चिंतन 14 : आत्मज्ञान self realisation
.......................
Click on the following link for pdf👇👇
🌹 चिंतन 14 : आत्मज्ञान self realisation🌹
...........................
✍️ Vijay Pandhare
📳 Phone no:
9822992578
📧 Email:
.......................
चिंतन :self realisation
आज आपण "आत्मज्ञान" या विषयावर चिंतन करुयात.
आत्मज्ञान म्हणजे मी कोण ?याचे ज्ञान .
आपल्या सर्वाना मी आहे असे नेहमी भासत असते पण मी म्हणजे नेमक काय आहे व मी चा भास कसा निर्माण
होतो.
हे काही नेमक उमजत नाही.
या मी च्या भासाचा संपुर्ण बोध होणे याला आत्मज्ञान म्हणतात.
जो पर्यंत मी कोण?
हे नक्की कळत नाही,
जो पर्यंत मीच्या भासाचा नक्की खुलासा होत नाही तो पर्यंत
समाधान, तृप्ती व दुःखमुक्ती नसते.
मी चा भास काय आहे? हे नक्की माहीत नसणे यालाच दुःख म्हणतात.
मी नावाची वस्तु अस्तित्वातच नाहे हे माहीत असणे आत्मज्ञान आहे.
मी चा भास ही गोष्ट आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे व आपल्याला या मी च्या भासाचे मुळ माहीत नाही हा खरा problem आहे. हा खरा प्रश्न आहे.
मीच्या भासाची मी च्या भासाला ओळख नसणे हेच खरे दुःख आहे .
आपण जर या मी चा शोध घेतला तर असे दिसते की, मी आहे असे आपल्याला भासते पण मी कोण आहे ? हा खुलासा काही केल्या आपल्याला होत नसतो व मी कोण आहे हे माहीत नसणे हेच सर्व असमाधानाचे , अतृप्तीचे व दुःखाचे कारण आहे .
मी कोण?(Who am I?) हा प्रश्न आपल्याला सुटत नसतो म्हणुन त्यासाठी आपल्याला संतांना शरण जावे लागते कारण संताना मी कोण? हे नक्की नक्की समजलेले असते.
आपण संताना जर मी कोण असे विचारले तर संत सांगतात की या जगात दोनच गोष्टी आहेत.
अनुभवणारा -अनुभव
मी व मला येणारा अनुभव
द्रष्टा - दृश्य
observer - observed
experiencer - experience
Seer -seen
ज्ञाता - ज्ञेय
या दोन्ही गोष्टी स्वानुभुतीवर अपरोक्षपणे समजुन घेणे म्हणजे अध्यात्म आहे.
गितेत व ज्ञानेश्वरीत हेच सांगेतलेले आहे की या दोन गोष्टी जाणा .
या दोन गोष्टी जाणल्या की मग काहीही
जाणायचे शिल्लक रहात नाही.
अध्यात्मात या दोन गोष्टी साठी विविध शब्द वापरले आहेत.
जसे
दृष्टा - दृश्य
अनुभविता -अनुभव
ज्ञाता - ज्ञेय
चेतन -जड
पुरुष -प्रकृती
नाम -रूप
अहम -ईदम
observer-observed
experiencer-experience
unvisible-visible
unknown-known
ज्ञान -विज्ञान
अक्षर -क्षर
अद्वैत -द्वैत
ब्रहम -जीव
सत - असत
स्वधर्म -परधर्म
निरुपाधीक -उपाधी
पारलौकिक आणी लौकिक
परा -अपरा
व्यक्त -अव्यक्त
अदृश्य -दृश्य
क्षेत्र-क्षेत्रज्ञ
निर्गुण -सगुण
गुणातीत -गुण
भावातीत -भाव
व्यक्त - अव्यक्त
योग -योगी
सिद्ध -साधक
कर्म -कर्ता
श्रद्धातीत -श्रद्धा
me non me
subject-object
तत त्वम
परब्रहम -ब्रह्म
जीव -जगत
पाहणारा -पाहीलेले
कायानुपश्यी -काया
वेदनानुपश्यी -वेदना
चितानुपश्यी -चित्त
धम्मनुपश्यी- धम्म
अपरोक्ष-परोक्ष
कालातीत - काल
शब्दातीत -शब्द
विषयी - विषय
Non material energy-material energy
Energy-matter
Spirit-matter
invisible - visible
आत्मतत्व -अनात्म तत्व
नित्य तत्व -अनित्य तत्व
दुःखमुक्त तत्व -दुःख तत्व
consciousness and
content of consciousness.
