10080 ) चिंतन :मी चा भास हाच खरा गुन्हेगार ! Illusion of self is real culprit

चिंतन 10,080 : मी चा भास हाच खरा गुन्हेगार ! Illusion of self is real culprit


चिंतन 10,080 : मी चा भास हाच खरा गुन्हेगार ! Illusion of self is real culprit

  ............................

Click on the following link for pdf👇👇

🌹 चिंतन 10,080 : मी चा भास हाच खरा गुन्हेगार ! Illusion of self is real culprit🌹

..........................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

.......................

चिंतन : मी चा भास हाच खरा गुन्हेगार ! Illusion of self is real culprit  

🥀✨🥀✨🥀✨🥀✨🥀

सर्व प्रथम निर्गुण निराकाराठायी अज्ञानात, मी चा भास ( सगुण ब्रह्म भाव ) निर्माण झाल्याने त्यातुन पुढे द्वैत निर्माण होवुन त्या द्वैतापोटी , संपुर्ण विश्वाभास व जन्म मरणाच्या भवचक्राचा भास निर्माण झाला आहे . 

हा मी चा भास द्वैत व अद्वैत या दोन्ही रुपात अंतरंगात वास करत असतो . अंतरंगात वास करत असलेल्या या वैयक्तीक द्वैत व वैश्विक अद्वैताचा बोध होवुन जर द्रष्टाच दृश्य बोधात या वैयक्तीक द्वैत व वैश्विक अद्वैताचा निरास अंतरंगात अपरोक्ष अनुभुत होण्याची कला सदगुरु शिकवत असतात  .

 ही कला आत्मसात करण्याची पात्रता ज्या मनात असते त्या मनात आत्मबोध प्रकटु शकत असतो .


हा मी चा भास मनात शिल्लक असे पर्यंत जन्म मरणाचा भास सुरुच रहात असतो . 


म्हणुन सदगुरु प्रथम, 

मी कोण आहे? याचा शोध एखाद्या शात्रज्ञा प्रमाणे घेण्याचा उपदेश करत असतात . 


जे चित्त शुद्ध व निष्कामतेकडे झुकलेले असते त्याच चित्ताला सदगुरुचा उपदेश अंतरंगात उमजत असतो .


अशुद्ध व सकाम मनाला सदगुरु उपदेशाचा लक्ष्यार्थ आकलन होत नसतो. 


 नुसते शब्द ऐकणे वा वाचन यांनी सकाम मनाला त्या शब्दाचा लक्ष्यार्थ कळत नसतो. 


सदगुरुचे शब्द पाठ करुन व त्या शब्दाची पुनरुक्ती पोपटा प्रमाणे करता आली म्हणजे ज्ञान झाले असे नसते .


बहुतेक गुरु जे अध्यात्मीक मार्गदर्शनाचे पाकीट व पैशाच्या स्वरुपात देणग्या घेतात व 

 गुरु - शिष्य बेडीत अडकलेले असतात ते पोपटपंची करणारे गुरु असतात कारण खरा सदगुरु शिष्या कडुन कोणत्याही स्वरुपात पैसे स्विकारत नसतो . 


"मी चा शोध" घेणे हेच अध्यात्माचे सार आहे . मी चा शोध लागला तर मी व ईश्वर भिन्न नाही हे उमजते तसेच मी व जग ही भिन्न नाही हे उमजते .  


जगाशी , ईश्वराशी असलेली आपली अभिन्नता अपरोक्षपणे अंतरात उमजणे यालाच आत्मज्ञान म्हणतात . 


"मी कोण आहे" याचा शोध घ्यायचा असेल तर द्वैत मन प्रक्रियेचा बोध अंतरंगात होणे पहिली पायरी आहे .


द्वैतमन प्रक्रियेचा बोध होवुन , 

द्वैतबुद्धीचे रुपांतरण अद्वैत बुद्धीत होणे आत्मज्ञानाची गुरुकिल्ली आहे . 


जागृती , स्वप्न व सुषुप्तीत दडुन बसलेल्या अज्ञान रुपी द्वैताचा निरास झाल्या शिवाय आत्मज्ञान होतच नसते . 


द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न असतो असे म्हणणे 

व 

सुषुप्तीला गाढ झोप म्हणणाऱ्यांचे द्वैत कधीच निरास होत नसते . 


सुषुप्तीला गाढ झोप म्हणणे अज्ञानाचे प्रतिक आहे .


द्वैत मन प्रक्रियेचा शोध घेणे ,

द्वैत मन प्रक्रियेची व्यर्थता समजणे व त्या समजेत मृत्युच्या अपरोक्ष अनुभुतीतुन जात , अंतकरणातील द्वैत समुळ निरास झाले असता आत्मज्ञान प्रकटते .


मृत्युच्या अपरोक्ष अनुभवातुन 

न जाता आत्मज्ञान झाले असे कोणी म्हणत असेल तर ते अज्ञान आहे .


