🌿🌸

उत्तर -

अपो दीपो भव :

प्रत्येकाने आपली जबाबदारी आपणच घ्यायची असते. संवाद , चर्चा - मार्गदर्शन व चिंतन सुरु आहेत व सुरु रहातील .

पण कोणी कोणाला खांद्यावर नेवु शकत नाही...!


जे interested असतात ते संपर्कात असतात.


आपण सर्व सहप्रवासी मित्र आहोत.


All of us have to go through same riddle of ignorance of human consciousness !

.....................

- विजय पांढरे

+91 9822992578

10-04-2022

vbpandhare@gmail.com





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या