चेतन -जड
असे या सर्व जोडगोळ्या आपल्या लक्षात आल्या पाहीजे.
चेतन ची अनुभुती कशी येईल ?
मग संत सांगतात की
आता जडाची अनुभुती तर आपल्याला येते पण चेतन ची अनुभुती येत नाही .
ही जोडगोळी ओळखता आली पाहीजे.
या जोडगोळीतील जड ओळखला तर चेतन समजण्यात येत असतो..
झाड दिसत कोणाला ?
झाड ज्याला दिसते तो द्रष्टा कोण ?
झाड द्रष्टा आहेका ?
झाडाला दिसते का?
झाड जड आहे पंचभुत आहे .
पंचभुताला कसे दिसेल ?
मग डोळा द्रष्टा आहे का ?
डोळ्याला झाड दिसते का ?
डोळा तर जड आहे .
मग डोळ्याला कसे दिसेल.
मग चित्त द्रष्टा आहे का ?
मग चिताला झाड दिसते का ?
चित्त तर जड आहे
मग चित्ताला झाड कसे दिसेल ?
मग बुद्धी द्रष्टा आहे का?
बुद्धीला झाड दिसते का ?
बुद्धी तर जड आहे
मग बुद्धीला झाड कसे दिसेल ?
बुद्धीचे काम फक्त मुल्यांकन करणे आहे.
मग मन द्रष्टा आहे का ?
मनाला झाड दिसते का ?
पण मन तर जड आहे
मग जडाला कसे दिसेल ?
मग मनाच्या अधीष्ठानाला दिसते का ? नाही कारण मनाचे अधीष्ठान स्वतालाही जाणत नाही मग ते दुसऱ्याला कसे जाणणार ?
मग दिसते कोणाला ?
तर याचे उत्तर असे आहे की
consciousness ही
consciousness
and
content of consciousness ही joint phenomenon आहे .
नामरुपातीत व नाम रुपाची joint phenomenon आहे .
नामरूप म्हणजे
विज्ञान- संज्ञा- वेदना- संखार
awareness - perception - experience - experiencer
किंवा
awareness - valuation-sensation - desire
हा content of consciousness जाणला गेला असता content of consciousness च्या अधीष्ठानाचा बोध अधीष्ठानाला होत असतो.
मग प्रश्न येतो
की
नाम रूपाला जाणायचे
म्हणजे
Experiencer -experience ला जाणायचे .
संत सांगतात की पहिल्यांदा experience ला जाणा .
मग
Experience म्हणजे काय ?
तर👇
Experience is past .
Experience is individual past .
Experience is collective past .
Experience is universal past .
Experience is conditioning .
Experience is individual conditioning .
Experience is collective conditioning .
Experience is universal conditioning .
Experience is illusion .
Experience is individual illusion .
Experience is universal illusion .
Experience is division .
Experience is time .
Experience is old momentum .
Experience is individual momentum .
Experience is individual memory .
Experience is collective memory .
Experience is universal memory .
Experience is mechanical movement .
Experience is individual/
collective/
universal movement .
Experience is individual/
collective/
universal habbit .
Experience is individual habbit .
Experience is collective habbit .
Experience is universal habbit .
Experience is individual/
collective/
universal addiction .