कोणत्याही द्वैत साधनांनी किंवा सदगुरु चे शब्द ( शास्त्र ) परंपरेने पाठ केल्याने आत्मज्ञान होत नसते . 


आत्मज्ञान झाल्याशिवाय मनातील दु:ख , भय , चिंता व काळजी यांचा निरास होत नसतो .


चारी अवस्थातील द्वैत निरास झाल्या शिवाय सुषुप्ती , ब्रह्म , परब्रह्म , मुक्ती , मोक्ष , जिवन मुक्ती व विदेह मुक्ती या शब्दाचा खरा अंतरंग अर्थ कळत नसतो .


आपल्याच अज्ञानाची व द्वैत बुद्धीची जाणीव आपल्याला होणे ही अध्यात्माची सुरवात आहे .


अखंड निर्विकल्प निरीक्षणात ,

मन , विचार व भावना यांची प्रक्रिया अंतरात आकलन होणे Real meditation आहे .


जे मन बाह्य मन व आंतर मना विषयी समुळ सजग होत असते त्याच मनात आत्मज्ञान प्रकटत असते , नुसत्या शास्त्राच्या शाब्दीक गप्पा मारुन आत्मज्ञान होत नसते . 


सकाम व बाह्य द्वैत तप साधनेने कदाचित पुण्य व स्वर्गप्राप्ती होईल पण अशा सकाम व द्वैत साधनेने कधीच आत्मज्ञान होत नसते . 


जिवन जगत असताना जिवनात जे काही सुखद वा दु:खद प्रसंग अनुभवाला येतील त्या त्या सुख दु:खाच्या प्रसंगात , मनाचे समत्व टिकत असेल तर तेच खरे तप आहे . 


जिवन जगणे व साधना करणे या दोन भिन्न बाबी नाहीत , प्रतिक्षण सर्व प्रसंगात आपले जगणे समत्व बुद्धीने होणे हीच साधना आहे . 


जिवन समत्व बुद्धीने जगणे हीच खरी अंतरंग साधना आहे . 


समत्व बुद्धीला प्राप्त न होता नुसते शास्त्राचे रटणे निव्वळ पोपटपंची आहे , असे पोपटपंची करणारे गुरु अत्यंत क्रोधी असतात ते चिडले तर तर ते काय शब्द उच्चारतील हे सांगताच येत नाही . गुरुचा क्रोध गेला नसेल तर तो गुरु पोपटपंची करणारा आहे असे समजावे .


व्यासपिठाहुन आई बहिणीहुन शिव्या देणारे व अध्यात्मीक 

मार्गदर्शनाचे पाकीट घेणारे गुरु सुद्धा पोपटपंची करणारे गुरु आहेत असे समजावे . अशा ढोंगी गुरु पासुन सर्वांनी सावध रहाण्याची गरज आहे . 


एक तास साधना करायची व तेवीस तास घाण करायची याला साधना म्हणत नाही . 


सर्व अत्यंत कठीण प्रसंगात सदा सर्वकाळ जो साधक सजग व तटस्थ राहु शकतो तोच खरा साधक असतो . 


नुसत्या अध्यात्माच्या गप्पा मारायच्या व प्रिय व्यक्तीच्या निधन प्रसंगी जोरजोरात रडुन बोंबा मारायच्या हे खऱ्या साधकाचे / गुरु चे लक्षण नाही . 


गुरुच्या निधन प्रसंगी जे साधक बोंबलतात किंवा ज्या साधकाना दु:ख होते ते खरे अध्यात्मीक साधक नसतात .


खरा सत्संग प्राप्त झाला व आपलीही पात्रता असली तरच  

आपण चिंता , भय , दु:ख व काळजी मुक्त होत असतो .


नुसते पोपटपंची करणाऱ्यांचे  

भय ,काळजी , चिंता , लोभ ,क्रोध 

हे विकार गेलेले नसतात . 


खरी समज न येता जे पोपटपंची करतात त्यांचा अहंकार व क्रोध पराकोटीचा असतो . शाप देणारे तपस्वी हे असेच अज्ञानी लोक असतात . 


लोभ , कामना , क्रोध व अहंकार ज्यांचा गेला नाही ते खरे गुरु नसतात ,त्यांच्या नादी लागु नये .


ज्यावेळी विचार , भावना व विकार मनात प्रकटतात तेव्हा  

त्यांच्या विषयी जे सजग व तटस्थ रहातात व त्या विकाराना बळी न पडता मन समत्वात रहातात तेच अध्यात्मात प्रगती करु शकतात .


२०- ३० वर्ष सत्संग करुन ही आपली भय चिंता काळजी व दु:ख गेले नसेल तर आपल्याला 

अध्यात्म कळले नाही असे समजावे , नुसती पोपटपंची करता येणे हे खरे अध्यात्म नाही . 


 प्रत्येक सुख - दु:ख प्रसंगी आपण आपली तपासणी करत रहाणे हीच ध्यानाची रीत आहे .


