3 ) चिंतन: द्रष्टाच दृश्य आहे Observer is observed

चिंतन 3 : द्रष्टाच दृश्य आहे Observer is observed

द्रष्टाच दृश्य आहे Observer is observed


.............................

click on the following link for pdf👇👇



.................................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

...............................

चिंतन  : Observer is observed


 (i) जागृती, स्वप्न व सुषुप्तीतील observer- observed phenomenon जर observer is observed या समजेत निरास होऊ शकली तर वैश्विक द्रष्टा - दृश्याचा म्हणजे ब्रह्ममयतेचा उदय होत असतो व वैश्विक द्रष्टा - दृश्याचा ही observer is observed या समजेत निरास झाला असता शाश्वत चिरंतन तत्वाचे म्हणजे कालातीत - शब्दातीतचे प्रकटन अंतरात होत असते.

म्हणून

Real meditation उमजणे सार आहे.


(ii) ज्या मनाला हे जग व मी म्हणजे द्रष्टा - दृश्य खरे आहेत असे वाटते ते मन या जगातील राग - द्वेष, सुख, ईच्छा -लोभ या  मोहजाळात अडकुन शेवटी दुःखाला प्राप्त होते. जसा मासा गळाला लावलेल्या अमिषाला बळी पडुन सर्वनाश करून घेतो , तसे.


(iii) observer - observed phenomenon ही मृगजळाप्रमाणे केवळ भास आहे स्वप्नाप्रमाणे , हे real meditation मधे उमजणे अध्यात्म सार आहे.

observer is observed या बोधात चार अवस्था निरास अंतरंगात अपरोक्ष प्रकटणे सार आहे.


मृगजळ व हे पंचभौतिक जग या दोन्ही स्वप्नाप्रमाणे भ्रमजन्य प्रक्रिया आहेत.


(iv) Space and time मधे बद्ध असलेली चार अवस्थात्मक

observer- observed phenomenon 

जी प्रतिक्षण बदलणारी अनात्म phenomenon आहे ती real कशी असू शकेल.

जे सतत बदलते ते कल्पनेच्या अधीन असते .

चार अवस्थात्मक मानसिक घडामोडी कारण जगदाभास चित्ताठायी प्रकटत असतो .

जे शाश्वत व चिरंतन असते ते चार अवस्थात्मक space - time च्या पलिकडे असते.


( v) सकाम मन फक्त जागृती व स्वप्न या दोनच अवस्था जाणते. सकाम मनाला सुषुप्ती तुर्या व तुर्यातील उमजत नसतात.


सुषुप्तीला गाढ निद्रा म्हणणारे लोक अज्ञानी असतात.


Real meditation मधे

observer is observed या समजेत सुषुप्तीच्या अपरोक्ष निरासात जीव व ब्रह्माची एकरुपता अपरोक्ष उमजणे अनात्म बोध आहे.


सुषुप्ती म्हणजे "space with center" ="Extreme fear "


"आपुले मरण पाहिले म्या डोळा "


ब्रह्म म्हणजे "तुका आकाशा एव्हढा "


"space without center


"मरण माझे मरून गेले"


ही अपरोक्ष अनुभुती आहे.


( vi) ज्या मनात कामना असते व ज्या मनाला जीव व जगत खरे वाटते त्या मनात सुषुप्ती तुर्या व तुर्यातीत चा अपरोक्ष बोध कधीच होत नसतो .


( vii) Existence of चार अवस्थात्मक observer - observed phenomenon on the ground of Nothingness is just a false appearance like a mirage in sun rays .


( viii) Self realisation is not a process of learning something new but it is a process of unlearning the false knowledge gathered and sustained by illusory observer - observed  consciousness process of ego which is illusion .


(ix) जो पर्यंत विश्वाभास खरा वाटतो तो पर्यंत सुषुप्तीचा बोध सुषुप्तीला होतच नसतो. ज्या मनाचे जगदाभासाशी म्हणजे जागृती व स्वप्नाशी तादात्म्य तुटते तेच मन सुषुप्ती अपरोक्ष जाणते .


(x) अज्ञानी माणसाला मी जगात आहे असे वाटते तर ज्ञान्याला माझ्यात जग आहे असे वाटते.

आणि

परब्रह्म ठिकाणी मी व जग दोन्ही नाहीत...

..................

- विजय पांढरे

+91 9822992578

14-01-2022

vbpandhare@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या