Experience is individual/
collective/
universal disease .
Experience is individual/
collective/
universal remoulding .
Experience is individual/
collective/
universal becoming .
Experience is individual/
collective /
universal ignorance .
Experience is individual/
collective/
universal cycling .
Experience is individual/
collective/
universal concept .
Experience is पंचभूत पसारा .
Experience is individual/
collective/
universal tradition .
Experience is individual/
collective/
universal culture .
Experience is individual/
collective/
universal hypnotism .
Experience is individual/
collective/
universal belief .
Experience is individual/
collective/
universal bondage .
Experience is individual/
collective /
universal part - carat phenomenon.
Experience is sweet poison .
Experience is experiencer .
observer is observed.
द्रष्टाच दृश्य आहे हे ओळखता आले पाहिजे.
Real meditation means to be aware of observer-observed phenomenon moment to moment .
One must understand
द्रष्टा दृश्य phenomenon
द्रष्टा दृश्य ही एक joint illusory phenomenon आहे.
दोन्ही असले तर नेहमी सोबत असतात .
एक नसला तर दुसराही नसतो.
उदय पावतात तेव्हा दोन्ही एकाच वेळी उदय पावतात .
लय पावतात तेव्हा दोन्ही एकाच वेळी लय पावतात.
एकाशिवाय दुसऱ्याला अस्तित्व नसते .
दुसऱ्या शिवाय पहिल्याला अस्तित्व नसते .
रात्री गाढ झोपेत कोणताही अनुभव नसेल तर अनुभवणारा ही नसतो.
Experience is experiencer दोन्ही असले तरच आपण असल्याची अनुभुती असते.
दिसत,
समजत ,
कळत ,
जाणवत ते
एका joint divisive illusory consciousness phenomenon ला .
Individualघटकाला कळत नसते.
अधीष्ठानाला कळत नसते .
विज्ञान/ awareness ला कळत नसते .
संज्ञा / valuation ला कळत नसते .
वेदना / Experience ला कळत नसते.
तृष्णेला कळत नसते .
अहमचा भास निर्माण होवुन अहमला कळते जे resultant consciousness ला कळवते.
ते उपादान ला म्हणजे byproduct असलेल्या अहमला कळते असा भास निर्माण होतो.
तन्हा पच्चया उपादान
उपादान पच्चया जाती जरा मरण दुख...
या
द्रष्टादृश्य phenomenon ची अनुभुती चारी अवस्थात असते.
चारी अवस्था पलिकडे द्रष्टा दृश्य दोन्ही नसतात .
द्रष्ट्या दृश्याच्या complete eradication मधे Nothingness /eternity प्रकटते.
दोन्ही नसतात तेव्हा आपणही नसतो. असते फक्त कालातीत तत्व .
पण ही झाली बुद्धीच्या स्तरावरची परोक्ष चर्चा.
ही चार अवस्था निरासाची अनुभुती Real meditation मधे अपरोक्ष अंतरंगात प्रकटली पाहीजे..
त्या आधी द्रष्टा - दृश्य समजले पाहीजे.
This is Real meditation.
जसे
जेव्हा लोखंडाचा चटका लागतो तेव्हा चटका लोखंडाचा नसतो तर उष्णतेचा असतो ,
पण जेव्हा चटका लागतो तेव्हा लोखंड व उष्णता अभिन्न असते तेव्हा उष्णता व लोखंड यांची joint phenomenon कार्यरत असते.
उष्णता अदृश्य असते पण लोखंडाशी एकरूप होवून तीचे अस्तित्व दाखवते तसे अनुभवणारा अनुभवासोबत प्रकट होत असतो.
याला म्हणतात द्रष्टाच दृश्य आहे .
जडा सोबत चेतन असेल तेव्हाच जडाला अस्तित्व असते .
तसा
अनुभवा सोबत अनुभवणारा असतो म्हणुन अनुभव समजतो.