द्वैत मनप्रक्रियेचा बोध होवुन द्रष्टाच दृश्य आहे हा बोध झाल्याशिवाय द्वैत बुद्धीचे रुपांतरण अद्वैत बुद्धीत कधीच होत नसते . 


साधकाला द्रष्टाच दृश्य हा बोध झाल्या शिवाय अहंकाराचा समुळ निरास कधीच होत नसतो .


"मी आहे" या भावा विषयी आपण सतत सजग राहीले पाहीजे .


"मी आहे"  हा भावच खरे अज्ञान आहे . 


जिवनातील प्रत्येक अनुभव मी चा भास निर्माण करत असतो हे उमजले पाहीजे . 


अनुभवासोबतच अनुभवणारा जन्माला येतो हे समजणे अध्यात्म सार आहे . 


अनुभव नसेल तर अनुभवणारा नसतो व अनुभवणारा नसेल तर 

अनुभव देखील नसतो . 


अनुभव - अनुभवणारा हेच द्वैत आहे .


अनुभवणाऱ्याला अनुभव माझ्या पासुन भिन्न आहे असे वाटणे हीच अज्ञानी बुद्धी आहे .


"मी आहे" या भावा ला उमजुन घ्या 


The whole world inside and outside द्रष्टा - दृश्य भावा मधे कसे अडकले आहे याचे भान असणे म्हणजे real meditation. 


To be aware of eternal journey of 

observer - observed phenomenon as part of learning is real meditation. 


"मी आहे" या भावाला ओळखणे फार फार गरजेचे आहे .


"मी आहे" या भावाला आपण ओळखु शकलेलो नाही हेच आमच्या दु:खाचे मुळ कारण आहे .


बुद्ध जेव्हा धम्म दु:ख आहे असे म्हणतो तेव्हा 

"मी आहे"  ही धारणा च दु:ख आहे असे सांगत असतो पण आम्हाला बुद्धाचा धम्म कळलेलाच नसतो व भलत्याच गोष्टीना आम्ही धम्म म्हणत असतो . 


"धम्म = धारणा मी ची . "


या "मी आहे" या भावाचा चारी अवस्थातील समुळ निरास हे अध्यात्माचे मध्यवर्ती सुत्र आहे . 


"मी आहे" हा भाव निरास होण्यतच दु:खाचा निरास आहे हे आम्हाला समजलेले नाही .


Meditation म्हणजे Total ending of illusion of self आहे हे आम्हाला कळलेले नाही . 


"मी आहे" हा भावच सर्व पापाचे बीज आहे . 


"मी आहे" भाव सर्व कर्माचे बीज आहे .


"मी आहे" हा भाव सर्व दु:खाच कारण आहे .

हे आम्हाला समजलेलेच नाही . 


"मी आहे"  हा भाव सत्य नाही हे आम्हाला ठावुक नाही उलट आमच्या तथाकथीत गुरूंनी " मी आहेे" हा भावच सत्य आहे , "मी आहेे" हा भावच आत्मा आहे , अशी उलट शिकवण आम्हाला दिली आहे . 


"मी आहे" हा भाव ( धम्म ) हेच दु:ख आहे , अनित्य आहे व अनात्म आहे .

  याच्या उलट आम्हाला "मी आहे" हा भावच नित्य आहे ,

"मी आहे" हा भावच 

सत - चित - आनंद आहे 

व 

"मी आहे" हा भावच आत्मा आहे अशी उलटी शिकवण दिलेली आहे . 


"मी आहे" हा भाव अजिबात सत्य नाही .


"मी आहे" हा भाव illusion आहे ,

सतत बदलणारा आहे . 


"मी आहे" हा भावच जगत भ्रमाचे मुळ आहे .


"मी आहे "या भ्रमाशिवाय जगताचा भ्रम अस्तित्वातच नसतो 


आधी "मी" वैश्विक आहे हा अद्वैत ब्रह्मभाव प्रकटतो व त्या अद्वैत ब्रह्म भावातुनच द्वैतात्मक जगत भ्रम प्रकटतो . 


"मी आहे" हा भावच भ्रमाचे बीज आहे . 


Illusion of self is real culprit . 

"मी आहे" या भावाचे द्वैत - अद्वैतात्मक चार अवस्थात्मक पंचभुतात्मक , पंच ज्ञानेंद्रियात्मक ,पंचकर्मेंद्रियात्मक पंच विषयात्मक nature व structure उमजुन घ्या .


"मी आहे" भावच सगळ काही बनत असतो . 

"मी आहे " हा भावच  

द्वैत - अद्वैत बनत असतो .


चारी अवस्थातील "मी आहे "या भावाच्या समुळ निरासात आत्मज्ञान प्रकटत असते .

असो . 

🙏🙏

.......................


- विजय पांढरे

+91 9822992578

22-05-2023

Youtube channel

"Vijay Pandhare"

vbpandhare@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Ask your doubt ..