ज्ञानेश्वरी चिंतनमालिका - 1 : मी कोण ? Who Am I ?

ज्ञानेश्वरी चिंतनमालिका - 1: मी कोण ? Who Am I ?


ज्ञानेश्वरी चिंतनमालिका - 1: मी कोण ? Who Am I ?

Click on the following link for pdf👇👇

🌹 ज्ञानेश्वरी चिंतनमालिका - 1: मी कोण ? Who Am I ?🌹

............................

✍️ Vijay Pandhare 


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

..............................

चिंतन- १ : मी कोण ? Who Am I ?

🌸🌿🌿🌿🌹   🌹🌿🌿🌿🌸


     या जगात सुखाने राहायचे असेल तर जग म्हणजे काय, मी म्हणजे काय, जगाचा व माझा काय संबंध आहे हे जाणून घेतलेच पाहिजे. हेच बुद्धिवंताचे काम आहे. 

जग म्हणजे काय याचा जो शोध घेतो त्याला विज्ञान म्हणतात तर मी म्हणजे काय याचा जो शोध घेतो त्याला अध्यात्म म्हणतात.

 जगाचा शोध घेणाऱ्यांना मी म्हणजे काय याचा शोध लागत नाही पण मी म्हणजे काय याचा शोध घेणाऱ्यांना जग म्हणजे काय व जगाशी माझा संबंध काय यांचा बोध नक्कीच होत असतो.

 म्हणून विज्ञान अपूर्ण आहे. तर अध्यात्म पूर्ण आहे .

जग जाणल्याने प्रश्न सुटत नाहीत तर मी कोण हे जाणल्याने सर्व प्रश्न सुटतात. 

मी कोण हे जे जाणतात त्यांना संत म्हणतात व जग म्हणजे काय हे जे जाणतात त्यांना शास्त्रज्ञ म्हणतात.

 शास्त्रज्ञ स्वतःला जाणत नाहीत. मग जो मनुष्य स्वतःला जाणत नाही तो बुद्धिमान आहे असे कसे म्हणता येईल? 

केवळ भौतिकवादी बहिर्मुखी व्यक्तींना बुद्धिमान म्हणता येणार नाही. म्हणून केवळ संतच बुद्धिमान आहेत.


जो मनुष्य स्वतःला जाणत नाही व जगाला सुखी करायला निघाला आहे त्याच्या बुद्धिची कीव करावी तेवढी थोडी आहे.

 अशा भ्रमित लोकांच्या हाती या भौतिक जगाची सत्ता असल्यानेच आज जग दुःखी झालेले आहे आणि अधिकाधिक दुःखाच्या गर्तेत जात आहे. 

असे असूनही आपण भौतिकतेच्या मागे जायचे की अध्यात्मिकतेकडे जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे व कोणत्या दिशेला जायचे याचे संपूर्ण स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. 

या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करा अथवा सदुपयोग करा ती ज्याची त्याची निवड असणार आहे.


कारण मी कोण याचा शोध ज्याला लागतो त्याला मीच विश्व आहे हाही शोध लागतो व मग मिळवण्यासारखे काहीही राहात नाही कारण ते अनंत अमर्याद, अजरामर अमृततत्त्व तुम्हीच असल्याचा बोध तेंव्हा तुम्हाला झालेला असतो .


🌿🌿🌿🌹  🌹🌿🌿🌿

ज्ञानेश्वरी चिंतनमालिका :

ज्ञानेश्वरी चिंतनमालिका 1 ते 21 चिंतने pdf book - विजय पांढरे

ज्ञानेश्वरी चिंतनमालिका 1 ते 21 चिंतने
pdf book
- विजय पांढरे




View   👈         👇
Dnyaneshwari chintan malika book download

        


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या