चेतन व जड़ यांच्या विच्छेदाला मृत्यु म्हणतात.
हा मृत्यु असतो.
पंचभौतिक जड़ शरीरातून पंचभौतिक सुक्ष्म चेतन निघुन जाते त्याला नाम रुपाचा विच्छेद म्हणतात.
चारी अवस्थेत असा विच्छेद क्षणभर होण्याला insight / self realisation म्हणतात.
जसे पोळणे व उष्णता सोबतच असतात तसा अनुभवा सोबत अनुभवणारा असतो.
ओलसरपणा व जल तत्व जसे सोबत असतात तसे अनुभव व अनुभवणारा सोबत असतात .
गुणा सोबत गुणी असतो .
ज्ञेया सोबत जाता असतो.
विषया सोबत विषय असतो .
ईदम सोबत अहम असतो .
जडपणा पृथ्वी तत्वासोबत असतो कारण पृथ्वी तत्व व जडपणा ही joint प्रक्रिया आहे.
तसा अनुभवा सोबत अनुभवणारा असतो.
दृश्या सोबत द्रष्टा असतो.
कारण आकाश तत्व हे द्रष्टा दृश्य phenomenon आहे
तुका आकाशा एव्हढा
जग आणी मी ही एक joint consciousness phenomenon आहे.
असतात तर दोन्ही असतात नाही तर दोन्ही नसतात.
मी असलो तरच जग असते व जग असेल तर मी असतो .
वायु तत्व हे द्रष्टा दृश्य ही joint illusory consciousness phenomenon आहे.
जलतत्व हे द्रष्टा दृश्य ही Joint divisive illusory consciousness phenomenon आहे.
उष्णता हे द्रष्टा दृश्य ही joint divisive llusory consciousness phenomenon आहे.
सर्व पंचभूते ही illusory joint divisive consciousness रुपी द्रष्टा दृश्य phenomenon आहे.
सर्व जगत पंचभूतापासून बनले आहे म्हणुन जगही joint divisive illusory consciousness रुपी द्रष्टा-दृश्य phenomenon आहे.
प्रत्येक अनुभव illusory joint divisive consciousness रुपी द्रष्टा दृश्य phenomenon असतो.
डोळे, नाक, कान त्वचा व जीभ यांच्या दिसणे, वास येणे, ऐकु येणे, स्पर्श कळणे, चव उमजणे या सर्व क्रिया joint divisive illusory consciousness रूपी द्रष्टा दृश्य phenomenon आहेत ( वेदनानु पश्यना )
उठणे - बसणे -चालणे, वळणे - वाकणे, पळणे - खाणे - पिणे ,लघवी करणे या सर्व शारीरीक हालचाली या joint divisive illusory consciousness रूपी द्रष्टा - दृश्य phenomenon आहेत. (कायानुपश्यना )
दिसते तेव्हा मी व दिसणे भिन्न नसते . दिसणे व मी ही joint ilusory consciousness phenomenon आहे.
ऐकु येते तेव्हा ऐकु येणे व मी ही joint illusory consciousness phenomenon आहे.
वास येतो तेव्हा मी व वास भिन्न नसतात. वास व मी ही joint phenomenon आहे.
चव कळते तेव्हा मी व चव भिन्न नसते, चव व मी ही joint phenomenon आहे.
स्पर्श समजतो तेव्हा मी व स्पर्श, भिन्न नसतो, मी व स्पर्श ही joint आहे.
विचार, भावना प्रतिक्रिया या सर्व द्रष्टा दृश्य phenomenon आहेत.
action - actor ही द्रष्टा दृश्य phenomenon आहे.
दृश्या शिवाय seperate द्रष्टा अस्तित्वात नसतो. There is no seperate entity apart from दृश्य .
द्रष्टा दृश्य यांचा संबंध समजणे हे understanding the relationship आहे.
