20) चिंतन: खरे संत व अज्ञानी गुरु

 

चिंतन 20: खरे संत व अज्ञानी गुरू



.................

Click on the following link for pdf👇👇

🌹 चिंतन 20:खरे संत व अज्ञानी गुरू🌹

 .............................

✍️ Vijay Pandhare


📳 Phone no:

9822992578


📧 Email:

vbpandhare@gmail.com

.....................

चिंतन


असे म्हटले जाते की जर तुम्हाला आत्मज्ञानाची आत्यंतिक तळमळ असेल तर आत्मज्ञान ही एकीकडे फार सोपी गोष्ट आहे पण जर आत्मज्ञानाची आत्यंतीक तळमळ नसेल तर आत्मज्ञान ही अत्यंत कठीण गोष्ट आहे.


आपले मन आपल्याच संस्कारात ,अज्ञानात, भ्रमात ,मान्यता मध्ये, विश्वासात व अंधश्रद्धा मध्ये खुप खुप खोलवर पर्यंत बंदीस्त आहे .

हे जर आपल्या खरोखर लक्षात आले व आपल्या मनात त्या भ्रमातून अज्ञानातुन मुक्त होण्याची प्रामाणीक ईच्छा जागली व अशा अवस्थेत जर कृष्णमूर्ति सारखा आपल्याच अंतरंगाचे निर्विकल्प निरीक्षण करायला शिकवणारा मार्गदर्शक आपल्या जिवनात आला तर आत्मज्ञानाचा शोध मग आपणच आपल्या अंतरंगात घेणे सुरु करत असतो.


कृष्णमूर्ति सारखा Real meditation म्हणजे खरे ध्यान शिकवणारा मार्गदर्शक आपल्या जिवनात आला नाही तर मग आपण काल्पनीक ईश्वर भक्ती नाम जप व द्वैत साधना शिकवणाऱ्या अज्ञानी व भगव्या कपड्यातील अज्ञानी गुरु व पैसे- अडके दानाच्या स्वरुपात घेवुन शोषण करणाऱ्या आसाराम बापू सारख्या भोंदु बाबांच्या तावडीत अगदी सहज सापडत असतो.


साधारणपणे मन आपल्याच मान्यता विश्वास व अंधश्रद्धा मधे ईतके खोलवर अडकलेले असते की त्या काल्पनिक मान्यता व अंधश्रद्धा मधुन आत्मज्ञानाची तळमळ नसलेल्या सामान्य माणसाचे बेहोष मन कधीच मुक्त होत नसते.


फक्त ज्या मनाला आपण आपल्याच भ्रामक कल्पना मधे व आपल्याच पारंपारीक पूर्वसंस्कारां मधे अडल्याचे उमजते असाच साधक मग कृष्णमुर्तिच्या सोबत अंतरंग प्रवासाला स्वेच्छेने निघत असतो.


मी कोण आहे ? 

हा शोध द्वैत ईश्वर भक्ती नाम - जप वा द्वैत साधना करुन कधीच लागत नसतो. 

उलट अशा द्वैत साधनात अडकलेले मन संमोहनात अडकुन अधिकाधीक संमोहीत होवुन आपल्याच काल्पनीक जगात कायमचे बद्ध होवुन जात असते.


केवळ ग्रंथ व पुस्तक वाचुन आत्मज्ञान कधीच होत नसते. आपल्याच संस्कार बद्ध मनाला निर्विकल्पपणे निहाळण्याची Real meditation ची म्हणजे खऱ्या ध्यानाची कला आत्मसात करुन आपल्याच मनात दडलेलेल्या संस्कार बद्धतेचे निर्विकल्प दर्शन आपल्याला घडत नाही तो पर्यंत खोल अंतरंगात चार अवस्थात दडलेली ती संस्कार बद्धता कधीच निरास पावत नसते हे सर्वांनी नीट समजुन घेणे गरजेचे आहे. 

त्याशिवाय खरा अंतरंग शोधाचा प्रवास सुरुच होत नसतो.


माउली म्हणते


एक अंतरी निश्चळ।

जे निहाळता केवळ।

विसरले सकळ।

संसारजात ॥ .....( माउली)


आपणच आपली संस्कारबद्धता आपल्याच अंतरंगात खोल खोल पर्यंत न्याहाळु शकलो तरच मग अंतरंगातील या भ्रामक मान्यता व भ्रामक कल्पनांचा निरास घडुन अंतरंगातच आत्मबोध होणे शक्य असते. 

केवळ ग्रंथ व पुस्तके कितीही वर्ष वाचुन किंवा जन्मभर वाचुन ही मग अंतरंग संस्कारांचा निरास न झाल्याने आत्मबोध होतच नसतो हे सर्वांनी सुरवातीलाच उमजुन घेणे गरजेचे आहे.


जन्माला येण्यापुर्वी माझे स्वरुप काय होते व मृत्यु नंतर माझे स्वरुप काय असणार आहे हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. 

केवळ पुस्तक व ग्रंथ वाचुन मी ब्रह्म आहे किंवा मी परब्रह्म आहे असे म्हणण्याला काहीच अर्थ नसतो. 

केवळ पुस्तक व ग्रंथ वाचुन अंतरंग समुळ कधीच बदलत नसते व जर अंतरंग परीवर्तन होवुन स्वकेंद्रीत वृत्तीत आमुलाग्र परीवर्तन होत नसेल तर ते कधीच खरे अध्यात्म नसते.


केवळ पुस्तक व ग्रंथ वाचणाऱ्या मनातील मी ची कल्पना निरास तर पावतच नसते पण ती मी ची कल्पना आधीकच दृढ होत असते .

