10081)चिंतन : मोक्षासाठीच्या आवश्यक साधक पात्रता mokshasathichya avashyak sadhak patrata

 चिंतन 10,081 : मोक्षासाठीच्या आवश्यक साधक पात्रता mokshasathichya avashyak sadhak patrata


मोक्षासाठीच्या आवश्यक साधक पात्रता mokshasathichya avashyak sadhak patrata

.............................

Click on the following link for pdf👇👇

🌹 चिंतन 10,081 : मोक्षासाठीच्या आवश्यक साधक पात्रता 🌹

 .............................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

...................

चिंतन : मोक्षासाठीच्या आवश्यक साधक पात्रता mokshasathichya avashyak sadhak patrata

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एका साधक मित्राने प्रश्न विचारला आहे की , मोक्ष प्रकटनाचा विधी कोणता आहे ? 
चला या प्रश्नावर चिंतन करुयात .


ज्या मनाला ,

आपण दु:खात आहोत ,


आपण काळजीत आहोत ,


आपण चिंतेत आहोत ,


आपण भयग्रस्त आहोत ,


आपण बंधनात आहोत ,


आपण अज्ञानात आहोत 


असा बोध होतो ते मन अंतर्मुख होते व अशा मनात बंधनातुन मुक्त होण्याची ईच्छा प्रकटते .

मग 

 अशा मनाची जेव्हा सदगुरुशी गाठ पडते तेव्हा  

जर ते जिज्ञासु मन जर निष्कामतेकडे झुकलेले , 

सत्य शोधक मन असेल तर 

सदगुरुचे वचन कानावर पडल्यावर त्या साधकाच्या अंतरंगात मन प्रक्रियेचा बोध होवुन त्या द्वैत मन प्रक्रिया बोधात मनाचा अपरोक्ष निरास अनुभुत होवुन , अंतरंग चार अवस्था निरासात स्वरुपबोध प्रकटत असतो . 


पण यासाठी साधकाची पात्रता व अशा पात्र साधकाची अपरोक्ष आत्मज्ञानी सदगुरुशी गाठ पडणे या दोन अटी अनिवार्य असतात .


साधक जर निष्कामतेकडे झुकलेला नसेल तर सदगुरुची वाणी व सदगुरुच्या वाणीचा लक्ष्यार्थ साधकाला कळत नसतो . 


सदगुरुच्या वाणीचा लक्ष्यार्थ कळण्यासाठी साधकाच्या अंगी खालील पात्रता आवश्यक असते . 


✨🌿(१) सदगुरुची वाणी उमजण्यासाठी साधकाचे मन सत्यवचनी व शिलवान असावे लागते .  


ज्या साधकाच्या मनात आत्मबोधा विषयी अत्यंत कळकळ व तळमळ असते अशाच मनाला आत्मबोध प्राप्त होत असतो . 


अशुद्ध स्वार्थी व पोटभरु चित्ताला सदगुरु उपदेश अंतरात आकळत नसतो . 


जो साधक कोण्याही शास्त्राचा वा गुरुचा वा पंथाचा वा संप्रदायाचा गुलाम नसतो अशाच मनाला आत्मज्ञान होणे शक्य असते . 


पंथ व संप्रदाय यांना टोळ्यांचे  स्वरुप प्राप्त होत असल्याने अशा टोळ्यात रहाणाऱ्याना आत्मज्ञान प्राप्त होत नसते . 


🌺🌿( २ ) साधकाला आपण दु:खात , भयात , काळजीत , चिंतेत व 

अज्ञान रुपी बंधनात अडकलेलो आहोत याची जाणीव झालेली असावी लागते व या बंधानातुन बाहेर पडण्याची ईच्छा असावी लागते . 


ज्या साधकाला स्वतःच्या अज्ञानाची बंधनाची व दु:खाची जाणीव झालेली नसते अशा साधकाला सदगुरुच्या वाणीचा लक्ष्यार्थ कळत नसतो .


✨🌿(३ ) अशा साधाकाचे मन , बुद्धी , विचार , ईंद्रिय , भावना ,

एंद्रिय अनुभवाशी व अहमशी तादात्म तुटलेले नसेल तर सदगुरुच्या वाणीचा खरा बोध अशा अपात्र साधकाला अंतरात होत नसतो .


🌺🌿(४ ) सदगुरुच्या वाणीचा लक्ष्यार्थ अंतरात प्रकटण्यासाठी , साधकाचे गुण व आकाराशी , विचार व मनाशी तादात्म्य तुटलेले असावे लागते . 


✨🌿(५) जो साधक मन समत्वाला प्राप्त होतो त्याच साधकाच्या मनात सदगुरुच्या शब्दांचा लक्ष्यार्थ प्रकटत असतो . 


🌺🌿(६) ज्या साधकाच्या मनात मोक्षप्राप्तीचे चिंतन अखंड चालते , अगदी ज्या साधकाच्या स्वप्नातही मुक्ती व मोक्षाचा विचार सुरु असतो तोच साधक मुक्ती व मोक्षाला प्राप्त होत असतो . 