काम, क्रोध, लोभ, मद, मोह मत्सर या सर्व द्रष्टा दृश्य phenomenon आहेत...
हे बुद्धाचे महासती पठाण आहे.
हा माउलीचा अमृतानुभव आहे.
हे कृष्णमूर्ति चे real meditation आहे.
द्रष्टा दृश्य रूपी मी या भास हेच बंधन आहे.
दृश्या सोबत भासणारा व प्रत्येक दृश्यासोबत बदलत असणारा अनित्य अशा स्वभावाचा द्रष्टा मी आहे असे वाटणे हा भ्रम व बंधन आहे ही अविद्या आहे.
द्रष्टा दृश्याच्या खेळात मी चा भास खरा वाटणे व या मनोद्वैताच्या खेळात द्रष्टाच दृश्य आहे हे माहीत नसणे व चार अवस्थात्मक द्रष्टा दृश्याचे अधीष्ठान अपरोक्ष माहीत नसणे हे बंधन आहे
मी व माझे या भासाची समुळ निवृती अगदी चारी अवस्थात अपरोक्ष पणे होणे Real meditation आहे.
ज्याना Real meditation समजत नाही ते अज्ञानीच रहातात.
ज्याना द्रष्टाच दृश्य आहे हे समजत नाही ते अज्ञानीच रहातात.
कृष्णमूर्ति समजुन घेत नाहीत ते अज्ञानीच रहातात.
ज्याना चारी अवस्था निरास समजत नाही ते अज्ञानीच रहातात.
मनुष्यपणी साधावे हे निर्वाण ।
नाही तरी मुर्ख पशुहुन ॥
संताचे संगती ।
मनोमार्गे गती ।
आकळावी मुक्ती ।
येणे पंथे ॥
द्रष्टा दृश्य जे उमजणे,
तेच तयांचे दहन होणे,
चारी वाचा निरसणे ।
सार आहे ॥
द्रष्टा आणी दृश्याते ।
जाणणे जे पुरते ।
ज्ञान ऐसे तयाते ।
मानू आम्ही ॥
सोपी सांगतो खुण ।
जेथे पावे तो निर्गुण ।
अवधानी विझु दयावे मन ।
मग प्रकटे निर्वाण ॥
ही post नुसती वाचणे किंवा श्रवण करणे कामाचे नाही.
द्रष्टादृश्य समजेत चार वाचा निरास अपरोक्ष अंतरंगात अनुभुत झाला तरच निर्वाण प्रकटते.
आत्मज्ञाना साठी द्वैत साधना काहीच उपयोगाची नसते.
जगाचा कर्ताधर्ता ईश्वर मनुष्याच्या आकारातील मुर्तीत पुजणारे व पूजा अर्चा, प्रार्थना व जप तप तथा नाम घोकुन परमतत्व अंतरात प्रकट होते असे मानणारे अज्ञानी आहेत.
द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न असतो असे साधनेत शिकवणारे भगवे कपडे घातलेले सर्व गुरु अज्ञानी आहेत.
Osho ,अष्टावक्र ,आदि शंकराचार्य, व्यास, स्वामी चिन्मयानंद आसाराम कृपालुजी महाराज, स्वामी परमानंद तथा द्रष्टा दृश्या पेक्षा भिन्न असतो असे शिकवणाऱ्या सर्व परंपरा अज्ञानी परंपरा आहेत.
असो.
बुद्ध, माउली संत ज्ञानेश्वर व जे कृष्णमूर्ति हेच खरे सदगुरु आहेत.
जे द्रष्टाच दृश्य आहे अशी या तिघा महान सदगुरु सारखी शिकवण देतात व Real meditation शिकवतात तेच खरे मार्गदर्शक आहेत.
अजून जास्त काय सांगु !!
आजच्या साठी पुरे झाले.
.................
- विजय पांढरे
9822992578
29-01-2022
vbpandhare@gmail.com
0 टिप्पण्या
Ask your doubt ..