व मी कालातीत आहे, 

मी चिरंतन आहे,

 मी ईथेच आहे. मी तुमच्या अडचणी सोडवेन मी तुमच्या प्रश्नांना मेल्यावरही उत्तरे देईन... मी कुठे जाणार नाही, मी ईथेच आहे, अशी बडबड मग हे अज्ञानी लोक करत असतात, जशी बडबड osho ने मृत्यु पुर्वीच्या you tube वरील clip मधे केलेली आढळते.


खरे तर या विश्वरुपी अस्तित्वात मी व माझे असे काहीही नाही व हा विश्वाभास मी च्या भासासोबत प्रकटला.


अस्तित्व भास हा केवळ मी च्या अज्ञानात प्रकटलेला एक चित्ताचा प्रवाह आहे असे आपल्याला स्पष्ट उमजले पाहीजे .

 भगवान बुद्ध या अज्ञानात प्रकटलेल्या चित्ताच्या प्रवाहालाच " धम्म " असे म्हणतात, ज्याला माउलीने चिदविलास असा शब्द वापरला आहे व कृष्णमूर्ति यालाच consciousness किंवा मन प्रक्रिया असे म्हणतात .


मी चा भास निर्माण करणारा हा चित्तधारेचा प्रवाह म्हणजेच बुद्धाच्या भाषेत -


विज्ञान -संज्ञा -वेदना -तृष्णा


असुन, कृष्णमुर्ति या


awareness - perception-sensation - desire


म्हणतात तर माउलीच्या व संतांच्या भाषेत याला


मन -बुद्धी - चित्त - अहंकार


असे म्हणतात .


खरे संत मानवाच्या दुःखाच्या समुळ निरासाचा ध्यानाचा मार्ग सांगत असतात .

मला मुलगा होईल की नाही. माझ्या मुलीचे लग्न कधी होईल. माझ्या बायकोचा वा नवऱ्याचा आजार दूर करा . माझ्या पोराला नोकरी लावुन दया . अशा गोष्टीना पैसा अडका घेवुन उत्तरे देणारे भगव्या कपड्यातील गुरु लोक भोंदु व बदमाष असतात असे पक्के समजावे.

खरे संत अशा वैयक्तीक सांसारीक अडचणी दुर करण्याचे खोटे आश्वासन देण्याचा धंदा कधीच करत नसतात अशा अडचणी दुर करण्याचे आश्वासन देणारे भगव्या कपड्यातील गुरु लोक भोंदु असतात असे पक्के समजावे.


मन प्रक्रिये मधे आपल्या मनाठायी जो एक मी कोणी तरी एक अलगथलग व्यक्ती असल्याचा भास निर्माण झालेला असतो तो भास निरास करण्याचा मार्ग म्हणजे real meditation चे मार्गदर्शन खरे संत करत असतात.


ईश्वर भक्तीच्या खोट्या कल्पनेत अडकवणाऱ्या लोकांनी अशा काल्पनिक देवाच्या गोष्टी सांगुन समाजाचे खुप मोठे नुकसान केले आहे यात शंकाच नाही.


भजन -पुजन ,नाम -जप ,यज्ञ -याग, पुजा - अर्चा व प्रार्थना तथा स्तुती अशी कर्मकांडे शिकवणारे व त्यात लोकांना अडकवून ठेवणारे मार्गदर्शक अज्ञानी असतात हे पक्के पक्के लक्षात ठेवावे.


अज्ञानी गुरूंना ओळखण्याच्या काही खुणा आहेत त्या आपण समजुन घेतल्या पाहीजेत.


(१) बहुतांशी अज्ञानी गुरु भगवा किंवा ईतर एकाच रंगाचा पोषाख परिधान करतात .

(२) बहुतांशी अज्ञानी गुरु नाम दिक्षा व मंत्र देवुन वा गंडा दौरा बांधुन शिष्यसंप्रदाय निर्माण करतात.


(३) बहुतांशी अज्ञानी गुरु आश्रम स्थापन करतात .


(४)बहुतांशी अज्ञानी गुरु मोक्ष वा मुक्ती वा ज्ञान देण्याचे आश्वासन देतात व द्वैत साधना शिकवतात.


(५) बहुतांशी अज्ञानी गुरु कडुन आत्मज्ञानपर वा ब्रह्मज्ञानपर छंदबद्ध वा ओवीबद्ध मोठे ग्रंथ लिहिले गेलेले नसतात.


(६) अज्ञानी गुरु ओळखण्याची एक महत्वाची खुण अशी आहे की या गुरुंच्या उपदेशात एक वाक्यता नसते ते एकाला एक उपदेश करतात व दुसऱ्याला दुसरा उपदेश करतात तसेच त्यांच्या उपदेशात contradiction आढळते. एके ठिकाणी ते एक बोलतात व दुसरे ठिकाणी दुसरे बोलतात व आम्ही लोकांना अधीकार असेल तसा उपदेश करतो अशी भलावण करतात व लोकाना नाम जप व कर्मकांडात अडकवून ठेवतात.


नाम जप व कर्मकांडाचा उपदेश करणारे गुरु भोंदु असतात हे पक्के पक्के समजावे.


(७) आणी सर्वात महत्वाचे म्हणजे अज्ञानी गुरु भक्त लोकांकडुन मार्गदर्शनाच्या मोबदल्यात दान स्वरुपात पैसे स्विकारुन त्या दानावर आपले पोट भरत असतात.


मला वाटते आज इतके पुरे.

......................

- विजय पांढरे

9822992578

01-02-2022

vbpandhare@gmail.com



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या