वर वर अध्यात्म करणाऱ्या मनाला कधीही आत्मज्ञान होत नाही . 


✨🌿(७) पाकीट घेवुन प्रवचन व किर्तन करणारे शब्द पंडीत असलेले पोपटपंची व शाब्दीक पाठांतरात निष्णात असलेले शब्दज्ञानी प्रवचनकार लोक कधीही आत्मज्ञानाला प्राप्त होत नाहीत . 


🌺🌿(८) जे साधक नाम -जपात , मुर्तिपुजेत , कर्मकांडात , अंधश्रद्धात , अंधविश्वासात व अंध मान्यता मधे अडकलेले असतात त्यांना कधीही आत्मज्ञान प्राप्त होत नसते . 


✨🌿(९) गुरु , पंथ , संप्रदाय , धर्म , शास्त्रे , कर्मकांड , द्वैत साधना विधी , शब्द पाठांतर व सकाम मन यात बद्ध असलेल्या साधकाला कधीही आत्मज्ञान होत नाही . 


🌺🌿(१०) आत्मज्ञान होण्यासाठी साधकाची बुद्धी सजग , निष्काम व स्वतंत्र असावी लागते .


मनाचा समुळ निरास समजेत होणे हीच आत्मज्ञानाची गुरु किल्ली आहे .


✨🌿(११) पंथ संप्रदाय व गुरु बाजीच्या मानसीक गुलामगीरीत अडकलेल्या व दुसऱ्यावर अवलंबुन असलेल्या मनाला कधीही आत्मज्ञान होत नाही . 


🌺🌿(१२) जे मन निर्विचार व निष्काम दशेला प्राप्त होवु शकत नसेल त्या कामनांच्या व 

विचारांच्या गुंत्यात अडकलेल्या 

मनाला कधीही आत्मज्ञान होत नाही .


✨🌿(१३) जे मन सजग तटस्थतेला किंवा निर्विकल्प निरीक्षणाला किंवा संकल्प -विकल्प रहीत अवस्थेला प्राप्त होते त्याच मनाला आत्मज्ञान होत असते .  


🌺🌿(१४) जे मन ईच्छा , कामना , वासना व महत्वाकांक्षा तथा पद -पैसा , प्रतिष्ठेच्या व स्पर्धेच्या मागे धावत असते अशा मनाला कधीही 

आत्मज्ञान होत नाही . 


✨🌿(१५) फक्त निरीच्छ मनच आत्मज्ञानासाठी पात्र मन असते . 


🌺🌿(१६) फक्त अपरोक्ष ज्ञानी सदगुरुच्या संगतीतच पात्र मनात आत्मज्ञान प्रकटत असते .


✨🌿(१७) सकाम मनाला , 

केवळ वेदांत शास्त्र अभ्यासुन 

केवळ शब्दज्ञानी गुरुच्या सानिध्यात राहून कधीही आत्मज्ञान होत नसते .


🌺🌿(१८ ) ज्याचे मन सरळ साधे ,निष्कपट व भोळे असते 

अशाच मनाला सदगुरुच्या सहवासात आत्मज्ञान प्राप्त होणे शक्य असते .


आजच्या युगात असे भोळे व निरागस मन असणे ही फारच दुर्मीळ गोष्ट आहे . 


✨🌿(१९) सकाम , चतुर कपटी व स्वार्थी मनाला कधीही आत्मज्ञान होत नाही . 


🌺🌿(२०) द्रष्टाच दृश्य आहे या आंतरीक बोधात चारही अवस्थातील चित्ताची शुद्धी अपरोक्ष झाल्या शिवाय स्वरुप बोध होतच नसतो .


✨🌿(२१) चार अवस्था निरासाची कला जाणणारे सदगुरु अत्यंत दुर्मीळ आहे ,आज पोटभरु तथा कामी क्रोधी गुरुंचा सर्वत्र सुळसुळाट झालेला आहे . 


🌺🌿(२२) फक्त अपरोक्ष आत्मज्ञानी गुरुच्या शब्दांतच पात्र शिष्याला आत्मज्ञान करुन देण्याची ताकद असते . 


✨🌿(२३) केवळ शब्दज्ञानी , शास्त्र ज्ञानी असलेल्या गुरूंच्या संगतीत कधीच आत्मज्ञान प्राप्त होत नाही , "आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठुन येणार " . 


🌺🌿(२४) अपरोक्ष चार अवस्था निरासात अपरोक्ष स्वरुप बोध प्रकटल्याशिवाय चार अवस्थात्मक सांसारिक भवचक्र भासाची म्हणजे पंचभुतात्मक व नाम - रुपात्मक विश्वाभासाची उपाधी निरास होत नसते . 


✨🌿(२५) त्रिगुणात्मक असलेल्या सगुण व सकाम श्रद्धेत अडकलेल्या  

मनाला कधीही आत्मज्ञान होत नाही . 


असो .

आज ईतके पुरे झाले .

🙏🙏

..............

-विजय पांढरे

+91 9822992578 

23 -05-2023 

Youtube channel

"Vijay Pandhare"

vbpandhare@gmail.com 

.......................


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या